नवीन कल्पना कृतीद्वारे जगासमोर आणायला घाबरू नका

हा एक मोठा गुण मला जगातल्या मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेल्या लोकांत प्रकर्षाने जाणवला. ही मंडळी नवीन कल्पनांवर काम करायला घाबरत नाहीत. सामान्यांना अकल्पित, अनाकलनीय आणि विचार करण्यापलीकडच्या अनेक कल्पनांवर ही मंडळी काम करून, त्यांना जगासमोर आणायला सिंहाचा वाटा उचलतात.

अशा अनोख्या गोष्टींमध्ये किती नुकसान होईल? यश मिळेल का नाही? किती आर्थिक नुकसान होईल? या व अशा गोष्टींची ते भीती बाळगत नाहीत. अशाने ते जगासमोर एका नायकाच्या भूमिकेत येतात. यातूनच अनेक नवनवीन गोष्टी या जगासमोर येत असतात.

जग अशा व्यक्तींवर आणि वस्तूंवर भरभरून प्रेम करतं; किंबहुना अशा गोष्टींना जग जास्त पैसेही द्यायला तयार होतं. इथे स्पर्धा नसते. इथे असते ती नवीन कोरी करकरीत वाट, विनारहदारीची. यातूनच अ‍ॅपलसारखी कंपनी जन्माला येते, यातूनच एखादं गुगल, एखादं फेसबुक, एखादं वॉट्सअ‍ॅप, एखादं फ्लिपकार्ट, एखादं जस्ट डायल, एखादी मेरू टँक्सी यांचा जन्म होतो.

जर तुम्हालाही असेच यशस्वी व्हायचं असेल, तर नक्कीच नवीन काही जगासमोर आणायला घाबरू नका. जग नेहमी अशा गोष्टींच्या प्रतीक्षेत असतं. त्याचा फायदा घ्या. तुमच्यातल्या कल्पकतेला आव्हान द्या. असंच काहीसे तुम्ही जनक होऊ शकता. तुम्हीही या जगाचे हिरो होऊ शकता. ही संधी दवडू नका. एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावकाशपणे करणे श्रेयस्कर.

हे होऊ शकतं!

  • नवनवीन गोष्टींवर काम केल्याने, तुमचा उजवा मेंदू जास्त कार्यरत होतो.ह्न तुम्ही सदैव कार्यक्षम, उत्साही व आशावादी असता.
  • तुमचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो.ह्न लोक, समाज व सहकारी तुमचा आदर करू लागतात.
  • कर्मचार्‍यांनाही तुमचा अभिमान वाटू लागतो.ह्न नवीन कल्पनांमुळे तुमच्या कामाचा वेग वाढतो.
  • अशा वेळी जवळ-जवळ तुम्हाला स्पर्धक नसतातच. अशाने तुम्हाला ‘नंबर वन’ व्हायची संधी मिळते.
  • नवीन कल्पना तुम्हाला लवकर यशस्वी व्हायला मदत करतात. अशाने तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हे सिद्ध होते.
  • निसर्गतः कल्पकता ही परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला दिलेली आहे, फक्त आपण तिचा किती व कसा वापर करतो, यावर पुढचं यश आणि त्याची व्यापकता अवलंबून असते.

हे करून तर बघा

  • तुमच्या आवडत्या क्षेत्रात, आवडत्या विषयात नावीन्याला फार वाव आहे, त्याचा अभ्यास करा, तो विकसित करा व जगासमोर आणा.
  • नावीन्याला व्यावहारिकतेची जोड द्या. लोक अशाच गोष्टींचा स्वीकार करतात, की ज्या करण्याजोग्या आणि उपयोगात आणण्याजोग्या आहेत.
  • तुमच्या नावीन्यामध्येही सातत्य ठेवा.
  • तुमचा प्रतिस्पर्धी यावर लगेच ‘रिस्पॉन्ड’ करू शकतात किंवा त्याची कॉपी होऊ शकते याची दक्षता घ्या.
  • सध्याच्या युगात, यशाच्या व्याख्या बदललेल्या आहेत.
  • आता जास्त वय, जास्त अनुभव, जास्त शिक्षण यापेक्षा नवीन गोष्टीच तुम्हाला लवकर यशस्वी करतात. तुमच्या नवीन कल्पनांविषयी, तुमच्या मनात जर शंका असेल, तर ती तुम्हाला यशस्वी होऊ देत नाही.
  • नवीन कल्पनांवर तुम्ही काम नाही केलं, तर तुमचे इतर स्पर्धक ते करतील व तुम्ही फक्त त्यांच्या यशाबद्दल टाळ्या वाजवत राहाल.
  • नवीन काही करायला कधीही उशीर झालेला नसतो. गरज असते ती फक्त इच्छेची आणि कृतीची.

– विश्वास वाडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?