एका कारागिराने सुरू केले स्वतःचे दागिन्यांचे दुकान


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


“शून्यातून जग निर्माण करता येतं”, या वाक्याची मूर्तिमंत उदाहरण असलेली खूपच कमी लोक आपल्याला भेटत असतात. अशा व्यक्तींचा शोध घ्यावा लागतो. त्यांचं जीवनचरित्र अभ्यासावं लागतं आणि असा हा शोध एका व्यक्तिमत्त्वाजवळ येऊन संपतो. ती व्यक्ती म्हणजे बाळकृष्ण सोनार.

वरील उल्लेखित वाक्याशी समर्पक असलेलं व्यक्तित्व म्हणजे बाळकृष्ण सोनार (Balkrishna Sonar); ज्यांना लोक ‘काका’ म्हणून ओळखतात. संपूर्ण नाव बाळकृष्ण सोनाजीशेठ सोनार. शिक्षण दहावी पास. थोडासा धक्का बसला ना? दहावी पास असलेली व्यक्ती आणि शून्यातून विश्व? आयुष्याची हीच गंमत आहे.

धैर्यशील, कणखर, बुद्धिमान व्यक्तीमत्त्वांना शिक्षण कधीच बाधा बनत नाही आणि सोनारसरांना ही ते कधी बनले नाही. खर्‍या सोन्याला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी जसं आगीत होरपळाव लागतं अगदी तसंचं प्रत्यक्ष आयुष्यात बाळकृष्ण सोनार यांना परिस्थितीच्या आगीत स्वत:ला सिद्ध करावं लागलं.

वयाच्या सोळाव्या वर्षी पितृछत्र हरवलं आणि आई व पाच भावंडांची जबाबदारी अंगावर आली. पुण्याला कारखान्यात काम करत करत भविष्याच्या काळोखाची चिंता. या पगारात किती दिवस भागणार. हा प्रश्न दिवसेंदिवस सोनार यांच्या मनाला भंडावून सोडू लागला.

आई व भावंड गावाकडे, आपण इकडे दूर पुण्याला. आपण कुटुंबाच्या आधारासाठी जवळ राहायला हवं, असा विचार मनात येऊ लागला आणि स्वत:चा व्यवसाय उभा करून पैसा आणि कुटूंब या दोन्ही आघाडीवर भविष्याला सोपं बनवता यावं यासाठी व्यवसायाकडे सोनार वळले.

काम कोणतं करावं? कोणतं काम आपल्याला उद्याचं व्यवसाय बळ देईल. असा प्रश्न असताना सुवर्ण कारागीर म्हणून सुवर्ण व्यवसायात आपली छोटीशी झेप घेण्याचा निर्णय सोनार यांनी घेतला. सुवर्ण कारागीर म्हणून काम करता करता आपण आता व्यवसाय म्हणून आपलं काहीतरी नवीन निर्माण केलं पाहिजे, या विचारातून सोन्या-चांदीच्या व्यापारात छोटंसं दुकान टाकून प्रदार्पण केलं.

बाळकृष्ण सोनारस्वभावातील नम्रता, प्रेम, ग्राहकांची विश्वासाहर्ता या गुणांमुळे बाळकृष्ण सोनार यांनी कमी काळातच आपल्या व्यवसायाची वृद्धी करत उद्योजक म्हणून एक वेगळी ओळख मिळवली.

खरं म्हटलं तर शिखरावर जाणं सोपं, परंतु त्यावर टिकून राहणं अवघड, परंतु एक प्रतिष्ठित उद्योजक झाल्यानंतर, आपलं एक प्रस्थापित स्थान निर्माण केल्यानंतरही आपले पाय जमिनीवरच घट्ट रोवून ठेवण्याचं कसब सोनार यांच्याकडे आहे. ते आजही माणसे जोडतात, तितक्याच आपुलकीने, नम्रतेने बोलतात आणि आजही ग्राहकांच्या पसंतीस खरे उतरतात.

आपला व्यवसाय आधुनिक युगातही तेजीने पुढे जावा यासाठी ते ऑनलाइन माध्यमांचाही वापर खुबीने करतात. युट्युब चॅनेलच्या माध्यमातून स्त्रियांसाठी ‘जागर नवचैतन्या’चा कार्यक्रम असेल किंवा दुकानाची वेबसाइट असेल. सर्व माध्यमातून ग्राहकाला सुविधा पोहचवण्याचा त्यांचा अट्टहास असतो.

आपला व्यवसाय आणि आपण यातून ग्राहकांना सुविधा देताना इतर मार्गानेही लोकांची सेवा व्हावी, या हेतूने त्यांनी औरंगाबाद येथे एम डी फार्मसिटीकल्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने औषधी निर्मितीची कंपनी सुरू केली. यामध्ये त्यांचा लहान मुलगा हा या कंपनीचा डायरेक्टर आहे.

त्यांनी सिल्लोड येथेही प्रीमिअर एजन्सी नावाने औषधांची होलसेल डिस्ट्रिब्युटरशीप सुरू केली आहे. त्यांच्या व्यवसायात त्यांनी वृद्धी करत आपल्या दुकानाची एक शाखा ‘पाचोरेकर ज्वेलर्स’ या नावाने जालना जिल्ह्यातील हसनाबाद येथे सुरू केली आहे.


‘स्मार्ट उद्योजक’ मासिकात तुमचीसुद्धा कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


आज बाळकृष्ण सोनार यांचं वय ६७ आहे. ते रोज एक ते दोन किलोमीटर अंतर दुकानात पायी येतात. म्हणतात निरोगी मनासाठी निरोगी शरीर गरजेचे आहे. ते दुकानात दिवसभर ग्राहकांशी तन्मयतेने बोलतात. संपूर्ण दिवस ग्राहकांच्या गराड्यात राहूनही संध्याकाळी त्यांच्या चेहर्‍यावर सकाळइतकंच तेज असतं.

याच गुपित सांगताना ते म्हणतात, “माणसाने लोभी होऊ नये. गरज असेल तितकं घ्यावं. तितकंच कमवावं. हव्यासापोटी आपल्या स्वाभिमानाचा, कुटूंबाचा आणि आंतरिक आत्माचा बळी देऊ नये. जितकं मिळत आहे त्यात प्रभूचे आभार मानावे.”

त्यांच्या सामाजिक कार्याचा विस्तार खूप मोठा आहे, परंतु ते आपल्या समाजसेवेला प्रसिद्धी देऊ ईच्छित नाहीत म्हणून या लेखात सांगू शकत नाही. नवीन उद्योजकांना सल्ला देताना ते म्हणतात, भांडवल असताना सर्वच व्यवसाय करतात, पण भांडवल नसतानाही उद्योगात भरारी घेता येते. चांगली वाणी, सदाचार आणि नम्र, प्रामाणिक व्यवहार हेच यशाचे गमक आहे.

अशा एका शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या व्यक्तिमत्वाची भेट आपल्याला ऊर्जा देऊन जाते आणि ही ऊर्जा आपल्याला बाळकृष्ण सोनार यांच्याकडून मिळते.

– पवन ठाकूर
संपर्क : 9890069901


‘स्मार्ट उद्योजक’ मासिकात तुमचीसुद्धा कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?