आजपर्यंत आपण साहित्य सोडून इतर कोणत्याच पुस्तकांकडे सहसा लक्ष देत नाही किंवा वाचत नाही, पण मला वाटलं आपण थोडं वेगळं वाचावं साहित्याच्या पलीकडे जाऊन तेव्हा मी हे पुस्तक “स्मार्ट उद्योजक” मासिकाच्या शॉपवरून मागवलं.
आपल्याला शालेय जीवनापासून सांगितलं जातं की साहित्य वाचा, महान व्यक्तींची चरित्र वाचा, पण याही पलीकडे अशी काही पुस्तक आहेत, जी आपण वाचली पाहिजेत आणि त्यातील काही चांगले विचार आचार आत्मसात केले पाहिजेत.
‘आंत्रप्रन्योर’ हे पुस्तक गेले चार दिवस मी वाचत आहे. पुस्तक म्हणण्यापेक्षा शरद तांदळे सरांचं चरित्रच म्हटलं तरी हरकत नाही, असं मला वाटत. आपला भूतकाळ कसाही असो, पण आपला भविष्यकाळ हा आपणच घडवायचा असतो हे चरित्र वाचलं तर समजून येत. जीवनात संघर्ष, यश, महत्त्वाकांक्षा जर समजून घ्यायची असेल, तर प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक!
– नीता पाटील, बेळगाव