या ४ गोष्टींचा २०२३ च्या डिजिटल मार्केटिंगवर सर्वात जास्त प्रभाव असेल

मागच्या लेखात आपण २०२२ मध्ये डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काय बदल झाले व कोणते ट्रेण्ड्स वर्षभरात कार्यरत होते हे पाहिले. या लेखात आपण २०२३ मधील मुख्य ट्रेण्ड्स जे डिजिटल मार्केटिंगवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम करू शकतात ते पाहू.

१. आर्टिफिशियल इंटेलिजन्स : एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर २०२३ मध्ये प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. याचे उदाहरण वर्षाच्या सुरुवातीलाच आपण पाहिले. ‘चॅट जीपीटी’ हे एआयचे टूल अचानकपणे समोर आले आणि केवळ काही दिवसांमध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये असलेल्या एक्स्पर्ट लोकांनी त्याचा वापर सुरू केला. हे टूल आज डिजिटल मार्केटिंगच्या कंटेंट तयार करण्याच्या प्रोसेसमधील महत्त्वाचे टूल बनले.

आता प्रश्न असा येतो की, आधी अशी टुल्स उपलब्ध नव्हती का? तर त्याचे उत्तर आहे, अशी टुल्स उपलब्ध होती, पण त्यांचा वापर इतक्या प्रमाणात होत नव्हता, जेव्हढा तो ‘चॅट जीपीटी’च्या आगमनानंतर वाढला. मुळात ‘चॅट जीपीटी’, ‘कॉपी एआय’सारखी एआय टुल्स ही डिजिटल क्षेत्रात असली तरीही, कॉपी रायटर्सचे महत्त्व अबाधित राहील.

याचे मुख्य कारण म्हणजे भावना किंवा इमोशन्स ज्या या एआय टुल्सकडे अजूनपर्यंत नाहीत. त्यामुळे कंटेंटमध्ये भावनांचे महत्त्व जोपर्यंत आहे, तोपर्यंत कॉपी रायटर्सचे महत्त्व अबाधित राहील. पण एआयचा २०२३ मधील पुढील प्रवास नक्कीच पाहण्यासारखा आणि चित्तथरारक राहील यात शंका नाही.

२. मायक्रो कंटेंट : छोटे छोटे पण परिणामकारक कंटेंट २०२३ मध्ये आपली छाप सोडू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे इंटरनेट युजर्सचा कमी होत असलेला अटेंशन स्पॅन. कंटेंट हे टेक्स्ट, इमेज आणि व्हिडिओ फॉरमॅटमध्ये असू शकतात. पण ते परिणामकारक व कमीत कमी शब्दांमध्ये आशय स्पष्ट करणारे असावे.

३. रिल्स व शॉर्ट व्हिडिओ : जसे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय मांडणारे कंटेंटची मागणी वाढत जाईल, त्याच प्रमाणात इंस्टाग्राम रिल्स, युट्यूब शॉर्ट्स आणि शॉर्ट व्हिडिओचे महत्त्व वाढत जाईल. पहिल्या काही सेकंदच्या वेळेमध्ये जो व्हिडिओ आशय स्पष्ट करू शकला किंवा युजरच्या मनात हुक बनवू शकला, तो शॉर्ट व्हिडिओ यापुढे यशस्वी होईल.

४. इन्फ्ल्युएन्सर मार्केटिंग : २०२३ मध्ये सरकारने व मोठ्या ब्रॅण्ड्सनी इन्फ्ल्युएन्सर्सची दखल घ्यायला सुरुवात केली आणि इन्फ्ल्युएन्सर्ससाठी आर्थिक उत्पन्नाचे एक नवीन दालन खुले झाले. तसेच सरकारने त्यावर टॅक्सचे काही नियम लावून हे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये परिणाम करते आहे, हे अधोरेखित केले.

२०२३ मध्ये इन्फ्ल्युएन्सर्ससाठी आणखी काही नियम व कायदे लागू होणे अपेक्षित आहे. पण याचाच अर्थ असा असेल की २०२३ मध्ये मार्केटिंग क्षेत्रात इन्फ्ल्युएन्सर्सचा दबदबा वाढेल. ज्यातून अजून जास्त प्रमाणात आर्थिक संधी खुल्या होऊ शकतात.

२०२३ मध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे. आपण येणार्‍या बदलांचा अंदाज घेऊन आपला २०२३ मधील डिजिटल मार्केटिंगचा प्लॅन तयार करणे आवश्यक आहे. याच बदलांचा अभ्यास आपण सुरू ठेवणार असून पुढील लेखामध्ये काही प्रत्यक्ष व काही ग्राहकाभिमुख बदलांवर आपण अधिक चर्चा करणार आहोत.

– गणेश नाईक
संपर्क : 8822757575
(लेखक गेल्या नऊ वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.)

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?