Advertisement
उद्योग कथा उद्योजक सूची

कर्णबधिर उद्योजकाने सुरू केला मूक व कर्णबधिरांसाठी व्यवसाय

तुम्ही उद्योजक आहात का?

जर असाल, तर 'महाराष्ट्र उद्योजक सूची'मध्ये आजच आपली नोंद करा आणि अगणित लाभ मिळवा.

अधिक माहितीसाठी : udyojak.org/join-udyojak-list/

Print this Page

कोल्हापूरच्या इचलकंजीमध्ये जन्माला आलेले वरुण बरगाले हे मूक व कर्णबधिर आहेत. स्वत: मूक व कर्णबधिर असल्यामुळे त्यांना हे व्यंग असलेल्यांच्या व्यथांची पुरेपूर जाणीव आहे आणि ते अशा लोकांसाठी काही भरीव कामगिरी करू ईच्छितात. म्हणून त्यांनी मूक व कर्णबधिर ‘Adorable White Collection’ या नावाने एक पांढर्‍या शर्ट्सचा व्यवसाय सुरू केला आहे.

वरुण बरगाले हे स्वत: व्यावसायिक कुटुंबातून आले आहेत. कुटुंबाचा पारंपारिक व्यवसाय सांभाळून वरुण यांनी मूक व कर्णबधिर लोकांसाठी स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. कॉटनचे उच्च प्रतीचे सफेद शर्ट, जे सामान्यपणे प्रत्येकालाच लागतात ते वरुण मूक व कर्णबधिरांकडून बनवून घेतात.

Products of ‘Adorable White Collection’

सामान्यपणे संवादातील गैरसोयीमुळे मूक व कर्णबधिर व्यक्तींना नोकरी मिळणे कठीण जाते. शिक्षण घेण्यातही अनेक अडचणी येतात. त्यामुळे सरकारी व आरक्षित नोकर्‍याही मिळत नाहीत. त्यामुळे वरुण यांनी सुरू केलेल्या व्यवसायामध्ये ते फक्त मूक व कर्णबधिर लोकांनाच रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

स्वत:च्या व्यंगावर मात करत वरुण बरगाले या तरुणाने आपल्यासारख्या अनेकांचे दु:खही वाटून घेतले आहे. वरुण यांनी लौकिकदृष्ट्या टेक्साइल इंजिनिअरींगमधून डिप्लोमा केलेला असून ते स्वत: मॉडेल म्हणून स्वत:च्या ब्रॅण्डचे प्रतिनिधीत्व करत आहेत. वरुण यांनी सर्वांना आवाहन करतात की त्यांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी त्यांचे शर्ट जरूर खरेदी करावेत आणि त्यांच्या या कार्याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत share करावी.

संपर्क : फक्त WhatsApp – ७२१८८ ५१११८

(टीप : वरुण बरगाले फोनवर बोलू शकत नसल्यामुळे त्यांचे सहकारी
सन्मित यांना ९९७५३२२०१६ वर संपर्क करू शकता.)

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: