Advertisement
११ छोटे व्यवसाय; जे तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये सुरू करू शकाल!
उद्योगसंधी

११ छोटे व्यवसाय; जे तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये सुरू करू शकाल!

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


उद्योग करण्याची मनीषा बाळगणारे खूप असतात. अपार मेहनतही करू शकतात. त्यांच्याकडे विविध संकल्पना, कल्पना असतात; परंतु गुंतवणूक कमी पडते आणि उद्योग करण्याचं स्वप्नही मागे पडते. अशा प्रत्येकाला एक उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्या प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेल्या फेसबुकचंच घेऊ या ना!

‘फेसबुक’ आज जगातील दुसऱ्या क्रमांकावर असलेली कंपनी आहे, जिची सुरुवात हार्वर्डमधल्या एका छोट्या खोलीतून झाली किंवा संपूर्ण जगावर साम्राज्य असलेल्या गुगलची सुरुवातही एका रीसर्च प्रोजेक्टमधून झाली. Larry Page आणि Sergey Brin हे दोघे सँडफोर्ड युनिव्हर्सिटीतून पीएचडी करताना त्यांचा हा संशोधनाचा विषय होता. यातून सांगायचा मुद्दा असा, गुंतवणुकीपेक्षा महत्त्वाचे असते ते म्हणजे तुमची ‘कल्पना’.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

आपल्या कल्पनांवर विश्‍वास ठेवून आपण भक्कम पाय रोवून उभं राहिल्यास हळूहळू नक्की मार्ग सापडतो. म्हणूनच उद्योगात उतरू इच्छिणाऱ्यांसाठी ११ अगदी कमी बजेटमध्ये सुरूकरू शकाल अशा व्यवसायाच्या कल्पनांची ही ओळख करून देतोय.

१. ट्रॅव्हल एजन्सी

मागील काही दशकांत भारतात ट्रॅव्हल एजन्सी हा उद्योग तेजीत आलाय. लोकांच्या बदलत्या सवयी आणि आवडीनिवडी यांचा विचार करता या क्षेत्रात उतरू इच्छिणाऱ्या उद्योजकांनी त्यांचा पैसा योग्य त्या ठिकाणी लावायला हवा. त्यासाठी सर्वात कमी खर्चीक असा हा उद्योग आहे. म्हणजे घरच्या घरी ट्रॅव्हल एजन्सी सुरू करता येते.

त्यामुळे उद्योगासाठी आवश्यक जागेवर म्हणजेच ऑफिससाठी होणारा खर्च कमी होतो.  ARC, CLIA, IATA सारख्या वेगाने वाढणार्‍या या मोठ्या कंपन्या आपल्याला मदत करण्यास तयार असतात ज्यांच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त कमिशन मिळवता व तुमचा खर्च कमीत कमी होतो. प्रत्येक कंपनीनुसार मिळणारा दर मात्र कमीजास्त असतो.

२. मोबाइल रिचार्ज शॉप

आजकाल मोठ्या प्रमाणात ऑनलाइन रिचार्जची सोय उपलब्ध असली तरी अनेक लोक दुकानात जाऊन रिचार्ज करण्यास पसंती देतात. त्यामुळे स्थानिक ठिकाणी मोक्याचीछोटी जागा भाड्याने घेऊन हा छोटा उद्योग करता येऊ शकतो. जागेसाठी भाडे हा एकमेव मोठा खर्च असतो. याशिवाय महत्त्वाचे असते ते म्हणजे नेटवर्क पुरवणाऱ्या कंपनींशी करार. उदा. एअरटेल, व्होडाफोन, आयडिया इ.

३. घरगुती क्‍लासेस

ट्यूशन क्‍लासेस हा एक ‘0’ गुंतवणूक असलेला उद्योग म्हणता येईल. ट्यूशन शिकवणारे शिक्षक हे मुख्यत्वे घरातूनच शिकवतात, त्यामुळे जागेची गुंतवणूक ‘0’ असते. ट्यूशन घेणाऱ्यांना आपली जाहिरात मात्र जास्तीत जास्त करावी लागते. त्यामुळे जास्तीत जास्त जाहिरातीचे पर्याय त्यातही लोकल जाहिरातीचे पर्याय शोधून त्यांना लोकांपर्यंत पोहोचवावे लागते.

शिवणकाम : मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांमध्ये बदलत्या काळानुसार आणि वाढत्या मागणीनुसार प्रत्यक्ष शिवणकाम करणाऱ्या टेलर्सची मागणी वाढते आहे. हा उद्योग सुरू करण्यासाठी जागेची गरज आहे. त्याव्यतिरिक्त दुसरा खर्च म्हणजे शिलाई आणि काजेबटण करणाऱ्या मशीनची गुंतवणूक.

४. फोटोग्राफी

फोटोग्राफी हा एक खूप चांगला आणि कमी गुंतवणुकीचा पर्याय आज उपलब्ध आहे. ज्यांना याची आवड आहे आणि जे अभ्यासपूर्वक यात उतरू इच्छितात त्यांना अल्प भांडवलात या उद्योगात उतरता येईल. चांगल्या आधुनिक कॅमेऱ्यासाठी गुंतवणूक लागेल. याशिवाय स्वत:चं ऑनलाइन प्रोफाईल मजबूत करण्यावर भर द्यावा लागेल. ज्याच्या माध्यमातून मोठे मोठे प्रोजेक्ट तुम्ही स्वतंत्रपणे करू शकता.

५. ऑनलाइन फिटनेस इन्स्ट्रक्टर

सगळ्यांनाच स्वत:ला फिट अ‍ॅण्ड फाइन राहायचं असतं; परंतु प्रत्येकालाच जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळतोच असे नाही. त्यामुळे ऑनलाइन फिटनेस इन्स्ट्रक्टर ही संकल्पना उदयाला आली.  फिटनेस याविषयी अभ्यास असणाऱ्यांसाठी हा उद्योगाचा चांगला पर्याय आहे. आपल्या घरी फिटनेस ट्रेनरने येऊन आपल्याला ट्रेन करणे ही प्रत्येकालाच भावणारी गोष्ट आहे. वेळेअभावी अनेक जण जिममध्ये पोहोचू शकत नाही.

त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी आपला ऑनलाइन प्रेझेन्स खूप भक्कम असायला हवा. वेबसाइट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत स्वत:ला लोकांसमोर ठेवता यायला हवं. यात महत्त्वाचं म्हणजे जिमसाठी लागणाऱ्या सामग्री आणि जागेसाठी लागणारी गुंतवणूक येथे लागत नाही. त्यामुळे आपसूकच गुंतवणूक कमी होते.

६. इव्हेंट ऑर्गनायझर

इव्हेंट ऑर्गनायझर हा खूप कमी वेळ आपल्या कार्यालयात असतो. बहुतांश वेळा विविध लोकांना भेटणं, विविध जागांना भेटी देणे, स्पॉन्सर्सना भेटणे, प्रत्यक्ष कार्यक्रमाचे वेळापत्रक करणे यात गढलेला असतो म्हणजेच तो चोवीस तास बाहेरच असतो. त्यामुळे त्याला स्वत:च्या ब्रँडला मोठं करण्यासाठी चांगली ऑनलाइन स्ट्रॅटेजी आवश्यक असते. त्यामुळे अशा प्रकारच्या स्टार्टअपसाठी कमीत कमी खर्च येतो. कारण इथं प्रत्यक्ष जागेचे भाडे वाचते. सारे काही एका क्लिकसरशी होते.

७. उपहारगृह

आपल्या आजूबाजूला असणारी उपाहारगृह जर आपण पाहिली तर एक गोष्ट आपल्या नेहमीच लक्षात येईल ते म्हणजे तिथे ग्राहकांची वर्दळ ही सुरूच असते. त्याचे कारण म्हणजे ही खूप मोठी बाजारपेठ आहे. आणि अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे ही गरज ओळखून आपण चहा, नाष्टा आणि अल्पोपाहार मिळेल अशा पद्धतीचे एखादे छोटे उपाहारगृह सुरू करू शकता.

योग्य परवाने मिळवून उपाहारगृह सुरू करण्यासाठी एका छोट्या जागेची निवड करावी. कमीत कमी खर्च हा आपल्या जागेच्या भाड्यावर जाईल. उरलेल्या पैशात अगदी सेकंडहँड टेबल, खुर्च्या सुरुवातीला घेऊ शकतो. त्याशिवाय लागणाऱ्या खाद्य साधनसामग्रीसाठी काही गुंतवणूक लागेल.

८. रसवंतीगृह

विविध आणि ताज्या फळांचे रस कोणाला आवडणार नाहीत? हा उद्योग सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर अगोदर परवाना मिळवावा लागेल. त्यानंतर मोक्याच्या ठिकाणी जागा शोधावी लागेल. याशिवाय उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी गुंतवणूक लागेल. तसेच ज्यूस काढण्यासाठी मशीनरी व काम करण्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार यासाठी काही रक्कम गरजेची असेल.

९. ऑनलाइन बेकरी

ऑनलाइन बेकरी या उद्योगाला खूप मोठी संधी उपलब्ध आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे स्वतंत्रपणे आपण एकटेच एकहाती हा उद्योग करू शकतो. त्यामुळे जागा किंवा मनुष्यबळ यावर कोणताही खर्च नाही. सोशल माध्यमांद्वारे आपण आपला उद्योग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आता यात विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध   आहेत ज्याद्वारे आपण काही क्षणात ग्राहकांपर्यंत आपला माल पोहोचवू शकतो. उदा. म्हणजे झोमॅटो, स्वीगी इ.इ.

१०. टिफिन सर्व्हिस

यापूर्वी म्हटल्याप्रमाणे भारतात खाद्यसंस्कृती मोठ्या प्रमाणात आहे आणि सध्याच्या धकाधकीच्या काळात झपाट्याने घड्याळाच्या काट्यावर सर्वच जण धावत असतात. घरातील पती-पत्नी दोघेही नोकरी, व्यवसाय असल्याने घरी स्वयंपाक करणे शक्य होत नाही. काही लोक नोकरीनिमित्ताने स्वतंत्र एकटेच राहतात. त्यामुळे टिफिन सर्व्हिस लोकांसाठी खूप आवश्यक झालीय. यात खूप संधी आहेत. स्वत:च्याच घरी टिफिन बनवल्यामुळे सुरुवातीची गुंतवणूकही कमी लागते. आवश्यक असते एका व्यक्तीची जो आपण तयार केलेले टिफिन योग्य ठिकाणी पोहोचवू शकेल.

११. चहाचा स्टॉल

‘चहा’ नाही असे जग तरी आपण विचार करू शकतो का? चहाशिवाय सकाळ, संध्याकाळ कशी असेल? मागील काही दशकांत चहाची इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक ऑफिसेस, दुकानांची ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. चहासाठी सगळ्यात कमी गुंतवणूक लागते. एक छोटी जागा आणि एखादे बसण्यासाठी टेबल, चहा बनवण्यासाठी भांडे, चहा, साखर, पाणी, दूध आणि चहाचे कप आदी सामग्रीसह उद्योगाला सुरुवात करता येते. भविष्यात मनुष्यबळ वाढवता येते.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!