सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन क्षेत्रात वाढत आहेत उद्योगांच्या संधी

सर्च इंजिनच्या सुरुवातीपासून सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) क्षेत्रातील गुंतवणूक व विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. ही निरंतर प्रक्रिया आहे. भविष्यात SEO च्या वाढीस परिणामकारक घटकांचा आम्ही अभ्यास केला. SEO ही सुरुवातीपासूनच झपाट्याने वाढत असलेली मार्केटिंगची एक शाखा आहे. SEO हे दिवसेंदिवस भरभराट होणारे क्षेत्र बनले आहे.

एका संशोधनामध्ये असे आढळले की, SEO हा आज 65 बिलियन डॉलरचा बिझनेस आहे. 2008 मध्ये वर्तवलेल्या अंदाजापेक्षा तो तिप्पट वाढला आहे. 2020 पर्यंत तो 79 बिलियन डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. आता तर गुगल पांडा, गुगल पेंग्विन, गुगल हमिंगबर्ड यांसारखे गेम चेंजर्सही या क्षेत्रामध्ये आहेत. म्हणजे SEO क्षेत्रात पूर्वीपेक्षाही अधिक अनपेक्षित वाढ झाली आहे.

तसेच भविष्यात ही वाढ कायम ठेवण्यासाठी अनेक मार्गही तयार केले जात आहेत. 90 टक्के व्यावसायिक आपल्या SEO बजेट योजना एक वर्ष आधीच बनवतात. जरी असे खूपच कमी अंदाज अचूक असले तरी SEO ची वाढ थांबवणे अशक्य आहे. SEO च्या शाश्वत वाढीस कारणीभूत असलेले घटक पाहू या.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE

जास्तीत जास्त युजर्स : भविष्यात प्रति युजर सर्चिंगचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कारण पुढील पिढी ही प्रत्येक गोष्टीसाठी तंत्रज्ञानावर अवलंबून असणार आहे. इंटरनेट युजर्सची संख्यादेखील वाढेल, कारण तंत्रज्ञान हे अधिक वेगवान व सोईस्कर होणार. गुगल, फेसबुक व इतर कंपन्या विकसित झाल्याने इंटरनेट सर्वत्र उपलब्ध झाले आहे. त्याचा फायदा नक्कीच होईल. या बदलामुळे इंटरनेटवर कोणालाही, कधीही, काहीही सर्च करता येईल.

सर्च व्हिजिबिलिटी : सर्च व्हिजिबिलिटीसाठी अधिक पर्याय असतील. उदा. गुगल. पर्यायी सर्च इंजिनची संख्या निश्चितपणे वाढेल; परंतु जेथे यामध्ये पायाभूत वाढ होईल, असे दोन भाग आहेत. पहिले म्हणजे ऑनलाइन व ऑफलाइन सर्चिंगमधील अंतर कमी करणार्‍या डिजिटल असिस्टन्सचा वापर आणि दुसरे म्हणजे फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, व यूट्यूबसारख्या अ‍ॅप स्टोअरवर आधारित सर्च इंजिनचा वैयक्तिक स्तरावर वाढता वापर.

पारंपरिक जाहिरात पद्धतींचा वापर कमी होईल. त्यामुळे त्यावर अवलंबून असणार्‍या व्यवसायांना व व्यावसायिकांना ग्राहक मिळविण्यासाठी ऑनलाइन विश्वात इनबाऊंड मार्केटिंग केल्याशिवाय पर्याय नसेल.

वाढते SEO सॉफिस्टिकेशन : या क्षेत्रात उत्कृष्टता आणण्यासाठी अनेक उपक्रम चालू आहेत. तसेच उच्च पद्धतीचे व्यवस्थापन विकसित केले जात आहे. कंटेंट डेव्हलपिंग व पब्लिशिंगमध्ये की-वर्ड स्टफिंग व चीप लिंक बिल्डिंग ही गुंतागुंतीची धोरणे बनली आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त डेटा अ‍ॅक्सेसिबल होतो व येथूनच SEO क्षमता वाढते.

SEO च्या अमर्याद वाढीवर परिणाम करणारे घटक :

स्पर्धा व खर्च : SEO क्षेत्रातील वाढती उलाढाल म्हणजे अधिकाधिक व्यवसाय या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे स्पर्धेला सामोरे जावे लागेलच. काही काळापुरते हे ठीक आहे, परंतु नंतर कॉस्टिंग प्रतिबंधात्मक होईल व एका टीपिंग पॉइंटवर खर्चाचे प्रमाण वाढेल.

नॉलेज ग्राफ : नॉलेज ग्राफमुळे ग्राहकांच्या समस्यांची उत्तरे तत्काळ स्वरूपात देता येतात. त्यामुळे खासगी साइटवर भेटी न देता ते गुगलवर त्यांना अपेक्षित सर्चिंग करू शकतात. अशा वेळी गुंतवणुकीच्या परताव्यामध्ये तडजोडी कराव्या लागतील ज्यामुळे बरेच जण यातून बाहेर पडतील.

पर्यायी सर्च मोड (शोध पद्धती) : सध्या ऑनलाइन शोध पद्धती ही विचित्र पर्यायांमधून विकसित होण्यास सुरुवात होत आहे. पर्सनल डिजिटल असिस्टंट जे ऑनलाइन व डिव्हाइस स्पेसिफिक सर्चचा मेळ असतो. या पर्यायी शोध पद्धतीचा अंदाज लावणे व रँकिंग करणे कठीण असते. कारण बर्‍याच वेळा त्यामध्ये रँकिंग प्रोसेस वगळली जाते.

रँकब्रेन व घसरती रँक प्रॉडक्टिबिलिटी : तांत्रिक शिक्षण मोठे क्षेत्र आहे, ते अधिकाधिक वाढत आहे. रँकब्रेनसारखे तंत्रज्ञान शोध पद्धतींना (सर्च सिस्टीम्स) रियल टाइममध्ये उच्च स्तरावर नेत आहे जेथे फक्त ए आय प्रोग्रामच समाविष्ट केले जातात. त्यामुळे रँकिंग फॅक्टर्स अचूकपणे समजून घेणे व त्यानुसार रिस्पॉन्स देणे अधिकच कठीण झाले आहे.

व्याख्येची समस्या : एसईओ म्हणून कठोर निकष काय आहेत हे ओळखणे महत्त्वाचे आहे. आज SEO हा शब्द, ऑरगॅनिक सर्च रँकिंगमध्ये आपली वेबसाइट उच्च स्थानी ऑप्टिमाइझ करणे या अर्थाने पाहिला जातो; परंतु आधीपासूनच स्थानिक रिझल्टस ते नॉलेज ग्राफ एंट्री यासारख्या क्षेत्रात आणि डिजिटल असिस्टंट आधारित निकालांमध्ये लागू होत आहे.

सर्च तंत्रज्ञान विकसित होत असताना SEO संपुष्टात येण्याऐवजी वेळेनुसार अ‍ॅडॉप्ट होईल. तसे झाल्यास ज्याला आपण SEO म्हणून पाहतो, त्यावर खर्च करणे बंद होईल; पण ज्याला SEO म्हणून लेबल करू, त्यावर खर्च करणे सतत सुरू ठेवू.

तंत्रज्ञान विविध व प्रभावीपणे वेगाने विकसित होत असल्याने पुढील भविष्याबाबत अंदाज लावणे कठीण आहे. तथापि संभाव्य भविष्यात SEO ची लोकप्रियता विविध स्वरूपांत वाढतच राहील. त्यामुळे आपण विद्यमान योजनांमध्ये गुंतवणूक करताना कम्फर्टेबल असावे. तर सर्च ऑप्टिमायझर्ससाठी, जोपर्यंत आपण ते अ‍ॅडॉप्ट करण्यास इच्छित असाल तर तो जॉब सिक्युरिटीसाठी सकारात्मक दृष्टिकोन आहे.

या उद्योगात जगभरात 5 लाख लोक काम करतात. यासाठी कमी वेतन असणारे ITES मॅनपॉवर लागते. महाराष्ट्रात BE, B.Tech., BCA, MCA, B.Sc.(IT), BA, MBA, BED इत्यादी झालेले लाखो तरुण आहेत. SEO मध्ये तुमच्याकडे तार्किक विचारशक्ती असावी लागते. सतत पुढे राहण्यासाठी स्वतः तयार राहा. इंटरनेटबद्दल सखोल ज्ञान व कौशल्य असणे आवश्यक आहे.

या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपण तल्लख, सर्जनशील, विश्‍लेषणात्मक आणि शास्त्रोक्त असले पाहिजे. SEO हे क्षेत्र फक्त स्मार्ट आणि पॅशनेट लोकांसाठी आहे, जे यातील सतत होणारे बदल व आव्हानांना सामोरे जातील असे कुशल व उचित लोक यशस्वी होतील.

असे हे निरंतर ज्ञान देणारे एक करीयर आहे. चांगले SEO शिकण्यासाठी 1 ते 3 वर्षे कालावधी लागतो, अंदाजे 5 ते 10 लाख गुंतवणुकीमध्ये SEO उद्योग लहान प्रमाणात सुरू करता येऊ शकतो तसेच दरमहा 25 ते 90 हजारपर्यंत नफा मिळू शकतो.

– प्रा. प्रकाश भोसले
8097027355

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?