या ६ गोष्टींनी रोखू शकता नकारात्मक विचार

नकारात्मक विचार सामाजिक जीवनात आणि कामामध्ये मोक्याच्या वेळी अस्वस्थता निर्माण करतात. सामाजिक अस्वास्थ्यावरील बऱ्याच उपचारपद्धतींमध्ये नकारात्मक विचारासरणीचे परिस्थितीबद्दलच्या जास्त सहाय्यक आणि सकारात्मक दृष्टिकोनात बदल करण्यासंदर्भातील घटकांचा समावेश असतो.

नकारात्मक विचार बदलण्यासाठी सर्वप्रथम आपली विचार करण्याची पद्धत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या समजून घेणं आवश्यक असतं. त्यानंतरच ते बदलण्यासाठी किंवा त्याचा परिणाम कमी करण्याची पद्धत ठरवता येते. सामान्यतः हे सर्व तज्ञांच्या मदतीने केले जातं, पण मानसिक अस्वस्थतेवर मात करण्याच्या स्वतःला मदत करण्याच्या प्रयत्नांमध्येसुद्धा याचा वापर करता येतो.

आपली नकारात्मक मानसिकता बदलण्यासाठी खालील ६ गोष्टी नक्कीच उपयुक्त ठरतील :

१. आपले विचार करण्याची शैली समजून घ्या

नकारात्मक विचार बदलण्याच्या प्रक्रियेतील पहिली पायरी म्हणजे आपण कसे विचार करतो, हे समजून घेणं. उदा. जर एखाद्या परिस्थितीत टोकाच्या यशाचे किंवा अपयशाचे विचार करण्याची सवय तुम्हाला असेल, तर तुमची विचार पद्धती सदोष आहे.

अशा सदोष विचार पद्धती आपल्याला वास्तविक परिस्थितीपासून दूर नेतात आणि लोकांकडे व परिस्थितीकडे आपण अव्यवहार्यपणे पाहतो.

२. नकारात्मकपणे विचार करणे कसे थांबवायचे?

विचारांची पुनर्रचना ही वैचारिक प्रक्रियेतून वागण्यावर केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतींच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे. ही प्रक्रिया तुम्हाला नकारात्मक विचार ओळखून त्यांचे जास्त सहाय्यक आणि अनुकूल प्रतिसादात रूपांतर करण्यास मदत करतात.

स्वतःहून किंवा उपचार करताना, वैचारिक पुनर्रचनेमध्ये नकारात्मक विचार ओळखणे, त्यांचे अचूक मूल्यमापन करणे आणि मग त्यांच्या जागी नवीन विचार मनावर ठसवणे अशा पायऱ्यांचा समावेश असतो.

नवीन पद्धतीने विचार करणे सुरुवातीला कठीण जाते, पण सरावातून कालांतराने सकारात्मक व तर्कसंगत नैसर्गिकरित्या सुचू लागतात.

३. टीकेचा सामना कसा करावा?

वैचारिक पुनर्रचनेसोबतच स्वतःचा आत्मविश्वासपूर्ण बचावसुद्धा कधीकधी सहाय्यक ठरतो. काही वेळा लोकांच्या तीव्र टीकेला तोंड द्यायची वेळ आली तर तुमच्याकडे नापंसती पचवण्याची ताकद असणं महत्त्वाचे ठरते.

यासाठी सामान्यतः तुम्ही आणि रोगनिवारणतज्ञ यांच्यातील काल्पनिक संवादांतून मानसिक ठामपणा आणि आत्मविश्वासपूर्ण प्रतिसाद देण्याचं कौशल्य निर्माण केलं जातं. गृहपाठच्या माध्यमातून ही कौशल्ये वात्सविक जगात उतरवली जातात.

४. मानसिक संतुलन कसे मिळवावे?

मानसिक संतुलनाचे मूळ ध्यानधारणेमध्ये आहे. ध्यानधारणेमुळे आपल्याच भावना आणि विचारांपासून स्वतःला विलग करण्याचा सराव होतो आणि आपण कोणत्याही गोष्टीकडे तटस्थपणे पाहू शकतो.

मानसिक संतुलनाच्या प्रशिक्षणामध्ये आपण आपल्याच भावना व विचारांकडे त्या जशा आहेत, तशा पाहायला शिकतो आणि त्यांचे निरीक्षण करायला अथवा सोडून द्यायला शिकतो. आपल्या मेंदूच्या विचार करणाऱ्या भागाला ताबा घेण्यास लावून स्वतःच्या भावनिक प्रतिसादावर नियंत्रण मिळवणं, हे मानसिक संतुलनाचे ध्येय आहे.

५. विचार थांबवण्याने फायदा का होत नाही?

विचार थांबवण हे मानसिक संतुलनाच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामध्ये आपण नकारात्मक विचारांचा शोध त्यांना थांबवण्यासाठी करत राहतो आणि ते निघून गेले असे सांगत राहतो.

त्यामुळे नकारात्मक विचारांना थांबवायचा जितका जास्त प्रयत्न होईल, तितके जास्त ते येत राहतील. म्हणून विचार थांबवण्यापेक्षा मानसिक संतुलन योग्य ठरते. शिवाय मानसिक संतुलनामुळे विचारांमधील नकारात्मकता कमी होते आणि त्यांचा तुमच्यावर होणारा परिणामदेखील कमी असतो. विचारप्रक्रिया थांबवणे हे जरी थोडा वेळ फायदेशीर ठरलं, तरी दीर्घकाळात त्यामुळे अस्वस्थता निर्माण होते.

६. विचारांची नोंद करून ठेवणे

यामुळे आपली नकारात्मक विचारशैली ओळखायला आणि आपले विचार कशाप्रकारे आपल्या भावनिक प्रतिसादाचे कारण असतात हे जास्तीत जास्त समजून घ्यायला मदत होते. मनात येणारे विचार लिहून काढल्यामुळे आपले नकारात्मक विचारसरणी आणि भावनिक प्रतिसाद यांमधील संबंध कळायला मदत होते.

अशाप्रकारे विचारांच्या विश्लेषणातून नकाराबद्दलचे अतार्किक विचार निघून जाऊन सकारात्मक, जास्त सहाय्यक विचार त्यांची जागा घेतात.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?