ग्रामीण भागातील मुलांना शाळेची ओढ लावणारे ‘ई-प्रशाला’

‘ई-प्रशाला’ या स्टार्टअपची सुरुवात ग्रामीण भागातील मुलांचा शिक्षणाचा दर्जा उंचवावा, त्यांना शाळेची ओढ लागावी आणि नापासांचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने २०१० साली झाली. संगणक विकणे, संगणकसंबंधित भागांचा पुरवठा करणे, लॅपटॉप विकणे, दुरुस्ती करणे यांसारखी कामे करून आणि विद्युत प्रदर्शनांना भेट देऊन अनुभवात वाढ झाली.

सततच्या बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे यात बदल होत गेले आणि ई-प्रशालाची निर्मिती झाली. ई-प्रशाला ही सोल प्रोप्रायटरी फर्म आहे. नेहमीचा व्यवसाय करतानाच सामाजिक जाणिवेची भावना मनात होती. त्यातून स्टार्टअपकडे बघण्याचा दृष्टिकोन दृढ होत गेला आणि पूर्ण लक्ष त्यावरच केंद्रित करण्याचा निश्चय केला.

गेल्या पाच वर्षांत आम्ही हजारहून अधिक शाळा डिजिटल केल्या आहेत. त्याचा लाभ पाच लाखांहून अधिक गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना होत आहे. येत्या वर्षांमध्ये आम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा व शाळेतील प्रत्येक वर्ग डिजिटल करावयाचा आहे.

ई-प्रशाला आज बारा जणांच्या रोजगाराचे निमित्त बनले आहे. आम्ही तयार केलेला प्रोजेक्टर हा एल.ई.डी.वर आधारित असल्याने अत्यंत कमी विजेवर म्हणजे ११० व्हॉल्टवर ही प्रणाली चालते. सौरऊर्जा, पवनचक्की, इन्व्हर्टर बॅटरीच्या साहाय्यानेही गरज भागवता येते. प्रोजेक्टरमध्येच संगणक असून त्यात पहिली ते दहावीचा सर्व अभ्यासक्रम आहे. कुठल्याही भिंतीच्या पृष्ठभागाचा आपण फळ्याप्रमाणे उपयोग करू शकतो.

या प्रोजेक्टरचे वजनही कमी (पाच किलो) असल्यामुळे हाताळण्यासही सोपा आहे. जर का आम्हाला योग्य फंडिंग किंवा एंजल गुंतवणूकदार मिळाले तर आम्ही आमचा हा प्रोजेक्ट भारतभरच नाही तर जगभर नेऊ शकतो. २५०० हून अधिक तरुणांना रोजगार देऊ शकतो, कारण आम्हाला याची खात्री आहे की, आमच्या या तंत्रज्ञानाला जगभरात तोड नाही.

जर आमच्या प्रोजेक्टची व्याप्ती मोठ्या प्रमाणात झाली तर नक्कीच आम्हाला शेअर बाजारात नोंदणी करायला आवडेल. भारतातील प्रत्येक मुलाला शिक्षणाची ओढ लागावी, त्याने पुढे उच्च शिक्षण घेऊन केवळ नोकरीमागे न पळता स्वयंरोजगार करावा, आपल्या गावातील मुलांनी पिढीजात व्यवसाय तसाच चालू न ठेवता त्या व्यवसायाला पुढे नेऊन जागतिक पातळीचा दर्जा द्यावा, असा आमचा संकल्प आहे.

– संपर्क : ९८६९०६५२५३


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?