Advertisement
कथा उद्योजकांच्या

अडचणीत सापडलेल्या उद्योगांना प्राचीन भारतीय शास्त्रांच्या माध्यमातून नवसंजीवनी देणारे डॉ. डोळस

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मुंबईतील एका महिला डॉक्टरने प्रख्यात उपचार केंद्र साखळीची फ्रँचायझी घेतली होती. ती फ्रँचायझी चालवण्याचा महिन्याचा किमान खर्च सवा लाख रु. होता. फ्रँचायझी सुरू करून अनेक महिने झाले तरी म्हणावा तसा प्रतिसाद लाभत नव्हता. दर महिन्याचा खर्च कायम होता; पण आवक तितकीशी नव्हती. ती महिला डॉक्टर अगदी मेटाकुटीला आली होती. तिने दादरच्या उद्योग संजीवनी कॉर्पोरेट कन्सल्टंसी सर्व्हिसेसचे संचालक डॉ. ध्रुव डोळस यांचा सल्‍ला घेतला.

डॉ. ध्रुव यांनी त्या महिला डॉक्टरची पत्रिका तपासून व तिच्या हॉस्पिटल व निवासस्थानाचा वास्तुशास्त्रानुसार अभ्यास करून तिला काही उपाय सुचवले. त्या महिला डॉक्टरनेही श्रद्धेने ते उपाय केले. त्यानंतर अल्पावधीतच तिचे हॉस्पिटल व्यवस्थित चालू लागले. दर महिन्याचा खर्च जाऊन तिला नफा होऊ लागला.

Advertisement

अशा तर्‍हेने अडचणीत सापडलेल्या, किंबहुना बंद पडायला आलेल्या अनेक उद्योगांना डॉ. ध्रुव डोळस यांनी आजवर नवसंजीवनी दिलेली आहे, योग्य ती दिशा दाखवली आहे. त्यांना तोट्यातून बाहेर काढून नफ्यात आणले आहे.

हा चमत्कार घडवणारे डॉ. ध्रुव डोळस हेच मुळात एक अफलातून व्यक्‍तिमत्त्व आहे. फलज्योतिष, वास्तुशास्त्र, हस्त- सामुद्रिक, अंकशास्त्र, रत्नशास्त्र, लोलकशास्त्र इत्यादी भारतीय आणि टॅरो कार्ड्स वगैरे परदेशी शास्त्रांचे जाणकार असलेले डॉ. ध्रुव हे एके काळी त्यांच्या स्वत:च्याच व्यवसायात अडचणीत होते. ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. दादर, शिवाजी पार्क येथे ते क्लिनिक चालवत. तीन वर्षे प्रॅक्टिस करूनही त्यांना म्हणावे असे यश मिळत नव्हते. ते चाचपडतच होते.

त्यांना लहानपणापासून ज्योतिषशास्त्राची प्रचंड आवड आहे. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची तीन वर्षांच्या अभ्यासानंतर मिळणारी ज्योतिषशास्त्री ही पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. आपल्या व्यवसायातील अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने त्यांनी ज्योतिषशास्त्रदृष्ट्या आपल्या व्यवसायाचे विश्‍लेषण केले.

योगायोगाने त्यांना त्याच काळात एक वास्तुशास्त्री भेटले. त्यांच्या नजरेतून त्यांना आपल्या व्यावसायिक जागेतील व निवासस्थानातील वास्तुदोष समजले. त्यांनी ते दोष निवारण केले तेव्हा त्यांच्या व्यवसायात स्थिरता लाभली.

यानंतर डॉ. ध्रुव डोळस यांनी इतर अनेक भारतीय प्राचीन शास्त्रांचे कोर्सेस केले. त्यांचे ज्ञान संपादन केले. त्यांच्या असे लक्षात आले की, सर्व शास्त्रे हातात हात घालून चालतात. कोणतीही समस्या असो, तिचा फलज्योतिष, वास्तुशात्र व इतर संबंधित शास्त्रे यांच्या अंगाने सर्व बाजूंनी विचार व्हायला पाहिजे.

अधिक चिंतनातून त्यांची स्वत:ची अशी एक समस्या निवारण पद्धती विकसित झाली. त्यांनी आपल्या व्यवसायाचा परिघ वाढवला. केवळ आयुर्वेदिक प्रॅक्टिस व प्री-मॅरेज काऊन्सलिंग एवढ्यापुरते आपले कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता त्यांनी अडचणीत सापडलेल्या उद्योगांना सर्व भारतीय प्राचीन शास्त्रांच्या मदतीने संजीवनी द्यायला सुरुवात केली.

तीन वर्षांपूर्वी त्यांनी उद्योग संजीवनी कॉर्पोरेट कन्सल्टंसी सर्व्हिसेस एलएलपी ही कंपनी स्थापन केली. जे जे उद्योग-उद्योजक आपल्या व्यवसायात अडचणीत सापडले आहेत, मरणप्राय अवस्थेत पोहोचले आहेत, त्यांना ते सर्व भारतीय प्राचीन शास्त्रांच्या माध्यमातून योग्य ते सल्‍ला सेवा देतात.

यात ते फलज्योतिषानुसार त्या उद्योगाच्या संचालकाची पत्रिका तपासतात. वास्तुशास्त्राच्या आधारे त्याचे निवासस्थान-व्यवसायाची जागा यांचा अभ्यास करतात. तसेच हस्तसामुद्रिक, रत्नशास्त्र, टॅरोकार्ड थिअरी, कलर थेरपी या सर्व शास्त्रांचा वापर करून वेगवेगळे उपाय सुचवतात. अंकशास्त्राच्या आधारे उद्योजकाच्या नावाचे स्पेलिंग, त्याची स्वाक्षरी यात सुधारणा करायला सांगतात. थोडक्यात सांगायचे तर प्राचीन भारतीय शास्त्रांशी संबंधित सर्व सेवा ते ‘अंडर वन रूफ’ पुरवतात.

विशेष म्हणजे आजवर त्यांच्या सेवांचा लाभ घेऊन अनेक उद्योगांना पुन्हा नवजीवन प्राप्‍त झाले आहे. तोट्यातील उद्योग पुन्हा भरभराटीला आले आहेत. केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही त्यांच्या सेवांचा लाभ घेतला जातो. अमेरिका, ब्राझिल अशा अनेक देशांतील क्लायंट्स त्यांच्या सेवेचा लाभ घेतात.

डॉ. ध्रुव डोळस यांची संत श्री गजानन महाराजांवर नितांत श्रद्धा आहे. एक आयुर्वेदिक डॉक्टर ते कॉर्पोरेट कन्सल्टंट हा त्यांचा प्रवास गजानन महाराजांच्या आशीर्वादाने व दैवी संकेतानुसारच घडला आहे, असे ते मानतात.

प्रत्येक जण आपले प्रारब्ध घेऊन आलेला असतो. जीवनात ज्या अडचणी किंवा आजार येतात ते निवारण करण्यासाठी आपण पथ्य पाळले पाहिजे आणि औषधेही घेतली पाहिजेत. व्यावहारिक अडचणी दूर होण्यासाठी ईश्वरभक्‍ती हे पथ्य तर आपण सुचवत असलेले उपाय म्हणजे औषधे आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

ज्या ज्या उद्योजकांची व्यावसायिक स्थिती अतिशय बिकट झालेली आहे, व्यवसायात अपयश आले आहे, व्यवसाय बंद करण्याइतपत परिस्थिती वाईट बनलेली आहे, त्यांनी व्यवसाय बंद करण्यापूर्वी एकदा डॉ. ध्रुव डोळस यांचा सल्‍ला घ्यावा. प्राचीन भारतीय शास्त्रांचा लाभ घ्यावा.

आपल्या ऋषिमुनींनी प्रचंड संशोधन करून ही शास्त्रे मानवजातीच्या कल्याणासाठीच विकसित केलेली आहेत. परदेशात या शास्त्रांविषयी खूप आदर आहे. भारतात मात्र सध्या खोट्या अहंकाराने त्यांना थोतांड म्हणून हिणवले जाते. त्या प्राचीन भारतीय शास्त्राचा लाभ घ्यावा व त्यांच्या आधारे आपला उद्योग पुन्हा ऊर्जितावस्थेत आणावा, असे आवाहन ते करतात.

डॉ. निखिल डोळस

व्यवसायाचे नाव : Udyogssanjivani Corporate Consultancy Services LLP
उत्पादने व सेवा : DOLAS Numerology (Consultancy)
कार्यक्षेत्र : मुंबई
संपर्क : ८०८०२४४४१२

पूर्ण पत्ता : ३२, तिसरा मजला, श्री धनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, टिकल वाडी, आशा पॉलिक्लिनिकच्या समोर,  माटुंगा रोड, मुंबई – ४००० ०१६
ई-मेल : udyogssanjivani@gmail.com
फेसबुक : https://www.facebook.com/drnikhil.dolas

संपर्क – डॉ. ध्रुव डोळस
80802 44412


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!