स्वत:चा बांधकाम व्यवसाय कसा सुरू कराल?

नागरी बांधकाम उद्योगावर लेख लिहिणे योग्य होईल असे मला वाटले. या व्यवसायात प्रवेश करण्याबद्दल काही मिथके आहेत. त्याबाबत स्पष्टिकरण करण्याचा उद्देश या लेखामागे आहे.

‘हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी’, ‘टाटा रियल्टी आणि इन्फ्रास्ट्रक्चर’, ‘लेटॉन इंडिया’, ‘कॉन्टिनेन्टल इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन’ व ‘अफकॉन्स’ यासारख्या बांधकाम उद्योगातील नामांकित बड्या कंपन्यामध्ये तीस वर्षांहून अधिक काळ काम करताना खूप काही शिकता आले.

योग्य अभ्यासानंतर आणि उद्योगाच्या भविष्यातील गरजा समजून घेतल्यानंतर या क्षेत्रात प्रवेश केला पाहिजे. येथे खूप वाव आहे, परंतु एखाद्याने धीर धरणे, चिकाटी, संयम ठेवणे आणि कष्ट घेणे आवश्यक आहे. यशाचे मुख्य गुणधर्म म्हणजे आमच्या नियोक्ते आणि कंत्राटदार यामधील पारदर्शकता आणि विश्वास.

बांधकाम ही एक सामान्य संज्ञा आहे, ज्याचा अर्थ वस्तू, प्रणाली किंवा संस्था घडवण्याची कला व शास्त्र आहे व ते लॅटिन construction (con = एकत्र आणि struction = एकावर एक ठेऊन ढीग रचणे) आणि जुन्या फ्रेंच कन्स्ट्राक्शनपासून येते. बांधकाम करणे हे क्रियापद आहे: उभारणी किंवा बांधणी याचे कार्य व बांधकाम हे नाम आहे. कसे काही बांधले जाते व त्याच्या संरचनेचे स्वरूप.

बांधकाम, त्याच्या सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणार्‍या संदर्भात, इमारती, पायाभूत सुविधा, औद्योगिक सुविधा आणि त्यांच्या जीवनकालाच्या अंतापर्यंत संबंधित कार्ये पोहोचण्याच्या प्रक्रियांचा समावेश होतो. हे सहसा नियोजन, वित्तपुरवठा आणि आराखडा यापासून सुरू होते आणि मालमत्ता तयार होईपर्यंत आणि वापरासाठी तयार होईपर्यंत चालू राहते.

बांधकामात मालमत्ता दुरुस्ती आणि देखभाल काम, वाढ, विस्तार आणि सुधारणा यांची कोणतीही कामे आणि तिचे अंतिमत: सेवेतून मागे घेणे, विघटन किंवा विनाश हेदेखील समाविष्ट होते.

उद्योग क्षेत्र म्हणून जागतिक एकूण घरगुती उत्पादनाच्या दहा टक्क्यांपेक्षा (विकसीत देशांमधील सहा ते नऊ टक्के) जास्त बांधकामाचा हिशेब लागतो आणि जागतिक स्तरावर सुमारे सात टक्के कामगारांना काम देते.

बांधकाम उद्योग क्षेत्रे

सर्वसाधारणपणे, बांधकामाची तीन क्षेत्रे आहेत : इमारती, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक. इमारत बांधकाम सामान्यत: निवासी आणि अनिवासींमध्ये विभागले जाते. पायाभूत सुविधा, ज्यांना जड नागरी किंवा जड अभियांत्रिकीदेखील म्हणतात, मोठ्या सार्वजनिक कामे, धरणे, पूल, महामार्ग, लोहमार्ग, पाणी किंवा सांडपाणी आणि उपयोगिता वितरण यांचा समावेश आहे.

औद्योगिक बांधकामामध्ये किनार्‍यापासून दूरची बांधकामे (मुख्यत: उर्जा प्रतिष्ठानांची), खाणकाम आणि उत्खनन, शुद्धीकरण कारखाने, रासायनिक प्रक्रिया, वीजनिर्मिती आणि उत्पादन संयंत्र यांचा समावेश आहे.

इमारत बांधकाम

इमारत बांधकाम ही जमीन असलेल्या क्षेत्रात संरचना उभारण्याची प्रक्रिया आहे, ज्यास वास्तविक मालमत्ता स्थाने म्हणूनदेखील ओळखले जाते. थोडक्यात, मालमत्तेच्या मालकाद्वारे (जो वैयक्तिक किंवा एखादी संस्था असू शकतो) किंवा बरोबर प्रकल्प प्रेरीत केला जातो; कधीकधी सार्वजनिक वापरासाठी जमीन अनिवार्यपणे मालकाकडून खरेदी केली जाऊ शकते.

निवासी बांधकाम

निवासी बांधकाम वैयक्तिक जमीन मालक (स्वत:च बांधणी), तज्ज्ञ घरबांधणी, मालमत्ता विकासकांद्वारे, सामान्य कंत्राटदारांद्वारे किंवा सार्वजनिक किंवा सामाजिक गृहनिर्माण प्रदाते (उदा. स्थानिक अधिकारी, गृहनिर्माण संघ/मंडळ) करू शकतात. जेथे स्थानिक विभागीकरण किंवा नियोजन धोरणे परवानगी देतात, मिश्र-वापर-विकासामध्ये निवासी आणि अनिवासी दोन्ही बांधकाम असू शकतात (उदा. किरकोळ व्यापारी जागा, विश्रांती गृहे, कार्यालये, सार्वजनिक इमारती इ.).

निवासी बांधकाम पद्धती, तंत्रज्ञान आणि संसाधने स्थानिक इमारत प्राधिकरण नियम आणि आचारसंहिता यांना अनुरूप असणे आवश्यक आहे. त्या क्षेत्रामध्ये सहज उपलब्ध सामग्री सामान्यत: वापरले जाणारे बांधकाम साहित्य ठरवते.

घरांच्या प्रति चौरस मीटर (किंवा प्रति चौरस फूट) आधारावर बांधकाम खर्च स्थळ स्थान यांची स्थिती, प्रवेश मार्ग, स्थानिक नियम, मोठ्या प्रमाणाची काटकसर आपल्या पसंतीच्या आराखड्याचे एखादे (छोट्या प्रमाणावर) घर बांधणे बहुधा अधिक महाग असते आणि कुशल कामगाराच्या उपलब्धता या आधारे नाटकीयरित्या बदलू शकतात.

अनिवासी बांधकाम

इमारतीच्या प्रकारानुसार स्थानिक रहिवासी, शैक्षणिक आणि धार्मिक संस्था, वाहतूक उपक्रम, किरकोळ विक्रेते, पथिकाश्रम मालक, मालमत्ता विकासक, वित्तीय संस्था आणि इतर खासगी कंपन्यांसह विविध प्रकारच्या खासगी आणि सार्वजनिक संस्थांद्वारे निवासी-रहिवासी इमारत बांधकाम खरेदी केले जाऊ शकते. या क्षेत्रांमधील बहुतेक बांधकाम सामान्य कंत्राटदारांमार्फत केले जातात.

पायाभूत सुविधा

स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये भौतिक आणि नैसर्गिकरीत्या तयार केलेल्या वातावरणाची रचना, बांधकाम आणि देखभाल यासह सार्वजनिक रस्ते, पुल, कालवे, धरणे, बोगदे, विमानतळ, पाणी व सांडपाणी व्यवस्था, नळमार्ग आणि लोहमार्ग यांचा समावेश आहे.

औद्योगिक बांधकाम

यामध्ये सामान्यत: किनार्‍यापासून दूरचे बांधकाम, खाणकाम आणि उत्खनन, शुद्धिकरण कारखाने, विद्युत केंद्रे, पोलाद गिरण्या, गोदामे आणि इतर कारखाने यांचा समावेश आहे.

इतर नानाविध बांधकामे

काही बांधकाम प्रकल्प लहान नुतनीकरणे किंवा दुरुस्तीची कामे जसे की रंगकाम, फरसबंदी, नळकाम इत्यादी असतात. तथापि, अधिक गुंतागुंतीच्या किंवा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये सहसा अतिरिक्त बहुशास्त्रीय कौशल्य आणि मनुष्यबळ आवश्यक असते, म्हणून मालक तपशीलवार नियोजन, आराखडा व बांधकाम करण्यासाठी एक किंवा अधिक विशेषज्ज्ञ व्यवसायांना लावू शकतो.

बहुतेक वेळा मालक या प्रकल्पाची देखरेख करण्यासाठी विशेष तज्ज्ञांची नेमणूक करू शकतात. (हे आरेखक/आराखडा काढणारे, कंत्राटदार, बांधकाम व्यवस्थापक किंवा इतर सल्लागार असू शकतात) अशा तज्ज्ञांना सामान्यत: प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये त्यांच्या नैपुण्यासाठी नियुक्त केले जाते.

ते मालकास प्रकल्पाची संक्षिप्त व्याख्या करण्यासाठी, अंदाजपत्रक व वेळापत्रक यावर सहमतीकरता, संबंधित सार्वजनिक अधिकार्‍यांशी संपर्कात राहण्यासाठी आणि इतर तज्ज्ञ उपकंत्राटदारासह पुरवठा साखळीच्या सेवा मिळवण्याकरता मदत करतात.

नियोजन

जेव्हा लागू होऊ शकेल तेव्हा प्रस्तावित बांधकाम प्रकल्पासाठी नियमांशी संबंधित आवश्यकतांसह स्थानिक नियोजन धोरणांचे पालन करावे लागेल. साधारणपणे एखाद्या प्रकल्पाचे मूल्यमापन क्षेत्राधिकार असलेल्या प्राधिकरणाद्वारे केले जाते. सामान्यतः महामार्ग किंवा जेथे प्रकल्प स्थित आहे, तेथे केंद्र किंवा राज्य शासनाने स्थापित केलेल्या विशेष उद्देश वाहन यांच्या बाबतीत नगरपालिका किंवा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून.

वित्त

आर्थिक नियोजन प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पुरेशा संरक्षक गोष्टी आणि आकस्मिक योजना यांची योग्य जागी तयारी आणि प्रकल्पाच्या जीवनकालात योजनेची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करते. निवारण होऊ शकते अशा आर्थिक समस्येने बांधकाम प्रकल्प ग्रासले जाऊ शकतात. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जेव्हा बांधणारे अत्यल्प पैसे मागतात तेव्हा कमी बोली होते.

जेव्हा सध्याच्या निधीच्या रक्कमेत श्रम आणि साहित्य यासाठीच्या वर्तमान खर्चाची पूर्तता केली जाऊ शकत नाही, तेव्हा रोख प्रवाह समस्या अस्तित्वात येतात; एकंदर अर्थसंकल्प पुरेसा असला तरीही तात्पुरते देणे सादर करताना अशा समस्या उद्भवू शकतात.

जेव्हा कंत्राटदाराने बदल मागणी किंवा प्रकल्पातील बदल यांना ओळखलेले असते, तेव्हा सरकारी प्रकल्पांसह खर्च वाढत जातात. सुरुवातीच्या बोलीनंतर कंत्राट एकाला दिल्यानंतर इतर कंत्राटदार विचारविनिमयातून दूर केले जातात, त्यामुळे ही नंतरची वाढीव कामे, खर्च जेव्हा इतर कंत्राटदारांकडून स्पर्धेच्या अधीन नसतात.

कायदे-संबंधित

बांधकाम प्रकल्प हे बांधकाम करारांचे आणि इतर कायदेशीर जबाबदार्‍यांचे एक गुंतागुंतीचे जाळे आहे. त्या जाळ्यातील प्रत्येक पक्षाने काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. करार म्हणजे दोन किंवा अधिक पक्षांमधील बंधनांच्या संचाची देवाणघेवाण आणि तो समस्यांचे व्यवस्थापनासाठी रचना पुरवतो.

उदाहरणार्थ, बांधकाम विलंब महाग पडू शकतात म्हणून बांधकाम करारात विलंब व्यवस्थापित करण्यासाठी स्पष्ट अपेक्षा आणि स्पष्ट मार्ग ठेवले जातात. निकृष्ट मसुद्याचा करार गोंधळ आणि महागडे विवाद याकडे घेऊन जाऊ शकतो.

व्यवसाय म्हणून बांधकाम

तरुण उद्योजक व्यवसाय म्हणून बांधकामकडे पाहू शकतात. अशा काही संधी अधिक ठळक करण्यासाठी खाली देत आहोत. पूर्व-ओतीव तंत्रज्ञानाचा वापर करून इमारत बांधकाम-पोलाद किंवा पूर्व-ओतीव काँक्रिट घटकांचा वापर करून इमारतींच्या बांधकामासाठी पूर्व-ओतीव तंत्राचा वापर हा बांधकामातील असा एक व्यवसाय असू शकतो. हे तंत्रज्ञान सध्या प्राथमिक टप्प्यावर आहे आणि त्यासाठी बरेच संशोधन आणि संयम आवश्यक आहे.

आमच्या दृष्टीने हे भविष्यातील तंत्रज्ञान असेल. ही प्रणाली पश्चिमी देशात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आपल्या आवश्यकतानुसार छोटे बदल त्यात आवश्यक आहेत.

निवासी इमारतींचे नूतनीकरण-सदनिकांमध्ये सामान्यत: नवीन फरसबंदी, रंगकाम, स्नानगृह जोडणी इत्यादींच्या नियमित देखभालीची आवश्यकता असते. हा व्यवसाय प्रचंड संधी प्रदान करतो.

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे पूर्व-ओतीव बांधकाम-महानगरीय लोहमार्ग बांधण्याच्या बाबतीत बहुतेक भारतीय शहरांचे रूप सध्या आमूलाग्र बदलांतून जात आहे. महानगरीय लोहमार्गाच्या बांधकामांसाठी विविध स्थानिक घटकांवर अवलंबून साधारणत: दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो.

छोटे नगर विकासक : एखाद्याला छोट्या-नगरांचा विकासक होण्याची आकांक्षा असू शकते. या प्रकारात त्या उद्योजकाला तांत्रिक ज्ञानाखेरीज कायदेशीर आणि आर्थिक आवश्यकतांचे पक्के ज्ञानही असणे आवश्यक आहे.

काँक्रीटच्या तयार मिश्रणाची निर्मिती : यासाठी तुमचा जोडीदार म्हणून अनुभवी काँक्रीट तंत्रज्ञासह काँक्रीटचे पक्के ज्ञान आवश्यक आहे. काँक्रीटच्या तयार मिश्रणाच्या वापराचा कल छोट्या-मोठ्या शहरांमध्ये झपाट्याने वाढत आहे.

थोडक्यात एखादी व्यक्ती व्यवसाय किंवा धंदा म्हणून बांधकाम उद्योगाचा धांडोळा घेऊ शकते. सामान्यत: संयम, पारदर्शकता आणि विपणन कौशल्य आवश्यक आहे. आपल्या ग्राहकांबरोबर पारदर्शकता ही यशाची गुरुकिल्ली आहे.

या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एकदा स्थापत्य अभियंता असणे आदर्शवत असले तरीही माझ्या दृष्टीने हा अडथळा वाटायची गरज नाही. सर्वात महत्त्वाची आवश्यकता आहे ती तज्ज्ञांकडून शिकण्याची क्षमता व कल.

– उदय वर्तक
संपर्क : 9971391050
udayrvartak@yahoo.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?