तुमचे कपडे खुलवतात तुमचे व्यक्तिमत्त्व!

सुंदर, आकर्षक दिसायला आवडत नाही असा व्यक्ती सापडणे दुर्मिळच. खरं तर आपले कपडे हे आपले व्यक्तिमत्त्व खुलवतात. असं म्हणतात की व्यक्ती ही त्याच्या dress आणि address वरून ओळखली जाते. आपण ज्या प्रकारचे कपडे परिधान करतो त्यावरून आपले व्यक्तिमत्त्व समोरच्यांना कळते. ते त्याचा अंदाज बांधतात.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे योग्य ड्रेसिंगचा किंमतीशी काहीही संबंध नसतो. हे आपण अगोदर लक्षात घ्यायला हवे. आपण परिधान केलेले कपडे हे आपला मूड, आपले चरित्र, शैली, व्यक्तिमत्त्व, स्वभाव दर्शवते. व्यक्ती तितक्या प्रकृती असे आपण म्हणतो ते उगाच नाही.

कोणी जाड कोणी बारीक, कृश, गोरा, सावळा, काळा म्हणजेच रंग, वजन सारेच वेगळे. त्यामुळे आपले कपडे आपल्याला त्यानुसारच आपले व्यक्तिमत्त्व खुलवायला मदत करतात.

कपडे निवडताना कोणती काळजी घ्यावी?

१. जे परिधान करू ते व्यवस्थित आणि नीटनेटके असल्याची खात्री करा. ड्रेस महागडा आहे म्हणून तो चांगला दिसेलच असे नाही. स्वच्छ आणि इस्त्री केलेला एखादा साधा कपडाही आपल्यावर खुलून दिसू शकतो, जेव्हा तो विचारपूर्वक निवडलेला असतो.

२. कोणी इतरांनी घातलेले कपडे त्याला चांगले दिसतात म्हणून स्वत:साठी ते निवडू नका. कारण ते तुम्हाला चांगले दिसतीलच असे नाही.

३. जीन्स-टीशर्ट, शॉर्ट्स, डार्क रंगसंगती असणारे कपडे घातलेली व्यक्ती ही कूल व्यक्तिमत्वाची असेल. भरभरून जगणारी, आनंदी आणि अनौपचारिक प्रसंगासाठी असे कपडे घातलेली असू शकते. या उलट फिक्या रंगसंगतीचे शर्ट-पँट, सुट घालणाऱ्या व्यक्ती या व्यावसायिक, नोकरदार, किंवा प्रोफेशनल असू शकतात. सांगायचा मुद्दा हा की, आपले कपडे स्थळ, काळ, प्रसंग, या सगळ्याचं प्रतिनिधित्व करतात.

४. आपल्या दिसण्याचा, शरीरात काही व्यंग असल्यास त्याचा न्यूनगंड सोडा. प्रसंगानुरूप कपडे निवडा.

५. आपले कपडे निवडताना आपली पार्श्वभूमी, कामाचे स्वरूप, हवामान, वजन, रंग या गोष्टींचा प्रथम विचार करा.

६. तंग कपडे वापरू नका. प्रभावशाली व्यक्तिमत्त्व हवे असेल तर चांगले दिसणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रसंगानुरूप कपडे निवडणे आवश्यक असते.

७. कपड्यांवरून आपल्याला एखाद्याच्या आवडीनिवडी कळू शकतात. आपण त्याचा किमान अंदाज तरी बांधू शकतो. उदाहरणार्थ स्पोर्ट्स, स्टिकर्स हे खेळाची आवड अधोरेखित करते.

आपल्या अभिव्यक्तीसाठी कपडे हे मोठी भूमिका पार पाडतात. त्यामुळे आपण जे परिधान करतो ते काळजीपूर्वक निवडायला हवे. यातूनच आपली छाप पडते. आपली सामाजिक, मानसिक, आर्थिक स्थिती आपल्या कपड्यातून दिसते. प्रत्येकाने याचा नक्की विचार करायला हवा.

– प्रतिभा राजपूत

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?