या पाच इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करता येतील कमीत कमी बजेटमध्ये


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


माहिती तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलते आहे. पारंपरिक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आज पाच वर्षांच्या मुलाच्या हातात इंटरनेट आहे. आज आपण कोणताही माल, सेवा इंटरनेटद्वारे जगभर विकू शकतो, ई-कॉमर्स, मोबाइल ‍ऍ‌‌प, पोर्टल्स इत्यादी असंख्य व्यवसाय संधी उपलब्ध आहेत.

केंद्र सरकारच्या योजनेनुसार १० लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य तरुण उद्योजकांना देणे बँकांना बंधनकारक आहे. कधी नव्हे तेवढे चांगले वातावरण नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आहे, तेव्हा संधीचा फायदा घ्या. प्रत्येक घरात ऑनलाइन व्यवसाय चालू करा. महाराष्ट्राला नं. १ चे ऑनलाइन व्यवसाय राज्य बनवू.

मोबाइल ऍ‌‌प्स व्यवसाय

२०२० पर्यंत भारतात तब्बल ४५ कोटी लोकांच्याकडे स्मार्ट फोन असेल. आज प्रत्येकाकडे बघितलं तर किमान २० ऍप्लिकेशन्स डाऊनलोड केलेली असतात, त्यात प्रामुख्याने मनोरंजन ऍप्स, उदा. गाना डॉट कॉम, युट्यूब ऍप्स, माहितीचे ऍप्स उदा. टाइम्स न्यूज, न्यूजहंट इत्यादी. प्रवास ऍप्समध्ये यात्री, रेल्वे, रेडबस अशी अनेक ऍप्स. ह्या कंपन्यांना तुम्ही ह्या ऍप्सवरून जेव्हा व्यवहार, खरेदी कराल, त्यावर फायदा मिळतो.

फ्लिपकार्टच्या ऍप्सवरून सुमारे २७ हजार कोटींची खरेदी होते. जाहिरातीचे उत्पन्न हे खूप मोठे साधन आहे. तुम्ही जेव्हा गाना डॉट कॉमवर गाणे लावता किंवा यूट्यूबवर व्हिडीओ बघता तेव्हा तुम्हाला ऍप्समधून जाहिराती दिसतात. या जाहिरातींचे उत्पन्न कोट्यवधीचे असते. तुम्ही एकदाच जाहिरात बघता, पण जाहिरात कंपनीस रु. २५ मोजावे लागतात.

तुम्हीही एखादी अफलातून समाज व लोकोपयोगी आयडिया शोधा, तुमचे ऍप्स डाऊनलोड केल्यावर ग्राहकांना कसा फायदा होईल याचा विचार करा, यात चांगली माहिती उपयोगी असणारे ऍप्स बनवा, त्याचे मार्केटिंग करा, दरमहा ५० हजार ते १ लाखापर्यंत नफा मिळू शकतो, २ ते ४ लोकांची टीम गरजेची आहे.

मेडिकल टुरिझम ऑनलाइन व्यवसाय

वैद्यकीय सेवा भारतात स्वस्त असल्याने परदेशातील पेशंट्स भारतात येतात. याला मेडिकल टुरिझम म्हणतात. हे क्षेत्र भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. सुमारे ३०% दराने वाढत असून ह्याद्वारे २ बिलियन डॉलर्सचे परकीय चलन भारताला मिळते.

२०१५ मध्ये सुमारे ३ लाख परदेशी पेशंट्स भारतात आले होते, यात चेन्नई आघाडीवर असून रोज सुमारे २५० पेशंट्स चेन्नई एअरपोर्टवर उतरतात.

हा सर्व व्यवसाय इंटरनेटच्या माध्यमातून होतो, विदेशातील पेशंट आपल्या उपचारावर होणारे पैसे वाचवण्यासाठी भारतात चांगले हॉस्पिटल, डॉक्टर, मेडिकल टुरिझम कंपन्या व एजंट यांचा शोध इंटरनेट, सोशल मीडिया इत्यादीद्वारे करत असतात.

तुम्ही काही उपचार निवडा, त्याचे काही चांगले डॉक्टर व हॉस्पिटलबरोबर टायअप्स करा, एक पेशंट मिळवून दिल्यानंतर तुम्हाला किती फी मिळेल याची माहिती व करार करा, ज्या उपचाराचे तुम्हाला मार्केर्टिंग करायचे आहे, त्याची आंतरराष्ट्रीय दर्जाची वेबसाइट बनवा.

ती वेबसाइट इंटरनेट, सर्च इंजिन, सोशल मीडिया, ब्लॉग इत्यादीद्वारे आंतरराष्ट्रीय पेशंटपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने त्याचे मार्केटिंग करा, त्या पेशंटचा ऑनलाइन संपर्क झाल्यानंतर त्याच्या उपचाराच्या गरजेबद्दल पूर्ण माहिती घ्या, ते डॉक्टर, हॉस्पिटल दाखवा, खर्चाचा अंदाज पेशंटला द्या, तो पेशंट भारतात आल्यापासून त्याला सर्व सेवा व माहिती देणे तुमचे काम आहे.

योग

बिलियन डॉलरची इंडस्ट्री तणावग्रस्त जीवन, हायब्रीड व केमिकल वापरलेले अन्न, प्रदूषण इत्यादीमुळे आरोग्याचे प्रश्न भयानक वाढले आहेत. अनेक औषधे वाढतात, दवाखाने व डॉक्टर वाढतायत, पण रोग व आजार कमी होत नाहीत. अमेरिकेतील योगा व्यवसाय बाजारपेठ ४० बिलियन डॉलरची झाली आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने रामदेव बाबाचे ब्रँड व्हॅल्युएशन ६० हजार कोटींचे केले आहे.

अमेरिका व युरोपमध्ये एक योगा टीचर दरमहा सुमारे १० हजार डॉलर्स कमावतो. योगाचे मूळ स्थान भारत असल्यामुळे भारतातून प्रशिक्षण घेऊन गेलेल्या योगा टीचर्सना वेगळे स्थान व मान असतो.

या व्यवसायामध्ये योगा मोबाइल ऍप्स, ऑनलाइन योगा, योगा क्लासेस, योगा ट्रेनर, योगा वेबसाइट पोर्टल, योगा पुस्तके, योगा डीव्हीडी, सीडी, योगा सल्लामसलत इत्यादीचा समावेश आहे. अनेक रोगांवरील उपचार म्हणून आज योगाकडे जग पाहत आहे.

योगा एक्सपर्ट म्हणून परदेशात मोठा पैसा कमावण्याची संधी आहे. हा व्यवसाय ऑनलाइनसुद्धा करू शकता. स्काईप किंवा व्हिडीओ कॉन्फरिंग व योगा क्लासेस चालवणे, योगा पुस्तके, सीडी, डीव्हीडी विकणे, योगा पोर्टल चालवणे. तुम्हाला या व्यवसायाची माहिती लागेल, तुम्ही योगा एक्सपर्ट नसाल तेव्हा तुम्हाला तसे पार्टनर किंवा योगा एक्सपर्ट घ्यावे लागतील.

अमेरिका, युरोपमधील प्रत्येक जण १० हजार डॉलर फी योगा टीचर्सना देऊ शकत नाही तेव्हा ते भारतात ऑनलाइन टीचर स्वस्त दरात शोधतात ते ५०० ते १००० हजार डॉलर फी देऊ शकतात. सरासरी ८ ते १० लाख रुपयांत हा व्यवसाय सुरू होऊ शकतो व तुम्हाला ८० हजार ते १ लाखापर्यंत नफा होऊ शकतो

घरबसल्या ऑनलाइन, ई-कॉमर्स व्यवसाय

आपले राज्य शैक्षणिकदृष्ट्या प्रगतिशील आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजेस, कॉम्प्युटर कोर्सेस असल्यामुळे सर्व मुलींचे चांगले शिक्षण झाले आहे; परंतु लग्नानंतर किंवा दूर अंतरावर नोकरी करायची नसल्याने शिक्षणानंतर बहुसंख्य महिला कोणतेही काम करताना दिसत नाहीत.

परिणामी त्यांचे घेतलेले शिक्षण वाया जाऊन त्याचा जीवनात काही उपयोग होताना दिसत नाही. आज इंटरनेट प्रत्येक घरात पोहोचले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून फक्त जलद संपर्क नव्हे, तर घरबसल्या एक खूप मोठी व्यवसायाची संधी निर्माण झाली आहे.

आज शिकलेल्या महिलांना इंटरनेट व कॉम्प्युटरचे चांगले ज्ञान आहे. रोज किमान ४ ते ५ तास वेळ त्या देऊ शकतात. इंग्रजी भाषा वाचण्यास, लिहिण्यासही चांगल्या प्रकारे येते. जवळजवळ ४००% वेगाने वाढणार्‍यांत इंटरनेट, ऑनलाइन बिझनेस, ई-कॉमर्स इत्यादीचा फायदा या महिला घेऊ शकतात.

ज्या महिलांना इंटरनेटचे व कॉम्प्युटरचे चांगले ज्ञान आहे त्या महिल्या घरबसल्या ऑनलाइन, पोर्टल, मॅगझिन, ब्लॉगिंग, ई-कॉमर्स, ई-ट्रेडिंग, ऑनलाइन रायटिंग, व्हर्च्युअल असिस्टंट, ऑनलाइन बँक ऑफिस, ऑनलाइन अँडमिन, ऑनलाइन आयटी सपोर्ट, डिझायनिंग, ऑनलाइन मार्केटिंग, एस.ई.ओ., एस.एम.ओ., मोबाइल ऍप्स मार्केटिंग इत्यादी सुमारे ३०० हून अधिक प्रकारचे व्यवसाय करू शकतात.

लग्न जुळवण्याचा व्यवसाय

लग्न जुळवणे हा एक सहज न दिसणारा, पण खूप मोठा व्यवसाय आहे. शादी डॉट कॉम, भारत मेट्रोमोनीसारख्या संस्था १०० कोटींहून अधिक व्यवसाय करतात. मुंबई, पुणेसारख्या शहरांत अशा लहानमोठ्या असंख्य संस्था आहेत. अशा संस्था महिना १ लाखपासून १० लाखांपर्यंत व्यवसाय करतात. संपूर्ण देशाचा विचार करून अशा लहानमोठ्या संस्था धरून, एकूण ३५०० पेक्षा अधिक संस्था कार्यरत आहेत.

लहान गावातील संस्था एक लग्न जुळवण्यासाठी रुपये ५०००, तर पंजाब, हरयाणासारखा एन.आर.आय. मुलगा मिळवण्यासाठी लग्न जुळवणार्‍याला ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत फी दिली जाते. संपूर्ण देशात हा व्यवसाय ५०० कोटींहून उलाढालीचा असल्याचा अंदाज आहे. हा व्यवसाय असंघटित प्रकारात येत असल्याने नेमकी उलाढाल सांगता येत नाही; पण ती १००० कोटींच्याही पुढे असू शकते.

गावाकडे राहणार्‍या बर्‍याच लोकांनी पुणे, मुंबई, अमेरिका, इंग्लंड इत्यादी ठिकाणी व्यवसाय व नोकरीसाठी स्थलांतर केलेले असते. त्यामुळे मुलंमुली मोठी झाल्यानंतर आपल्या जातीतील स्थळ शोधण्यासाठी अनेक ठिकाणी संपर्क साधावा लागतो. हे ज्यांचा गावाकडचा संपर्क तुटला आहे त्यांना खूप अवघड जाते.

त्यामुळे असे लोक अशा व्यावसायिक लग्न जुळवणार्‍या संस्थेचा आधार घेतात. सर्वसाधारण हा व्यवसाय रु. ५ लाखांपासून ते रु. ४० लाखांपर्यंतच्या भांडवलात सुरू करता येतो. जितके जास्तीत जास्त भांडवल तितका जास्त नफा.

– प्रा. प्रकाश भोसले

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?