नवउद्योजकांना सहकार्य करण्यासाठी ‘TiE Pune Nurture mentoring program’

नवोदित उद्योजकांना यशस्वी होण्याकरता मदत करण्याच्या उद्देशाने सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीवर स्थानिक पातळीवर उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने २००७ साली ‘TiE पुणे’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. TiE पुणेचा ‘Nurture’ हा उद्योजकांना मार्गदर्शन करणारा व यश मिळवून देणारा उपक्रम आहे, जिथे उत्तम उदोजकांचे मार्गदर्शन मिळेल. आता जगभरातील नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी या उपक्रमाचे ‘TiE’ तर्फे ६२ चॅप्टर्स होणार आहेत.

या संदर्भात अधिक माहिती देताना TiE ग्लोबलचे बोर्ड सदस्य किरण देशपांडे म्हणाले की, “दहा वर्षांपूर्वी आमच्यातील काही TiE पुणे चॅप्टर्सच्या सदस्यांनी तरुण स्टार्टअप्सना मदत करणारा एक मार्गदर्शक उपक्रम करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही जे बिझनेस स्कूलमध्ये शिकता त्याऐवजी, जे आम्ही वास्तविक जीवनात अनुभवले आहे त्याचा वापर उद्योजकांना मदत करण्यासाठी केला. उद्योगाचे असे खरे धडे तुम्हाला उद्योजकांकडून शिकायला मिळत नाहीत ते या nurture मध्ये मिळतात आणि हेच आमच्या या उपक्रमाला इतरांपेक्षा वेगळे करते.”

गेल्या दहा वर्षांत २५० हून अधिक उद्योजक TiE Nurture मधून शिकून गेले आहेत. २०१२ मध्ये केवळ ४ स्टार्टअप्ससह सुरुवात करून, TiE पुणे Nurture-१० मध्ये पुणे, हुबळी, नागपूर, सुरत आणि मध्य प्रदेशातील साठहून अधिक उद्योजक होते. जागतिक उपक्रमात योगदान देत, आता सर्व TiE चॅप्टरचा जागतिक स्तरावर विस्तार केला जात आहे. TiE Pune Nurture या जागतिक उपक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल जे, बोस्टनचे TiE Scale-It, दुबई चे TiE Mentoring, कोबाचे TiE Atlanta आणि TiE सिएटलने तयार केलेले TiE इन्स्टिट्यूट या चॅप्टर्समधील कार्यक्रमांना आत्मसात करेल.

नर्चर एक्सेलरेटर हा आता जागतिक कार्यक्रम बनला असताना, TiE पुणेने दोन स्थानिक व्यावसायिक महिलांना जागतिक नकाशावर आणण्यास मदत केली आहे. पारुल गंजू (अहममुने बायोसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड) आणि डॉ. अनुया निसाल (सेरिजन मेडिप्रॉडक्ट्स) यांनी TiE च्या ‘जागतिक महिला उद्योमी स्पर्धा’ स्पर्धेत भाग घेतला आणि त्यांनी विजय मिळवला.

पारुलने २५ हजार अमेरिकन डॉलरचे उपविजेतेपदाचे पारितोषिक जिंकून जागतिक स्तरावर अंतिम फेरीत प्रवेश केला आणि अनुया हिला भारतीय स्पर्धेची विजेती म्हणून घोषित केले. पुढे या दोघींनी त्यांच्या पुणेस्थित कंपन्यांचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी सर्व ६२ TiE चॅप्टर्समधील व्यावसायिक नेटवर्कचा लाभ घेतला.

TiE महिला उपक्रमाचे प्रमुख ‘झेलम चौबल’ म्हणाल्या की, “TiE ला विश्वास आहे की महिला उद्योजकांना त्यांची खरी क्षमता ओळखण्यासाठी पूर्ण पाठबळ मिळणे आवश्यक आहे. याशिवाय आम्ही त्यांच्यासाठी अनेक गोष्टी करतो, जसे की आम्ही उद्योजक महिलांसाठी एक विशेष जागतिक स्पर्धादेखील चालवतो ज्यामधून आमच्या पुण्यातील दोन महिला उद्योजिका, पारुल गंजू आणि अनुया निसाळ यांना भरपूर लाभ मिळालेला आहे. TiE पुणे महिला उद्योजकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.”

TiE पुणे हे टोकियो-आधारित जागतिक सिस्टीम इंटिग्रेटर NTT DATA साठी एक अनोखा कार्यक्रम चालवते. NTT DATA ही जपानच्या NTT ग्रुपची सदस्य कंपनी आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, उत्पादने आणि सेवांमधील नावीन्य जपण्यासाठी तरुण उद्योजक आवश्यक आहेत.

TiE पुणे हा NTT DATA चा स्टार्टअप भागीदार आहे, ज्यामध्ये TiE पुणे NTT DATA साठी भारतातून आणि जगभरातून स्टार्टअप्सबद्दलच्या माहितीसाठीचा महत्त्वाचा आधार आहे. जेव्हा NTT DATA एखाद्या स्टार्टअप्सची निवड करते, त्यानंतर ते त्यांच्याबरोबर व्यवसायासाठी लागणारी रणनीती तयार करते. NTT DATA आणि निवड झालेल्या स्टार्टअपसाठी हा एक विजयाचा मार्ग आहे. २०१८ मध्ये फक्त पुणे, बंगळुरू आणि मुंबईपासून सुरू झालेला हा कार्यक्रम आता जागतिक स्तरावर TiE पुणे द्वारे चालवला जात आहे.

यावर कार्यक्रमाचे संस्थापक आणि TiE पुणे चॅप्टर्स सदस्य अजित पाटील म्हणाले की, “TIPP- NTT DATA – TiE स्टार्टअप कनेक्ट प्रोग्राम वर्षानुवर्षे मजबूत होत आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे १९ विविध देशांतील सातशेपेक्षा जास्त जागतिक कंपन्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. यापैकी सत्तरहून अधिक कंपन्यांनी NTT DATA च्या टीमला भेट दिली असून सहयोग शोधण्याच्या विविध टप्प्यांवर आहेत. जागतिक ग्राहक आधार आणि NTT DATA ची ओळख व पोहोच यांचा सहयोगी कंपन्यांना मोठा फायदा होत आहे.”

आपल्या उद्योजकतेच्या भावनेनुसार, TiE पुणे ने आता TYE (TiE विद्यार्थी उद्योजक) सुरू केले आहे. ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढवणे आहे. यावर TiE पुणे अध्यक्ष, विनीत पटनी म्हणाले की “आमचा असा विश्वास आहे की, आमच्या विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकरी देणारे व्हायला हवे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची कल्पना रुजवण्यासाठी आम्ही आमची पहिली ‘TYE बिझनेस प्लॅन स्पर्धा’ चालवली ज्यामध्ये पुणे आणि आसपासच्या ४८ कॉलेजेसमधून ५७० विद्यार्थी सहभागी झाले होते. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, TiE पुणेत सहभागी व्हा.”

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?