Advertisement
व्यक्तिमत्त्व विकास

कृती करणारा माणूस बना

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


असं म्हटलं जातं की, एक कल्पना, एकाच वेळी जगाच्या पाठीवर किमान चार जणांच्या डोक्यात येते; परंतु ती एकाच व्यक्तीच्या नावाने यशस्वी झालेली आढळते. असं का? तर Be a man of action या इंग्रजी वाक्यात त्याचं गुपित दडलंय.

सामान्यतः आपल्याला दिवसाला किमान एक-दोन चांगल्या कल्पना सुचत असतात, ज्या आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात चांगल्या उपयोगी पडू शकतात; परंतु त्यांच्याबरोबर आपण काय करता, हे सर्वांनाच माहीत आहे; परंतु त्यातील चांगल्या कल्पना तुम्ही नक्कीच अमलात आणायला शिका. त्या दृष्टीने आवश्यक ती पावलं उचला.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

कृती म्हणजे ACTION आणि ACTION बद्दल सांगायचं झालं तर – A. C. T. I. O. N. ला आपल्याला असंही पाहता येईल :

A= Aggressive & Accurate / तीव्र आणि योग्य (बरोबर)
C= Conscious / विचारपूर्वक
T=Timely / वेळेत
I=Immediate / त्वरित
O= Opportunity / संधी दिसताच
N=New Ways / नवनवीन मार्गांनी

दुसर्‍या शब्दांत सांगायच झालं तर, कृती – ACTION या शब्दात, “संधी दिसताच तीव्र आणि योग्य, तसेच विचारपूर्वक, वेळ न दवडता त्वरित, नवनवीन मार्गाने काम करणे” अपेक्षित आहे आणि जर तुम्ही आज जगात महानतम यशस्वी झालेल्या व्यक्तींचा अभ्यास केला, तर त्यांनी कृतीला जास्त महत्त्व (Action Oriented) दिल्याचं दिसून येतं. खरंच तुम्हालाही मोठ्या यशाकडे वाटचाल करताना कृतीवर भर द्यावा लागेल.

हे होऊ शकतं!

 • केवळ कृतीच तुमच्या भीतीला बदलू शकते. तेव्हा ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते तिच्या संबंधित कृती करा.
 • तुमच्या कृतीमुळेच तुम्ही परिणाम / रिझल्ट देणार्‍या लोकांच्या यादीत येऊ शकता.
 • अशा परिणाम देणार्‍या (रिझल्ट ओरिएण्टेड) लोकांची प्रचंड मागणी आज सगळीकडे आहे.
 • परिणाम (रिझल्ट) देणारी माणसं ही वेगळ्याच पठडीतली असतात.
 • त्यांचं वेगळेपण हे सगळ्यांना हवंहवंसं वाटणारं असतं.
 • ‘कामानिमित्त’ बोलणारी माणसंच सगळ्यांना आवडतात.
 • आपल्या कृतीवर विश्वास असल्याने अशा लोकांना इतरांवर अवलंबून राहायची गरज नसते.
 • कृती ही शब्दापेक्षा जास्त परिणाम देते.
 • कृतीमुळे तुमच्यात कुशल नेतृत्वगुण विकसित होतात.

हे करून तर बघा!

 • तुम्ही कृतीवर विश्वास ठेवणारे व्हा.
 • कृतिशीलताच तुम्हाला इतरांपासून वेगळं करते.
 • पुढे तुम्हाला तुमच्याविषयी बोलायची गरज नाही.
 • तुमची कामंच, तुमच्याविषयी जास्त बोलत राहतील.
 • तुमची कृती हीच तुमची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर बनते. तेव्हा तुमच्या विचारांत, तुमच्या सवयीत, तुमच्या स्वभावात कृतीला जास्त महत्त्व द्या. तुमची कृती ही सिंहासारखी असली पाहिजे.
 • म्हणजे योग्य प्लॅनिंग आणि लगेच कृती. ठरवलेल्या गोष्टींवर कृती करणं किंवा न करणं हा तुमचा स्वभाव आहे, तिला तुमची सवय होऊ देऊ नका.
 • स्वभाव आणि सवय ही बदलली जाऊ शकते.
 • केवळ कृतीतच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य आहे.

– विश्वास वाडे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!