कसा सुरू करावा मसाले उद्योग?

भारत ‘मसाल्याचे’ माहेरघर म्हणून ओळखले जाते. इतिहाससुद्धा याचा साक्षीदार आहे हे आपण जाणतोच. वास्को-द-गामा आणि संपूर्ण युरोप हे महासागरांना वळसा घालून भारताचा शोध घेत आले ते भारतीय मसाल्यांच्या चवीपोटीच. इतिहासकाळापासून आजपर्यंत भारतातील मसाल्यांना जागतिक बाजारपेठेत खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

भारतीय मसाल्यांची चव, त्यांचा गंध व गुणवत्ता हे अव्वल दर्जाचे आहेत आणि त्याचमुळे जागतिक बाजारपेठेत हजारो वर्षांपासून आपल्या मसाल्यांना चांगली मागणी आहे. भारतीय बाजारपेठ मसाला उद्योगासाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

भारत मसाला उत्पादन आणि निर्यात यामध्ये अग्रेसर आहे. नानाविध खाण्याच्या संस्कृती आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यानुसार त्यांचे मसालेसुद्धा. आपल्याकडे जेवणात मसाल्यांचा वापर हा केवळ चवीसाठी होत नाही, तर काही मसाले हे औषधी गुणधर्माचेही असतात. त्यांचा वापरही औषधी म्हणून केला जातो.

मसाला उद्योगाला म्हणूनच भारतीय बाजारपेठेत खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कॅच, एमडीएच, एव्हरेस्ट, बेडेकर, कुबल, बादशाह, एमटीआर ही काही नावं या क्षेत्रातली आज आपल्याला खूपच चांगली माहीत आहेत.

आपल्या देशात या उद्योगासाठी आवश्यक सर्वच गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे नव्याने या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे. मसाले म्हटलं की, भारतीय मसाले ही प्रांतानुसार पुन्हा बदलत जातात. प्रत्येकाची स्वत:ची वेगळी चव असते आणि त्यानुसार ग्राहकही. सुरुवातीला व्यवसाय सुरू करताना घरगुती स्वरूपात गृहउद्योग म्हणूनही सुरू करता येण्यासारखा हा व्यवसाय आहे.

कमीत कमी गुंतवणूक करूनही सुरुवात करता येईल. मसाले उद्योगासाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे मसाल्याची चव कळणे गरजेचं आहे. आपल्या नातेवाईक, शेजारीपाजारी यांच्या संभाव्य ग्राहकांपासून आपली सुरुवात होऊ शकते.

बाजारपेठेचा अभ्यास करून हळूहळू आपल्या उत्पादनामध्ये सुधारणा करत वाढही करू शकता. मसाला व्यवसाय सर्वसामान्यपणे कोणीही सुरू करू शकतो. एकदा तुम्ही स्थिर झालात, की वाढ होणारच.

मसाल्यांचे अनेक प्रकार आज बाजारात उपलब्ध असतात. उदा. घ्यायचे झाल्यास गरम मसाला, चिकन, मटन, छोले, सांबर, चाट, सब्जी मसाला, पावभाजी मसाला, पापड मसाला, चहा मसाला, इत्यादी ही उदाहरणे देण्याचा उद्देश म्हणजे यापैकी एखाद्या मसाल्यापासून आपण नक्कीच सुरुवात करू शकतो.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?