नवीन उद्योजक घडवण्यासाठी ‘इ-टॅक्सवाला’ची पायाभरणी करणारे वैजनाथ गाडेकर

नोकरीपेक्षा व्यवसायाला प्राधान्य द्यायचे आहे? व्यवसाय सुरू करायचा आहे, पण माझ्या घरात आजवर कोणी व्यवसाया केला नाही. आयडिया आहे, पण प्रत्यक्षात कशी उतरवू शकतो? यापैकी अनेक प्रश्न आजच्या काळात व्यवसाय करू इच्छिणार्‍या प्रत्येकाला पडतात.

व्यवसायाची कल्पना येण्यापासून ते ती प्रत्यक्षात उतरवून त्याला मूर्तरूप देण्यापर्यंत उद्योजकीय प्रवासात साथ देते ‘इ-टॅक्सवाला’. या ‘इ-टॅक्सवाला’बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी जाणून घ्यावं लागेल ‘इ-टॅक्सवाला’चे संस्थापक वैजनाथ गाडेकर यांच्याविषयी.

वैजनाथ अंबादास गाडेकर हे मूळचे संभाजीनगरचे. त्यांचा मूळ व्यवसाय शेती. ते मोठ्या कुटुंबात जन्माला आले. त्यांना तीन भाऊ आहेत. वडिलांनी कष्ट करून चौघांना चांगले शिक्षण दिले. चौघेही भाऊ अनुक्रमे सीए, इंजिनीयर, डॉक्टर आणि एमबीए असे शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत.

वैजनाथ यांच्या घरात शिक्षणाचं वातावरण होतं. त्यांना शेतीची प्रचंड आवड होती. तरीही घरून शिक्षणासाठी आग्रह झाला आणि अर्थार्जनासाठी शेतीसोबतच शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर स्वत:च्या पायावर उभे राहण्याला त्यांनी प्राधान्य दिले.

ते लौकिकदृष्ट्या चार्टर्ड अकाउंटन्ट झाले. सीए म्हणून शिक्षण घेतलेले इतर व्यावसायिक जे करतात, त्यापेक्षा काही वेगळं करता येईल का याचा विचार त्यांनी पाच वर्षापूर्वी केला. एका व्यवसायासाठी आवश्यक असणार्‍या जीएसटी, अकाऊंटीग, टॅक्सेशन इत्यादी सेवा ऑनलाईन आणण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला. यातूनच जन्म झाला ‘इ-टॅक्सवाला’चा.

वैजनाथ ज्या भागात, शहरात राहतात तिथे उद्योगाकडे वळणार्‍यांची संख्या कमी आहे. तिथे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी खूप उपलब्ध आहेत, पण खूप कमी तरुण त्याकडे वळतात.

‘इ-टॅक्सवाला’च्या माध्यमातून गाडेकरांनी तरुणांसाठी स्टार्टअप कन्सल्टन्सी सुरू केली. जे तरुण व्यवसायात उतरतील, त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणार्‍या सेवांपासून अकांऊंटींग, टॅक्सेशनसह सर्व प्रकारच्या सेवा त्यांनी उपलब्ध केल्या.

वैजनाथ गाडेकर यांनी त्यांच्या कामाची प्रक्रिया सांगितली. सुरुवातीला बिझनेसची आयडिया ऐकून घेणे, समजून घेणे, प्रॉडक्ट कुठले असावे याचा अ‍ॅनालिसीस आणि मार्केट रिसर्च करणे ही पहिली पायरी आहे.

त्यानंतर बिझनेस प्लॅन तयार करणे. व्यवसायाचा सर्वच दृष्टीने विचार करून त्यासाठी ब्रेनस्टॉर्मिंग करणे ही दुसरी आणि महत्त्वाची पायरी असते. त्यानंतर सुरुवात होते ती व्यवयाय सेटअप करण्याला.

व्यवसायाचे स्वरूप, सेवा, प्रॉडक्ट निश्चित करणे, त्यासाठी व्यवसायाचे मार्केटिंग, ऑडिटींग, टेक्निकल तसेच अकांउंटींग असे व्यवसायाच्या गरजेनुसार डिपार्टमेंट्सची रचना करणे हे व्यवसायाच्या पायाभरणीचे काम केले जाते.

पाया भक्कम तर पुढची इमारत भक्कम होते यावर गाडेकरांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे मजबूत इमारतीसाठी पाया मजबूत केला जातो. यानंतर व्यवसायाला खर्‍या अर्थाने सुरुवात होते.

नवीन उद्योजकांना आपल्या अनुभवरून गाडेकर असा सल्ला देतात की, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आपली आवड ओळखा. आपल्यातली कौशल्य जाणून घ्या आणि व्यवसायाच्या दृष्टीने काही इनोव्हेटीव्ह संकल्पना घेऊन आपले वेगळेपण जपता येणे शक्य असेल तर ते जरूर करा.

तुम्ही ज्या क्षेत्रात काम करु इच्छित असाल तर नवनवीन गोष्टी शिकण्याला प्राधान्य द्या. व्यवसायाचे एक ध्येय निश्चित करा आणि त्यावर आपले लक्ष केंद्रित करा, सकारात्मक दृष्टीने प्रयत्न करत राहिल्यास यश तुमचेच आहे.

प्रत्येक नवीन गोष्ट करताना यश अपयश हे दोन्हीही येते. आपण येणार्‍या प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहिले पाहिजे. अपयशाने खचून न जाता प्रयत्न करत राहिले पाहिजे तर यशाने हुरळून न जाता सातत्य ठेवले पाहिजे.

व्यवसाय करण्यासाठी आपल्यामध्ये काही कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचे व्हिजन, ध्येय अर्थात गोल सेट करणे. त्यानुसार आपल्या व्यवसायाला आवश्यक कौशल्य असणारे मनुष्यबळ निवडणे आणि त्यांना प्रशिक्षित करणे.

या सगळ्यासाठी तुमच्यामध्ये नेतृत्वगुण असायलाच हवे. याचसोबत जनसंपर्क, संवाद कौशल्य आणि सतत अपडेटेड राहावे लागते. व्यवसायात कालानुरुप होणारे बदल समजून घेऊन आत्मसात करता आले पाहिजेत.

संपर्क : वैजनाथ गाडेकर – 9420673568

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?