कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणी कशा दूर करायच्या हे सांगणारे पुस्तक

मेघनाने कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताना येणारे अडथळे आणि अडचणी कशा पार पाडाव्यात याबद्दल तिच्या या ‘कॉर्पोरेट मंत्र’ या पुस्तकात टिप्स दिल्या आहेत; ज्या आजच्या स्पर्धेच्या युगात, अनिश्चित वातावरणात काम करण्यार्‍या कोणत्याही वयाच्या कर्मचार्‍याला उपयोगी पडतील.

पुस्तक लिहिण्यासाठी आधी, टिप्स देण्याआधी प्रश्न कोणते आहेत, चॅलेंजेस काय आहेत याचे अद्ययावत ज्ञान असणे गरजेचे आहे, जे मेघनाने या विषयाबाबत प्राप्त केलेले पुस्तक वाचून समजते. आजकाल सगळेच जण नोकरीमध्ये धरसोड करताना दिसतात.

प्रभावी बायोडाटा कसा असावा, मुलाखतीची तयारी कशी करावी, नोकरी निवडताना कोणते निकष लावावेत, सहकार्‍यांसोबत वर्तणूक कशी असावी, स्वत:चा उद्योग चालू करायचा म्हणताय तर त्यासाठीची गुणवैशिष्ट्ये कोणती, कोरोनाने नोकरवर्गावर केलेले परिणाम, बदल कसा स्वीकारावा, न्यूनगंडावर मात कशी करावी अशा अनेक विषयांवर फार उपयोगी पडतील अशा टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.

महत्त्वाचे म्हणजे या बाबतीत बरीच पुस्तके इंग्लिशमध्ये सहज मिळतात, पण मराठीमधील शोधावी लागतात. पण मेघनाने ग्रामीण तरुणांची गरज लक्षात घेऊन हे पुस्तक मराठीमध्ये लिहिले आहे. उद्देश प्रामाणिक असला की आऊटकम उत्तमच येते.

– डॉ. अंजली आळेकर
(लेखिका ‘इस्माईल यूसुफ महाविद्यालया’त कॉमर्स विभागाच्या प्रमुख आहेत.)

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?