Advertisement
व्यक्तिमत्त्व विकास

स्वतःची कार्यक्षमता वाढवण्यासाठी या गोष्टी करा

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


उत्पादन क्षमता ही सहज वाढत नाही. त्यासाठी अथक परिश्रम आणि योजनाबद्ध पावलं उचलावी लागतात. कधी आपण विचार करतो दिवसभरात आपण जे काम करतो त्यातून नवीन काय निर्माण करतो. ज्या गोष्टी करत असतो त्यासाठी लागणारा वेळ हा किती सत्कारणी लागतो आणि किती वेळ वायफळ, अनाठायी खर्च होतो?

जर याचा नीट अभ्यास केला तर लक्षात येते की, आपण आपला दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ हा केवळ वायफळ खर्च करतो. आपल्या वेळेचा आणि ऊर्जेचा योग्य वापर केला आणि लक्षपूर्तीसाठी नजर केंद्रित केला तर आपल्या व्यवसायाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी खूप मदत होईल. त्यासाठी खालील काही मुद्द्यांचा जरूर विचार करा.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

१. दैनंदिन लक्ष्य ठरवा : आपलं लक्ष निर्धारित करून त्यानुसार आपली कामाची यादी तयार करा. अशाप्रकारे कामाची यादी तयार असल्यावर आपल्या लक्ष्यपूर्तीसाठी त्याचा चांगला फायदो होतो. वेळ वाचतो आणि जास्तीत जास्त कामे मार्गी लागतात.

२. कामांचा अग्रक्रम ठरवणे : कामांची यादी खूप मोठी असू शकते, पण त्या यादीतील कामांची क्रमवारी करावी. अग्रक्रम महत्त्वाचा आहे. जे काम अधिक महत्त्वाचे ते सर्वप्रथम करावे. त्यासाठी आपण विचारपूर्वक यादी बनवावी.

३. कालमर्यादा ठरलेली असावी : प्रत्येक कामासाठी कालमर्यादा ठरलेली असावी. आपण त्या मर्यादित वेळेतच आपलं निर्धारीत काम पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करावा. यासाठी चिकाटी खूप महत्त्वाची आहे.

४. कामांचे योग्य व्यवस्थापन करावे : उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आपल्या मोठ्या योजनांना काही टप्प्यात विभागायला हवे. टप्पे ठरवून ठरलेल्या कालमर्यादेत ते पूर्ण करण्यासाठी स्वत:शीच वचनबद्ध असायला हवे.

५. आपल्या मेंदूला एकाग्र करा : एकाग्रता ही उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपल्या मेंदूला आपल्याला प्रशिक्षण द्यायला हवे. त्यासाठी एकाग्र होवून काम करण्याची आवश्यकता असते. सुरुवातीला एक ते दोन तास सलग एखादे काम करण्याची आपल्या मेंदूला सवय करा. त्यातून आपण आपल्या कामावर लक्ष्य केंद्रीत करून एकाग्रता वाढवण्यात सफल होवू.

६. वेळ वाचवा : आपल्या कामांना वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली की कामं हळूहळू मार्गी लागू लागतात. आपण एकाग्र होवू लागतो त्यासाठी आपला मेंदू तयार होतो. यातून आपण जास्तीत जास्त वेळ वाचवू शकतो.

७. फोनचा वापर कमीत कमी करा : अनेक वेळा आपल्या मोबाइलचा वापर आपल्याही नकळत आपण आपल्या दैनंदिन आणि महत्त्वाच्या कामांव्यतिरिक्त करतो. मनोरंजन, सोशल मिडीया, मॅसेजिंग यामध्ये कामाशिवाय जास्त रमतो त्याचा परिणाम आपल्या कामावर, वेळेवर आणि लक्ष्यावर होते. त्यासाठी आपल्या फोनला दिवसातून काही काळ बाजूला ठेवायला शिका.

८. अभ्यास करा : आपल्या मनाला एकाग्र करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करा. त्यासाठी ध्यानधारणा चांगला पर्याय आहे. हे शिकून घ्यावे. आपले मानसिक स्वास्थ्य चांगले असले की अनेक मोठ्या आव्हानांना आपण सामोरे जाण्यास योग्यरित्या तयार होतो.

९. नियमित व्यायाम करा : आपल्या शरीरासाठी व्यायाम अत्यंत महत्त्वाचा असतो हे तर आपण प्रत्येकजण जाणतो. एकाग्रता वाढवण्यासाठी, आपली क्षमता वाढवण्यासाठी मानसिक आणि शारिरीक संतुलन योग्यरित्या राखण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. आपला दैनंदिन जगण्यात येणारा ताणतणाव कमी करण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे नियमित व्यायाम करा.

१०. कार्यात बदल करा : अनेक वेळा आपण एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असतो. अशावेळी कामात तोच तोच पणा आलेला असतो. आपल्या बुद्धीला नवीन काहीच सूचत नसते. सतत विचार करताना डोक्यात विचार येणे बंद होते अशावेळी आपण या गोष्टीला समजून घ्यावे. कामातील एकसूरीपणा आपल्याला नवीन काही करण्यास थांबवत असतो. त्यामुळे आपल्या कामात बदल करावा. म्हणजे मेंदू पुन्हा ताजातवाना होईल.

हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. जे आपण पाहिले. अशा विविध गोष्टींचा विचार तुम्ही स्वत:ही काम करताना करू शकता. त्यांची यादी करून त्याचा आपल्या दैनंदिन कामात वापर करू शकता. त्यामुळे आपल्याला एक प्रकारचे नियोजनबद्ध काम करण्याची शिस्त लागेल आणि आपल्या कामात जास्तीत जास्त वेळ देवून आपण आपली उत्पादन क्षमता वाढवू शकू.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!