Advertisement
उद्योगसंधी

फावल्या वेळात पैसे कमवण्याचे पाच मार्ग नक्की वाचा आणि आपणही सुरू करा Extra Income

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

आपल्यापैकी सर्वांनाच आपल्या नोकरी किंवा व्यवसायपलीकडे जाऊन थोडे जास्त कमवायचे असतात. पण ते कसे? त्यासाठी कुठे जाणार? वेळ कसा देणार असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आजच्या या ऑनलाईन आणि इंटरनेटच्या युगात हे करणे मात्र आता सोपे झाले आहे. इंटरनेटवर अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या जर आपण केल्या तर त्यातून आपल्याला पैसे कमवता येतात.

१. भाषांतर

रु. १ – ५ प्रती शब्द (काही भाषांसाठी रु. १०/- प्रती शब्द)

जर तुम्हाला एकाहून अधिक भाषा येत असतील तर भाषांतर करण्यात आज खूप मोठी संधी आहे. त्यातून जर आपल्याला कोणती विदेशी भाषा येत असेल तर उत्तमच! बऱ्याच व्यवसायांना, मोठ्या कंपन्यांना, लेखक-प्रकाशकांना अनेक गोष्टी भाषांतरित करून हव्या असतात. आज आंतरराष्ट्रीय व्यवसायाला चालना मिळाली असल्याने अनेक कंपन्यांना इतर देशातील ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी विविध भाषांतील साहित्याची गरज भासते. त्यामुळे तुमचा छंद म्हणून तुम्ही शिकलेली एखादी भाषा नक्कीच तुम्हाला आज पैसे कमवून देऊ शकते. हे काम सुरू करण्यासाठी आपण upwork.com किंवा fiverr.com अशा संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करू शकता आणि आजच पैसे कमवायला सुरुवात करू शकता.

२. ऑनलाईन विक्री

उत्पादने आणि त्याची मागणी यानुसार नफा अगदी कमी किमतीपासून हजारोंपर्यंत जाऊ शकतो. तुमचा एखादा मोठा उद्योग असो किंवा तुम्ही घरी बनवलेले छोटे-मोठे शो-पीस असोत. हे सर्व आता आपण ऑनलाईन विकू शकतो. सर्वप्रथम आपल्याला काय विकायचे आहे हे ठरवा. त्यानंतर त्यासाठी लागणारे सामान होलसेल मध्ये विकत घ्या, ज्याने आपली उत्पादनाची किंमत कमी होईल. त्यानंतर मुबलक प्रमाणात आपली उत्पादने तयार ठेवा. यापुढे त्याची विक्री किंमत काढा. सुरुवातीला उत्पादनाचा खर्च + कामाचा मोबदला + ठराविक नफा, यावरून आपण आपल्या उत्पादनांची किंमत ठरवू शकता.


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त ₹५० मध्ये.


आपली उत्पादने विकण्यासाठी आपल्याला काही स्वतःचे संकेतस्थळ असण्याची आवश्यकता नाही. आपण अमेझॉन, फ्लिपकार्ट, ई-बे, इ. ऑनलाइन मार्केटप्लेसेसवर विकू शकता. जसजशा ऑर्डर्स येत जातील तसतसे त्या कंपन्यांच्या लॉजीस्टिक्सचे लोक येऊन आपल्याकडून आपली उत्पादने घेऊन जातील आणि त्यापुढे पाच ते सात दिवसात आपल्याला आपले पैसे मिळतील. याशिवाय आपण आपले स्वतःचे ऑनलाईन विक्री पोर्टलसुद्धा सुरू करू शकता.

३. व्हर्च्युअल सहाय्यक

रु. ५००/- – ४,०००/- प्रती तास

बऱ्याच मोठ्या उद्योजकांना, व्यवसायिकांना किंवा व्यवस्थापकांना वेगवेगळी कामे करण्यासाठी सहायकांची गरज असते. जसे प्रेझेन्टेशन्स बनविणे, ग्राहकांशी भेटांच्या वेळा ठरविणे, एखादा कार्यक्रम आयोजित करणे आणि अशाप्रकारची अनेकविध कामे त्यांच्याकडे असतात. या कामांसाठी आपल्याकडे वेगवेगळी कौशल्ये मात्र आसणे गरजेचे आहे. संवाद कौशल्य, नवनवीन ऍप्स शिकणं, वेळेचे नियोजन अशा अनेक गोष्टी यात लागतात. जर त्या तुमच्यात असतील तर वाट कसली पाहताय? व्हर्च्युअल सहाय्यक होण्यासाठी Elance.com आणि Zirtual.com सारख्या संकेतस्थळावर तुम्ही आताच आपलं नाव नोंदवून व्हर्च्युअल सहाय्यक होऊ शकता.

४. युट्यूब व्हिडिओ

रु. २००/- ते ३००/- प्रती १,००० प्रेक्षक

जर तुम्हाला एखाद्या विषयाची भरपूर आवड असेल आणि तुम्ही कॅमेऱ्याला सहजपणे सामोरे जाऊ शकत असाल, तर आपण बनविलेले युट्यूब व्हिडिओ आपल्याला खूप नफा मिळवून देऊ शकतात. यासाठी आपल्याला आपल्या आणि लोकांच्या आवडीचा एक विषय निवडायचा आहे. हा विषय पाककलेतील काही टिप्सपासून राजकीय चर्चांपर्यंत कोणताही असू शकतो. पण एक कायम लक्षात ठेवा, लोकांना जर विषय आवडला तरच यात नफा मिळू शकतो. शिवाय काही सॉफ्टवेअर्ससुद्धा उपलब्ध आहेत, ज्यांद्वारे तुम्ही व्हिडिओ तयार करू शकता.

आपण निवडलेल्या विषयाला साजेसे एक नाव ठेऊन त्या नावाने आपले युट्युब चॅनेल सुरू करा आणि या चॅनेलवरून नियमित वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करा. आपले व्हिडिओ जितके जास्त लोक पाहतील त्यानुसार आपल्याला जाहिरातदारांकडून पैसे मिळतील. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपले व्हिडिओ पाहायला हवेत. वेगवेगळ्या जाहिराती आणि व्हिडिओनुसार जाहिरातीची किंमत बदलते.

५. माहिती भरणे (डेटा एन्ट्री)

रु. ३००/- ते १,५००/- तास

आजकाल जरी उद्योगजगतात ऑटोमेशन झाले असले तरी भारतातील बऱ्याच ठिकाणी अजून पारंपरिक पद्धतीनेच डेटा एन्ट्री केली जाते. जर आपल्याला आपल्या कामातून थोडा वेळ जास्तीचा मिळत असेल तर हे काम आपण जरूर करू शकता. कारण यासाठी फार कोणत्या कौशल्यांची तर नाहीच पण साधनांची सुद्धा गरज लागत नाही. आपल्याकडे एक संगणक आणि त्यात इंटरनेट सुविधा असेल तर आपण आताही हा व्यवसाय सुरू करू शकता. साधारणपणे कंपनी कडून आपल्याला डिजिटल माहिती किंवा मजकुराची छापील प्रत दिली जाते. आपण एकाच वेळी वेगवेगळ्या संकेतस्थळांसाठीसुद्धा काम करू शकता.


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: