स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
माझी कंपनी जेव्हा एखाद्या उद्योजकासाठी ‘उद्योजकीय प्रशिक्षणाचं’ काम करते, तेव्हा त्यात अनेक विषय असतात. जसे की सेल्स, मार्केटिंग, प्रॉफिट, टीम, स्ट्रॅटेजी वगैरे, वगैरे; परंतु त्यात एक विषय मी आवर्जून घेतो आणि तो म्हणजे त्या उद्योजकाची उद्योगाविषयीची मानसिकता बदलणे आणि मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की, ही मानसिकताच संपूर्ण ‘गेम चेंज’ करते. म्हणूनच मी म्हणतो, ‘तुमची मानसिकता बदला, नशीब बदलेल’.
‘उद्योजकीय प्रशिक्षण’ या प्रोफेशनच्या माध्यमातून तर मी अनेक उद्योजकांच्या बाबतीत हे करण्यात यशस्वी झालेलो आहे. आपण पूर्वी असं ऐकायचो की, अमुक-अमुक गोष्ट ही आपल्या नशिबाचा भाग आहे; परंतु मी हे आता पैजेवर सांगू शकतो, की यशस्वी उद्योजकता ही त्या उद्योजकाच्या मानसिकतेशी निगडित आहे आणि खरोखरच जर का आपल्याला या संदर्भात नशीब उज्ज्वल करायचं असेल तर आपल्या मानसिकतेवर काम करणं गरजेचं आहे.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
यासाठी तुम्ही काय कराल? तर तुम्हाला तुमची मानसिकता बदलायला भाग पाडणार्या गोष्टी जाणीवपूर्वक कराल. त्याही शक्य तेवढ्या लवकर. आता यात काय काय येऊ शकतं? तुम्हाला काय वाटतं? विचार करा. यात मीही थोडी मदत करतो तुम्हाला.
१) सक्षम विचारसरणीच्या माणसांचा गोतावळा तयार करा.
सगळ्यात पहिलं आपल्या आजूबाजूची माणसं बदली करणं. म्हणजेच काय? तर सहसा आपल्या जवळपास आपल्यापेक्षा कमी यशस्वी, कमी अनुभवाची, कमी हुशार, कमी संपत्ती असलेले, अशा कमी-कमीवाल्यांचा गोतावळाच मोठा असतो. तो लगेच थोपवायचा, कमी करायचा, शक्य असल्यास बंद करायचा आणि आपली मानसिकता बदलायला सक्षम असू शकणार्या माणसांचं कडं आपल्याभोवती उभारायचं.
२) यशस्वी व्यक्तींची चरित्रं वाचायची.
३) प्रेरणादायी पुस्तकं वाचायची.
४) चांगले व्हिडीओज् बघायचे.
५) स्फूर्तिदायक लोकांना भेटायचं.
६) चांगले चित्रपट बघायचे.
७) तुमची मानसिकता बदलण्याची जाणीव करून देणार्या भव्य वास्तू, ठिकाणाला भेट द्या.
८) तुम्हाला चार्ज करणारी गाणी ऐका.
९) आपली मानसिकता बदलू शकतील अशा ट्रेनिंग प्रोग्रामला जायचं.
१०) शक्यतो आपल्याला प्रश्न विचारणारा मेंटॉर, कोच नेमायचा.
वरीलपैकी ज्या-ज्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत, त्या त्या नक्की करा. शक्यतो सगळ्याच करण्यासारख्या आहेत. अशाने तुमची पुढील वाटचाल नक्कीच जास्त आश्वासक, जास्त उज्ज्वल, जास्त यशस्वी होईल.
– विश्वास वाडे
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.