Advertisement
कथा उद्योजकांच्या

अनेकांना रोजगार मिळवून देणारा उद्योजक डॉ. किरण बडगुजर

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मूळचे जळगाव जिल्हा, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्‍वर) गावातील डॉ. किरण बडगुजर. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मल्याने वाट्याला संघर्ष हा अटळ होता. त्यांचे वडील राज्य वीज मंडळामध्ये वायरमन होते. त्यांच्या बदल्यांच्या निमित्ताने डॉ. किरण बडगुजर यांचाही प्रवास होत राहिला.

त्यांचे शालेय शिक्षण पालघरला, तर महाविद्यालीयन बारावीपर्यंतचे शिक्षण वसईला झाले.त्यांनी क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल शाखेतून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सामान्य पदवीधराप्रमाणे त्यांनीही चांगल्या नोकरीच्या शोधार्थ चपला झिजवल्या.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

आपल्या मुलाने मोठा अधिकारी व्हावे, असे त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते; परंतु एमएसईबीमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करूनही त्यांना तेथे यश मिळाले नाही. डॉ. किरण बडगुजर यांनी उमेद न हरता इतरत्र प्रयत्न चालू ठेवले. पुढे फार्मा क्षेत्रातील कंपनीत तांत्रिक कामासाठी सुरुवात केली; परंतु नोकरीत त्यांचे मन लागत नसल्याने नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करण्याचा निर्णय त्यांनी घेतला व त्यातून त्यांनी १९९८ मध्ये ‘मॅक फार्माटेक’ची उभारणी केली.

त्यांच्यातील जिद्द, चिकाटी कंपनीच्या ग्राहकांनी अनुभवली होती. नोकरी सोडली असल्याचे कळताच काहींनी त्यांना वैयक्तिक पातळीवर कामे देण्याची तयारी दर्शवली. खर्‍या अर्थाने व्यावसायिकतेचा त्यांचा प्रवास मशीनच्या देखभाल-दुरुस्तीपासून सुरू झाला. नोकरीदरम्यान मशीन बनवण्यासंदर्भातील सखोल ज्ञान असल्याने हिंमत करून एका ग्राहकासाठी संपूर्ण मशीनबांधणीचे काम त्यांनी घेतले. मनोज चौधरी यांच्या साथीने मॅक इन्स्ट्रुमेंट्सद्वारे ते कामे घेऊ लागले.

पुढे २००५ मध्ये वसईतील औद्योगिक वसाहतीत ‘मॅक फार्माटेक प्रा.लि.’ला सुरुवात करण्यात आली. चढ-उताराच्या या काळात ‘वसई जनता बँके’ने अर्थसाहाय्य करत पाठबळ दिले. २००८ मध्ये सिन्नरमधील माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये स्वत:ची जागा विकत घेऊन तेथे कंपनी स्थापन केली. आज त्यांच्या एकूण तीन कंपन्या असून तब्बल ३५०-४०० कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यातून चालवला जात आहे.

समाजसेवा व प्राणिमात्रांवरील अतूट प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. मनामध्ये नेहमी या विचारांनी घर करून ठेवले. प्राणिमात्रांवरील अतूट प्रेम व आपण समाजाचे काही तरी देणे लागतो म्हणून त्यांनी २०१२ मध्ये ‘मॅक ऑरा हेल्थकेअर’ची (Mack Auraa Healthcare) स्थापना केली व त्या माध्यमातून त्यांनी प्राण्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बाजारात ‘अ‍ॅग्रोकॅल गोल्ड’ व ‘रिकोमोन गोल्ड’ ही दोन उत्पादने म्हणजे पशूपूरक आहार बाजारात आणली. तसेच ‘मॅक ऑरा’ची स्थापना करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला.

बाजारातील उत्पादनांची वाढती मागणी व प्रतिसाद पाहून हळूहळू त्यांनी बाजारपेठेत प्राण्यांच्या सेवेसाठी जवळजवळ पंधरा उत्पादने व काही जनावरांची औषधे तयार केली व तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. आज कंपनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, आसाम, हरयाणा या राज्यांत तसेच नेपाळ आदी देशांत आपला व्यापार विस्तारते आहे. तसेच कंपनी ही डब्लू.एच.ओ., जी.एम.पी. वआय.एस.ओ.ने नामांकित केलेली कंपनी आहे.

‘मॅक फार्माटेक’ कंपनीमार्फत फार्मासिटिकलला लागणारी विविध उत्पादने तयार केली जातात. यात स्टॅबिलिटी चेंबर, बी.ओ.डी. चेंबर, कोल्ड चेंबर, डीप फ्रीजर, फोटो स्टॅबिलिटी यांसह अन्य विविध प्रकारच्या यंत्रसामग्रींचा समावेश आहे. ही उत्पादने भारतभर तसेच भारताबाहेर नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, उझबेकिस्तान, हंगेरी, सौदी अरेबिया, फिलिपाइन्स, घाना, मलेशिया व इतर बर्‍याच देशांमध्ये निर्यात केली जातात.

आतापर्यंत दोनशे ते एक हजार लिटरपर्यंत, फार फार तर ६० हजार लिटरपर्यंतचे वॉकिंग स्टॅबिलिटी चेंबर साकारण्यात आले होते. मात्र डॉ. बडगुजर यांच्या कंपनीने तब्बल एक लाख लिटरचे वॉकिंग स्टॅबिलिटी चेंबर साकारत विक्रम स्थापन केला आहे.

डॉ. बडगुजर यांनी २०१२ मध्ये ‘आदित्यम फाऊंडेशन’ची स्थापना करून समाजसेवा करण्याचे काम हाती घेतले. गोरगरिबांना व शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे, अन्नदान, अनाथाश्रमास देणगी, गोशाळेस मदत, सार्वजनिक जागेवर पाण्याचे कूलर, तसेच वेगवेगळ्या शाळा व संस्थांना विविध प्रकारची मदत ते करतात. याशिवाय कंपनीची कृषी उत्पादने शाळांना मोफत पुरवत असतात.

ग्रामीण परिस्थितीची जाणीव असल्याने नोकरी देताना डॉ. बडगुजर यांनी आवर्जून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधीसाठी प्राधान्य दिले. आजही वेळोवेळी कॅम्पस ड्राइव्हच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आयटीआय उत्तीर्ण, फिटर, रेफ्रिजरेटिंगचे प्रशिक्षण पूर्ण केलेला, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, सर्व्हिस इंजिनीअर या पदांसाठी गरजू युवकांनी नोकरीसाठी कधीही संपर्क साधावा, असे आवाहन ते करतात.

तसेच त्यांच्या ‘मॅक ऑरा हेल्थकेअर’द्वारे वितरक नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याने होतकरू व इच्छुक संपर्क साधू शकत असल्याचे ते सांगतात. विविध प्रकारच्या रोजगाराच्या व व्यवसायांच्या संधींसाठी होतकरू तरुण डॉ. बडगुजर यांना संपर्क साधू शकतात.

दूरध्वनी : ०२५५१-२३०८७७

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!