Advertisement
कथा उद्योजकांच्या

स्वत:वर, स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि पुढे जा यश मिळतेच!

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअर झालेले धनंजय कल्याणकर मायक्रो इंजिनीअरींगमध्ये पोस्ट ग्रॅच्युएट आहेत आणि गेट क्‍वालिफाइडसुद्धा, पण धनंजयना नोकरी करण्यात कधीच रस नव्हता. लौकिकार्थाने शिक्षण संपल्यावर कुटुंबाच्या आग्रहाखातर नोकरी करण्याचा प्रयत्न त्यांनीही केला, पण ते त्यात रमले नाहीत.

सहा महिन्यांच्या नोकरीच्या काळात बारा तास नोकरीत जायचे. योग्य तो मोबदला मिळत नव्हता. मनाला पटत नव्हते. उलट तिथे मिळणार्‍या पगारापेक्षा स्वतंत्र काम करताना एकाच ग्राहकाच्या कामात आपण पगारापेक्षा जास्त आर्थिक कमाई करू शकतो, हे कळत होते. स्वभावत:च बंधनात राहायलाही आवडत नाही. त्यांना काहीतरी वेगळं करायचे होते. तरीही केवळ यामुळेच स्वत:चा व्यवसाय करायचा का?

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

तर नाही; आपल्याकडील ज्ञानाचा लघुउद्योजकांना त्यांच्या व्यवसायात उपयोग व्हावा ही तळमळ होती. यातूनच ते व्यवसायात ओढले गेले आणि ‘डीव्हीजीके डिजिटल मार्केटिंग’ची स्थापना झाली. नोकरी सोडल्यावर कोणता व्यवसाय करावा, हे स्पष्ट नव्हतं. इंटरनेटवर एकदा अशीच एका वेबिनारची जाहिरात पाहिली आणि ते वेबिनार जॉईन केले.

सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी सुरू करून यातून कैक हजार रुपये कमवू शकतो, याचा पहिला अंदाज या वेबिनारमध्ये आला आणि याची ताकद माझ्या लक्षात आली. पुढे अशा विविध कोर्सेस आणि वेबिनारमधून मी स्वत: शिकलो आणि प्रत्यक्ष व्यवसायात उतरलो, असे धनंजय सांगतात.

धनंजय सांगतात, डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला काही अडचणी आल्या जसे की ग्राहकांनी नवीन म्हणून काम द्यायचे नाकारले जायचे किंवा काम मिळाले तरीही मोबदला कमी दिला जायचा. डिजिटल मार्केटिंगची ताकद आणि आपल्या व्यवसायवाढीसाठी असणारी त्याची गरज ही सूक्ष्म आणि लघुउद्योजकांना पटवून देणे जिकरीचे होते, पण हार न मानता त्यावर काम करत राहिलो आणि स्वत:ला सिद्ध केले.

लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावर एक पोस्ट वाचनात आली की जर कोणाला ग्राफिक डिझाइन शिकायचे आहे, त्यांनी संपर्क करावा मोफत शिकवले जाईल. त्यावेळी मलाही ही संकल्पना आवडली की आपल्याकडील ज्ञान आपण इतरांशी वाटावे. मी त्यासाठी लगेच कामाला लागलो. झूम मीटिंगचा एक प्लॅन घेऊन सुरुवात केली.

सुरुवातीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी ९० जण होते. मी पंधरा दिवस त्यांना मोफत शिकवले, पण रोज दिवसागणिक लोक गळू लागले. मोफत शिकवूनही लोकांना त्याची किंमत नाही हे पाहून मला वाईट वाटले आणि रागही आला.

एक दिवस आठ ते दहाच लोक होते त्यांना मी सांगितले उद्यापासून मी एक वेबिनार घेतोय, ज्यात सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी कशी सुरू करायची आहे ते शिकवणार. ज्याला यात रस असेल त्यासाठी याची फी आहे दहा हजार. तिथेच मला सहा विद्यार्थी मिळाले आणि माझं कोचिंग व्यवसाय पदार्पण झाले.

पुढे मी स्वत: विविध गोष्टी शिकलो आणि एक वेबिनार घेतले. शंभर लोकांची क्षमता असलेल्या वेबिनारमध्ये 95 लोक होते. मी त्यांना सोशल मीडिया मार्केटिंगची ताकद समजावून दिली आणि सर्वात शेवटी माझ्या कोर्सची माहिती दिली. त्याच दिवशी मला 22 विद्यार्थी मिळाले आणि माझ्या कामाचा जम बसला. पुढे अगदी पाच दिवसापासून महिन्याभराचे असे अनेक कोर्सेस मी आणलेत. मुख्य म्हणजे मागील आठ महिन्यात मी स्वत:ला या व्यवसायात उभं करू शकलो.

डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस आणि कोचिंग अशा दोन प्रकारच्या सेवा धनंजय देतात. आतापर्यंत पंधराशेपेक्षा अधिक उद्योजकांनी धनंजयच्या सेवेचा लाभ घेतलाय. विविध वेबिनार घेतले जातात. मागील आठ महिन्यात अंदाजे ५० हजारहून अधिक लोकांना ट्रेनिंग दिले आहे. विविध डिजिटल मार्केटिंग कोर्सेस ऑनलाईन घेतले जातात.

सोशल मीडिया बेसिक, ऍडव्हान्स, विक्री कशी करावी, फेसबुक जाहिरात कशी करावी, लीड कशा मिळवाव्यात, की-वर्ड्सचा योग्य पद्धतीने वापर करून इंटरनेटच्या महाजाळावर स्वत:ला कसे पुढे ठेवावे अशा विविध विषयांचे लहान मोठे कोर्सेस धनंजय घेतात. शेतकरी कुटुंबातील धनंजय यांचे वडील प्राथमिक शिक्षक त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात ते लहानाचे मोठे झाले.

उणीवा काढण्यासारखे काही नव्हते पण नोकरदार आणि शेतकरी पार्श्वभूमी असल्यामुळे व्यवसायाला सुरुवातीला विरोध झाला, परंतु नीट समजावून दिल्यावर त्यांनी समजून घेतले. या सर्व प्रवासात भावाची खूप चांगली साथ लाभली याशिवाय इंटरनेटची मोलाची साथ मिळाली. मागाल तेव्हाच मिळेल, यावर धनंजय यांचा पूर्ण विश्वास आहे. दिवसाला करोडो कमावणार्‍या माणसांच्या विचारसरणीचा आपण अभ्यास केला तर एक लक्षात येते की आपण मोठा विचारच करत नाही.

नेहमीच स्वत:ला कमी समजतो आणि म्हणूनच आर्थिकदृष्ट्याही मागासले जातो. मराठी माणसांसाठी छोट्यामोठ्या विविध प्रकारच्या उद्योगसंधी निर्माण करण्याचे ध्येय धनंजय यांचे आहे. स्वत:वर, स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि पुढे जा यश मिळतेच, हीच शिकवण धनंजय यांच्या प्रवासातून नवोद्योजकांना मिळतेय.

धनंजय कल्याणकर – 8208803312

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!