कोणत्याही कंपनीचे यश हे तिथे काम करणार्या कर्मचार्यांवर अवलंबून असते. त्यांनी आपले काम नीट केले तर त्या कंपनीच्या यशाची घोडदौड कोणी रोखू शकत नाही.
यासाठी कंपनीच्या प्रमुखाची मुख्य जबाबदारी असते. हे एक सांघिक कार्य असते त्यामुळे या संघाला जोडणारा त्यांचा प्रमुख ही भूमिका कसा पार पडतो त्यावर सारे अवलंबून असते.
नवा व्यवसाय आहे? व्यवसाय ठप्प झालाय? व्यवसायाची गती कमी झालीय असे कोणत्याही प्रकारचे कारण असेल त्या प्रत्येकाला या लेखातून मदतच मिळेल.
चांगल्या टीम लीडरची नियुक्ती करा
चांगला टीम लीडर इतरांना नेहमी प्रेरित करतो. तो रोल मॉडेल म्हणून काम करत असतो. त्यांच्या कर्मचार्यांना प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि मदत करण्यास नेहमी पुढे असतो.
एखाद्या कंपनीत किंवा प्रकल्पात टीम लीडर चांगला नसेल तर इतर कर्मचारीही नीट काम करत नाहीत. दुसरीकडे नेता चांगला असेल तर त्याच्यापासून प्रेरणा घेऊन इतर कर्मचारीही काम करतात.
त्यामुळे कर्मचार्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रशिक्षित केले पाहिजे, जेणेकरून ते इतर कर्मचार्यांचे मनोधैर्य वाढवू शकतील, त्यांच्या समस्या ऐकून घेण्यास आणि उपाय सांगण्यास नेहमी तत्पर असतील.
शिक्षण आणि विकासासाठी संधी प्रदान करा
कोणत्याही कंपनीमध्ये कर्मचार्यांचे योगदान वाढवण्यासाठी शिक्षण आणि विकासामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. शैक्षणिक संधी निर्माण केल्याने त्यांना असे दिसून येते की; तुम्ही त्यांचा विचार करता.
त्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्यास आणि त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यास मदत करता. कर्मचार्यांचे कौशल्य अद्ययावत ठेवल्याने कंपनीचा फायदा होतो; पण त्याचा परिणाम कर्मचार्यांवरही होतो.
यासाठी मोटिव्हेशनल स्पीकरही तुम्हाला साहाय्य करू शकतात. ज्यामुळे कर्मचार्यांना अधिक शिकण्यास आणि पुढे जाण्यास प्रवृत्त होईल आणि ते अधिक चांगले काम करतील आणि उत्पादकता आपोआप वाढू लागेल.
परस्परात संवाद साधा
कोणत्याही उद्योगात अंतर्गत संवाद आवश्यक असतो. अनेक वेळा मोठे नेते आपापसात बोलून कोणताही निर्णय घेतात, त्याचा थेट परिणाम तेथील काम करणार्या कर्मचार्यांवर होतो. कंपनीत आपले महत्त्व नाही, असे वाटल्याने ते नीट काम करू शकत नाहीत. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी पुढे पोहोचत नाहीत. म्हणून अंतर्गत संवाद चालू ठेवा.
उपलब्धी ओळखा
कामाच्या ठिकाणी कर्मचार्यांची उत्पादकता वाढवण्याचा एक मार्ग म्हणजे कर्मचार्यांचे मनोबल वाढवणे. यासाठी कर्मचार्यांच्या कामाचा वेळोवेळी गौरव केला पाहिजे. म्हणूनच नियमित अंतराने पुरस्कार आणि मनोबल वाढवणारे कार्यक्रम आयोजित करणे महत्त्वाचे आहे.
यातूनच इतर कर्मचार्यांचे अधिक काम करण्याचे मनोबल वाढते. आपलीही दखल घेतली जाईल हा विश्वास त्यांच्यात निर्माण होत राहील. यातूनच ते पूर्ण सहकार्य करण्यास तयार होतील.
कर्मचार्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या
निरोगी मनातूनच नवीन कल्पना निर्माण होतात. यासाठी आज कंपन्या केवळ कामावर लक्ष केंद्रित करत नाहीत तर कर्मचार्यांच्या सर्वांगीण विकासाचीही काळजी घेतात, त्यामुळेच आज अनेक कंपन्या आपल्या कर्मचार्यांच्या मानसिक विकासाकडे लक्ष देतात. त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतात.
कर्मचार्यांची विचारशक्ती चांगली असेल तर तो आपले काम अगदी सहजतेने करतो आणि कंपनीच्या विकासासाठी आपल्या सूचनाही देतो. म्हणूनच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची वेळोवेळी काळजी घ्या.
आपण कर्मचारी सहाय्य कार्यक्रम, विनामूल्य समुपदेशन आणि इतर संसाधनेदेखील व्यवस्थापित करू शकता जेणेकरून त्यांना तणावाचा सामना करण्यास मदत होईल. त्यामुळे उत्पादकता वाढण्यास मदत होईल.
या पद्धतींच्या मदतीने तुम्ही कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी अधिक काम करण्यास प्रवृत्त करू शकता कारण जर कर्मचार्यांची उत्पादकता चांगली असेल तर तुमच्या कंपनीला किंवा स्टार्टअपला पुढे जाण्यापासून कोणीही आणि काहीही रोखू शकत नाही.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.