यशस्वी होण्यासाठी या सहा गोष्टी करायलाच हव्यात…


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


यशस्वी प्रत्येकालाच व्हायचं असतं. पण त्यासाठी नक्की करायचं काय हे मात्र ठाऊक नसतं. यशस्वी होण्यासाठी या ६ गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हो, ही सुरुवात आहे बरं का, या गोष्टी नियमित रोज करायला हव्या!

१. रात्री झोपताना दुसऱ्या दिवशीच्या कामांची यादी करून झोपा. यामुळे दिवस सुरू होताना तुमच्याकडे त्या दिवसाचा प्लॅन असेल आणि कमीत कमी वेळात ती सगळी कामं होतील सुद्धा

२. नाही म्हणायला शिका. बऱ्याचदा आपण इतरांच्या सांगण्यावरून अशा गोष्टी करतो ज्या आपला वेळ, पैसा आणि ताकद फुकट घालवतात. जसं अचानक मित्राचा फोन येतो नाक्यावर भेटूया का विचारायला किंवा काही व्यक्तींचे फोन येतात व जे तासंतास चालतात. अशा वेळी नाही म्हणता येणं खूप महत्वाचं असतं.

३. झोपायची आणि उठायची वेळ निश्चित करा. मी असं नाही म्हणत की लवकर झोपा आणि लवकरच उठा. पण तुम्हाला किती तास झोप गरजेची आहे हे ओळखा आणि किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत तुम्ही झोपणार हे सुद्धा ठरवा. कारण झोप ही अशी गोष्ट आहे जी जितकी वाढवू तितकी वाढत जाते. त्यामुळे ठराविक वेळ झोपायचं ठरवा आणि त्या वेळेशिवाय इतर कोणत्याही वेळी झोपू नका.

४. नित्यक्रम तयार करा. तुमची दिवसभरातली साधारण कामं तुम्हाला माहीत आहेत. त्यामुळे ज्यावेळी उठणार त्या वेळेपासून झोपेपर्यंतचा एक नित्यक्रम ठरवा. यात अगदी तासाप्रमाणे काम असं वेळापत्रक करण्याऐवजी सर्वात आधी कोणतं काम करायचं आहे, त्या नंतर कोणतं अशी यादी तयार करा.

५. विचार करण्यासाठी वेळ ठेवा. आपण बऱ्याचदा घाईघाईने कामं करत राहतो आणि काही वर्षं उलटल्यावर आपल्या असं लक्षात येतं की आपलं जे ध्येय होतं ते सोडून आपण वेगळंच काहीतरी केलं. त्यामुळे रोज आपल्या ध्येयाबद्दल, आपल्या कामाबद्दल विचार करणं गरजेचं आहे.

६. किती कष्ट केले यापेक्षा किती ध्येय गाठलं याचा विचार करा. खूप कष्ट करणं आणि ध्येयाच्या जवळ जाणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कधीकधी अतोनात कष्ट करूनही आपण ध्येयाच्या जवळ जात नाही कारण आपण ते कष्ट चूकीच्या दिशेने घेत असतो. आणि काही वेळा फार कष्ट घेतले नाहीत पण गरजेचे काम केले तरी आपण ध्येयाच्या जवळ जातो.

या सहा गोष्टी तर लक्षात ठेवाच. पण यांपेक्षाही जास्त महत्वाचे आहे स्वतःवर आणि स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवणे. तुमचा तुमच्यावर जितका जास्त विश्वास असेल तितक्या जास्त वेगाने तुम्ही प्रगती कराल.

– शैवाली बर्वे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top