डॉक्टर म्हणजे कडू औषधे देणारे, पथ्याच्या चाकोरीत ठेवणारे, गंभीर स्वभावाचे आणि कडक शिस्तीचे, अशी प्रत्येक रोग्याच्या मनात भावना असते; परंतु हे सर्व गैरसमज बाजूला सारून डॉक्टर म्हणजे एक मित्र होऊन, आपल्याला पूर्णत: बरे करणारी, आपल्याला कोणत्याही अशा प्रकारच्या बंधनात न अडकवणारी हक्काची व्यक्ती. त्यापैकीच एक म्हणजे आयुर्वेदाचार्य कौस्तुभ गद्रे (बी.ए.एम.एस.).
ह्यांना पहिल्या भेटीतच भेटून आनंद, समाधान आणि अर्धे बरे वाटते. वैद्य गद्रे ह्यांचे थोडक्यात वर्णन करावयाचे झाल्यास उत्तम आचार, उत्तम विचार अन् जोडीला उत्तम पण सात्त्विक आहार असेच आहे. मुळातच शाखेत जात असल्याने तेथे त्यांनी वैद्य विनय वेलणकर यांना एक यशस्वी आयुर्वेदाचार्य म्हणून फार जवळून पाहिले. त्यांना गुरू मानूनच त्यांनी आपणही असेच आयुर्वेदिक डॉक्टर व्हायचे ठरवले.
त्यांच्याकडून त्यांनी बी.ए.एम.एस.चे मार्गदर्शनही घेतले. हे सांगताना डॉक्टर गद्रे हे गमतीने पुढे ह्या कोर्सला शिक्षणाची साडेसाती असे म्हणतात. कारण ह्या शिक्षणाचा कालावधी तितकाच होता. आयुर्वेदाचार्य होताना आणि त्यानंतरही डॉ. विनय वेलणकरांमुळे पंचकर्म चिकित्सा एवढ्या मोठ्या प्रमाणात केली गेली, की त्यांना त्यांचे सहकारी गमतीने पंचकर्मठ म्हणू लागले.
१९९२ साली डोंबिवलीमधील पहिले पंचकर्म चिकित्सा केंद्र डॉ कौस्तुभ गद्रे यांचेच. पंचकर्म केल्यावर रोग समूळ नष्ट होतात.; पण बरेचसे रुग्ण पुन्हा दोन-तीन महिन्यांनी त्यांच्याकडे येऊ लागले. त्या वेळी त्यांच्या वहिनीने डॉ.
मालती कारवारकर ह्यांची ‘वंशवेल’सारखी पुस्तके वाचण्यास दिली. त्यातून त्यांना आहारसमस्या काय असते ती जाणवली आणि त्यांनी आहारबदल सुचवून त्यावर मात करणे सुरू केले; पण केलेला बदल हा स्वतःसाठी आहे हेही न कळणार्या रुग्णांनी ते बदल सोडून दिले.
पुढे जाऊन १९९७ साली त्यांची एका कँपद्वारे प्रत्यक्ष डॉ. मालती कारवारकरांशी भेट घडली. डॉक्टर म्हणतात, त्या मला मातृस्थानीच आहेत. डॉ. मालती यांच्याकडे त्यांनी त्यांचा थिसिस वाचायला मागितला. त्यातून त्यांना ‘तत्र अस्थनि स्थितो वायु:’ हे आयुर्वेदाचे सूत्र उलगडले. ह्या सूत्राचा अर्थ असा की अस्थींच्या आश्रयाने वायू राहतो.
डॉक्टरांनी पुढे २००४-०५ मध्ये डिप्लोमा इन डाएटेटिक्स हा पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स एक वेळ दवाखाना चालू ठेवून केला. हा कोर्स करणारे ते एकटे आणि पहिलेच बी.ए.एम.एस. केलेले विद्यार्थी होते.
डॉक्टरांनी सात्त्विक आहार घेण्यात वाढ व्हावी आणि आपले शरीर बळकट आणि तंदुरुस्त राहावे यासाठी काही उत्पादने स्वत: तयार केली आहेत. यासाठी ते पर्यावरणपूरक चुलीचाच वापर गेल्या वर्षापासून करत आहेत ज्यात एकोचिप तंत्रज्ञान वापरून प्रदूषण कमी करणारा धूर किंवा वायुनिर्मिती होते आहे.
चूल थंड झाल्यावर चुलीला एक प्रकारचा सुगंध कसा येतो ते मी स्वतः पाहिले. त्यांनी नैसर्गिक घटकांपासून तयार केली आहे ‘गॅपोमील’ नावाची सात्त्विक पावडर जी एनर्जी बूस्टर आहे. हाडे बळकट बनवते, प्रतिकारशक्ती वाढवते शिवाय पेनकिलर गोळी खाण्याऐवजी ती खाल्ल्यास दुखणेही कमी होते. ही पावडर मधुमेहीपण खाऊ शकतील. अशी त्यांच्यासाठीही विशिष्ट पद्धतीने ती खास तयार केलीये.
पुढे ते अभिमानाने सांगतात की, या लहानांपासून मोठ्यांना उपयुक्त अशा पावडरला आज पुणे, हैदराबाद, बेंगलोर, राजस्थान येथेही मागणी असते. याशिवाय मुलांसाठी खास चॉकलेटही त्यांनी बनवले असून दुधात घालून पिण्यासाठी चोको बूस्ट हे अजून एक उत्पादन त्यांनी तयार केलंय. तसेच ते त्वचा तेलही तयार करतात. त्याचसोबत ते चिवडाही करतात.
होय! बरोबर वाचताय. पोह्यांचाच पण सात्त्विक चिवडा. त्यासाठी त्यांनी खास चूल बनवली असून त्या चुलीवरचा चिवडा ते पारंपरिक पद्धतीने बनवतात. आणि हो! त्यामध्ये सैंधव मिठाचाच वापर करतात त्यामुळे हा चिवडा अत्यंत चविष्ट, खमंग आणि तितकाच रुचकर व कुरकुरीत लागतो.
ह्या सर्व उत्पादनांच्या प्रसिद्धीबाबतही ते म्हणतात की, ज्यांनी हे वापरलंय त्यांच्यामार्फतच ह्याची प्रसिद्धी होते. कारण ज्या आहाराची जाहिरात केली जाते तो आहार खाऊ नये असा दंडक असल्याचे ते सांगतात.
अशा या आहारक्रांतिवादी डॉक्टरांचा पंचकर्मातही हातखंडा आहे. डॉ. वेलणकरांकडून प्रेरणा घेतलेल्या डॉक्टरांनी आजवर ६९ वेळा रक्तदान केले आहे. शिवाय मंगळवारी आणि शनिवारी ते पर्यावरण दिन म्हणून वाहनाचा वापर न करता पायी जाणेच पसंत करतात. अशा या असामान्य विचारांच्या आणि ध्येयापलीकडील पण सामान्य माणसासारखे साधे राहत असलेले श्रीसंदीपक आयुर्वेद चिकित्सालयाचे सर्वेसर्वा डॉ. कौस्तुभ गद्रेंचा म्हणूनच अभिमान वाटतो.
संपर्क : डॉ. कौस्तुभ गद्रे – 9967772305
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.