मुंबईतील Yotta Data Services या स्टार्टअपने चिप उत्पादनात जगात अग्रणी असलेल्या Nvidia या कंपनीकडून सेमी कंडक्टरची पहिली शिपमेंट मिळवली आहे. या सेमी कंडक्टरचा उपयोग आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी केला जातो.
Yotta Data Services चे मॅनेजिंग डायरेक्टर, सीईओ आणि सहसंस्थापक सुनील गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली कंपनी Nvidia कडून उच्च-मूल्याच्या H100 चिप्स खरेदी करण्यासाठी भरीव गुंतवणूक करत आहे.
“Yotta Data येथील आम्हाला भारतातील AI क्रांतीच्या केंद्रस्थानी असल्याचा अभिमान आहे. NVIDIA H100 ची डिलिव्हरी केवळ Yotta Data साठीच नाही तर खऱ्या अर्थाने डिजिटल भारताच्या विकासासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात करेल”, असे गुप्ता म्हणाले.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.