वैद्यकीय क्षेत्रातील काही धंदेवाईक अप्रामाणिक व फसव्या लोकांमुळे समाजात पेशंटचे काही बरेवाईट झाले तर जास्त पैसे उकळण्याच्या हव्यासापोटी हॉस्पिटलमध्ये फसविण्याचा प्रकार हा पक्का समजच झाला आहे. परंतु यात चांगले लोक हे संशयाच्या चक्रात फसतात.
गेल्या काही वर्षांत हॉस्पिटल डॉक्टरवर होणारे हल्ले ही गंभीर बाब आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अपुर्या माहितीमुळे, विशेषत: ग्रामीण क्षेत्रात हे असे हल्ले होत आहेत. डॉक्टर जरी देवाचा दूत असला तरी तो देव नव्हे.
ज्याचे आयुष्य भरले आहे तो मरणारच. त्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये मेला तर डॉक्टरच जबाबदार आणि जर तो घरी मेला तर कोणी घरच्यांना मारतो का? तो गाडीत मेला तर ड्रायव्हरला मारतो का?
यात सोशिओ मेडिको कान्सिलिंग ही मोठी करीअर संधी आज वैद्यकीय क्षेत्रात निर्माण होऊ पाहत आहे. उदा. बीएचएमएस, बीएस्सी नर्सिंग, एमआर, बीफार्मा इत्यादी शिक्षण झालेले किंवा अगदी निवृत्त लोक ज्यांना या क्षेत्रासंबंधी चांगले ज्ञान आहे व चांगले संवाद कौशल्य आहे, ते या क्षेत्रात येऊ शकतात.
एखाद्या क्रिटिकल पेशंटची काय परिस्थिती आहे व त्यावर नातेवाईकांना काय करायला हवे याचे योग्य ते मार्गदर्शन दिले जाते, त्यामुळे त्यांना योग्य ती माहिती होऊन एक प्रकारची विश्वासार्हता प्राप्त होते. हल्ले, पोलीस केसेस, कोर्ट केसेस होणार नाहीत, कारण स्पेशॅलिस्ट डॉक्टर इतके व्यस्त असतात की, त्यांना नातेवाईकांशी संवाद साधायला वेळच नसतो आणि या कम्युनिकेशन गॅपमुळे हा प्रश्न निर्माण होतो.
बर्याच वेळा उपचार इतका महाग असतो की, त्या पेशंटना तो परवडत नाही तेव्हा अल्टरनेटिव्ह मेडिसिनचा पर्याय सुचवला जाऊ शकतो. डॉक्टर किती मर्यादेपर्यंत प्रयत्न करू शकतात याची नेमकी जाणीव नातेवाईकांना केली जाते. वारंवार पेशंट व नातेवाईकाबरोबर कौन्सिलिंग घेतली जातात.
एक तासाच्या सेशनला ३०० ते १००० फी आकारली जाते. ह्यात दोघांचाही फायदा आहे. हॉस्पिटल डॉक्टरकडून रिपोर्ट पाहून योग्य ती माहिती दिली जाते, त्यामुळे डॉक्टरांचे काम सोपे होते. नातेवाईकांना योग्य ती माहिती मिळाल्यामुळे योग्य ते निर्णय व सत्य परिस्थितीला सामोरे जाण्याचे मानसिक बळ मिळते व भावनेच्या आहारी जाऊन मारामारी, अफाट उपचारावर पैसा खर्च होत नाही.
याची मागणी खूप वाढणार असून अनेक हॉस्पिटल्स, मेडिकल कंपन्या अशा कौन्सिलिंगच्या सेवा घेण्यास तयार आहेत. तेव्हा वैद्यकीय क्षेत्रात आवड असणार्यांनी ह्या नवीन उदयास येणार्या व्यवसायाचा विचार करावा. रोज २ ते ३ सेशन मिळून १ ते २ हजारांची कमाई होते.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.