कर्मचारी टिकवण्यासाठी या गोष्टी तुम्ही करताय का?

ऑफिस स्टाफ टिकवून ठेवणे ही उद्योजकांची एक मोठी गुंतवणूक असते, कारण ते नसतील तर त्याचा परिणाम तुमच्या व्यवसायावर होतो. जर तुमचा स्टाफ वारंवार पगारवाढ मागत असेल आणि तुम्हीही त्याची पूर्तता करीत असाल तर कदाचित त्यांचा असा समज होईल; अरे, साहेब आपण पगारवाढ मागितली की देतात.

म्हणजे त्यांना चांगला फायदा होत असेल आणि ते सतत काही काळाने मागणी करत राहतील. कदाचित एक वेळ अशी येईल की, तुम्ही त्यांची मागणी पूर्ण करू शकणार नाही. (अशी वेळ कोणावरही येऊ नये.) पण कर्मचारी टिकण्यासाठी पगारवाढ, बोनस, इंसेंटिव्ह देणे या गोष्टी पैशाने दिल्या जातात, पण कर्मचारी टिकून राहावा यासाठी फक्त पैसा उपयोगी नाही.

त्यांच्याशी मैत्री करून आपलेसे करणेही खूप महत्त्वाचे आहे. माझ्या मते तुम्ही पगारवाढ देता त्यापेक्षा त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी काही फायदे, सुविधा त्यांना दिल्या तर तुमचे आणि कर्मचार्‍यांचे संबंध घरच्यासारखे होतील.

  • कर्मचार्‍यांना त्यांच्या हुद्यांप्रमाणे विमा, मेडिकल सुविधा द्या. प्रत्येकाचे रिकरिंग खाते उघडा आणि काही ठरावीक रक्कम त्यात ठेवून एक वर्षाने मूळ मुद्दल त्यांना बक्षीस म्हणून द्या. (बोनसशिवाय) ज्याने तुम्हाला आणि कर्मचारी दोघांना फायदा होऊ शकेल. प्रसंगी अडचणीत जरूर मदत करा.
  • वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांत कर्मचार्‍यांसह उपस्थित राहा, त्यामुळे तुमच्याबरोबर कर्मचार्‍यांचाही विकास होऊ शकेल.
  • कर्मचार्‍यांसोबत चर्चात्मक कार्यक्रमांचे आयोजन करा आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याने तुमच्याबद्दलचा आदर, आत्मीयता वाढेल.
  • कार्यालयाचे वातावरण प्रफुल्लित ठेवा, जेणेकरून ते काम करत आहेत असे त्यांना वाटू नये.
  • प्रत्येक एक-दोन महिन्यांनी त्यांना त्यांच्या कुटुंबासह जेवणाचा बेत आखा. त्यात शक्यतो कार्यालयीन चर्चा टाळा.
  • वर्षातून एकदा एखाद्या बिझनेस टूरचे नियोजन करा, ज्याने तुमच्या कंपनीचा तुम्ही नवीन माहिती, तंत्रज्ञानाने विकास करू शकाल.
  • कर्मचार्‍यांनी केलेल्या कामांचे त्यांना बक्षीस द्या. एखादा वार्षिक कार्यक्रम आयोजित करून सर्वांसमोर त्यांचे कौतुक करा, ज्याने ते अजून जास्त चांगले काम करण्यास प्रवृत्त होतील.

यासारखे खूप मुद्दे आहेत. हे मी अगदी साधे मुद्दे लिहिले ज्याचा मी अनुभव घेतला आहे. आपआपल्या अनुभवांनुसार आपण यामध्ये सुधारणा करू शकता.

– सुनील दातार
८४२१०००३००

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?