स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
मी कोणता व्यवसाय करू? कोणत्या उद्योगसंधी फायद्याच्या असतील? असे अनेक प्रश्न व्यवसाय करू इच्छिणार्यांना असतात. अशाच संभ्रमावस्थेत तुम्हीही असाल तर खाद्य आणि त्या संबंधित बारमाही करता येतील अशा उद्योगसंधी आपण पाहू.
१. डेअरी पार्लर व्यवसाय
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
डेअरी पार्लर हा एक बारमाही चालणारा व्यवसाय आहे. दूध, दही, तूप, पनीर, चीज अशा दुग्धजन्य पदार्थांना रोजची मागणी असते. तुम्ही स्वत:चे डेअरी पार्लर सुरू केले तर योग्य जागा, आवश्यक परवाने लागतील.
गुंतवणुकीचा विचार केला तर तो व्यवसायासाठी जागा कुठे निवडली जाते. जागा भाड्याने असेल की स्वत:ची यानुसार फरक पडू शकतो. दुकानाचे फर्निचर, आवश्यक साधन सामग्री, फ्रिज किंवा छोटे कोल्ड स्टोरेज, मनुष्यबळ, वस्तुमाल या सार्यावर अवलंबून असतो. सोबत मोठ्या कंपनीची फ्रँचायझीदेखील घेऊ शकता. व्यवसायाद्वारे तुम्हाला ३० ते ४० टक्के नफा मिळू शकतो.
२. चहा आणि कॉफी शॉप व्यवसाय
चहा हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येक व्यक्तीला चहा किंवा कॉफी लागतेच. सकाळी उठले की प्रथम आपल्याला याच पेयाची आठवण येते. कामाचा ताण कमी करण्यासाठी, फ्रेश वाटावे म्हणून दिवसभरात लोक चहा-कॉफीची मदत घेत असतात. त्यामुळे चहा-कॉफीची मागणी सर्वत्र असते.
बारमाही आणि दिवसभरात कधी लागणारा चहा-कॉफी व्यवसायाला खूप संधी आहे. या व्यवसायाचा विचार केला तर हा कमी बजेटचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय तुम्ही कुठेही सुरू करू शकता.
अगदी नगण्य गुंतवणुकीतही हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. घरातून सुरुवात करून हळहळू वाढवता येऊ शकतो. आपल्या आजूबाजूच्या दुकानात, ऑफिसमध्ये ग्राहक बांधून हा व्यवसाय सुरू करता येतो. हळूहळू यासोबत स्नॅक्ससुद्धा सुरू करू शकता.
३. टिफिन सेवा व्यवसाय
नोकरी, शिक्षणासाठी बहुतेक लोक हे घरापासून दूर एकटे राहतात. काही काळ बाहेरचे खाल्ले की हळूहळू मन उबगते. आर्थिदृष्ट्याही ते सोयीचे नसते आणि घरच्या अन्नाची उणीव भासू लागते. त्यातच सतत बाहेरील खाद्यपदार्थ खाणे शरीरासाठी योग्य नसते. मग घरच्या खाद्यपदार्थांचा शोध सुरू होतो.
अशा लोकांसाठी घरासारखे अन्न पुरवण्यासाठी टिफिन सेवा व्यवसाय हा एक उत्तम पर्याय आहे आणि हा कायम चालणारा व्यवसाय आहे.
हा व्यवसाय तुम्ही अगदी कमी खर्चात किंवा शून्य खर्चात घरबसल्या सुरू करू शकता. जर तुम्हाला मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला एफएसएसएआय परवाना लागेल.
४. शीत पेय व्यवसाय
शीतपेये हा आजघडीला बारमाही चालणारा व्यवसाय आहे. विविध समारंभातसुद्धा शीतपेयांची मागणी मोठी आहे. सध्याच्या काळात कोल्ड्रिंक्सची गरज इतकी वाढली आहे की, आपल्या देशात दररोज लाखो कोटी रुपयांची शीतपेये विकली जातात. गावखेड्यापासून शहरापर्यंत, लहानांपासून मोठ्यंपर्यंत प्रत्येकाला शीतपेय आवडतात.
घाऊक विक्रेत्यांकडून खरेदी करून सुरुवात करता येईल. सुरुवातीच्या काळात सामान्य रेफ्रिजरेटर वापरा आणि तुम्हाला चालेल तेवढ्या प्रमाणात कोल्ड्रिंक्स घ्या आणि त्यानंतर तुमचा व्यवसाय चांगला चालू लागला की व्यवसायात वाढ करता येईल.
५. फ्रुट शेक व्यवसाय
कोल्ड्रिंक न आवडणारेही अनेक लोक असतात. त्यामुळे ते सर्व लोक फ्रूट शेककडे आकर्षित होतात. कोल्ड्रिंक्सची मागणी बाजारात खूप आहे, पण फ्रूट शेकची मागणीही कमी नाही. तुम्ही फ्रूट शेकचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आंबा, केळी, चिकू, संत्रे, मोसंबी, सीताफळ इत्यादी फळांच्या शेकपासून करू शकता.
या व्यवसायातसुद्धा गुंतवणुकीचा विचार केला तर कमीत कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येईल. फळ, मिक्सर ग्राईंडर, बर्फ, दूध याशिवाय ग्लास आणि इतर काही सामग्री वापरून मोक्याची जागा हेरून व्यवसायाची सुरुवात करता येईल. किशोरवयीन मुले, कॉलेज विद्यार्थी, कॉर्पोरेट कर्मचारी यांना फ्रुट शेक जास्त आवडतात.
– टीम स्मार्ट उद्योजक
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.