कथा उद्योजकांच्या

E-Sports या आधुनिक क्रीडाप्रकाराच्या व्यवसायात दैदिप्यमान कामगिरी करणारे महाडिक

स्पेशल ऑफर : ₹५०० प्रिंट मासिकाची वार्षिक वर्गणी भरा आणि डिजिटल अंकात अर्ध पान रंगीत जाहिरात मोफत मिळवा!
Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

तुमचा मुलगा-मुलगी तासन्तास मोबाइलवर गेम खेळतात का? आणि या मोबाइल गेममुळे त्यांच्या अभ्यासावर, झोपेवर आणि एकूणच आरोग्यावर परिणाम होत आहे का? आणि या सगळ्यात तुम्ही स्वत:ला हतबल समजत आहात का?

खेळांचं मुलांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि जर आपला पाल्य व्यावसायिक खेळांमध्ये असेल म्हणजे जिथे त्याला प्रशिक्षक, समुपदेशनपासून सगळं उपलब्ध असेल तिथे पाल्याचा सार्‍या गुणांचा नकळत विकास होत असतो. उदाहरणार्थ बौद्धिक क्षमता वाढण्यास, नेतृत्व क्षमता विकसित होण्यास, आयुष्यात सतत लढत राहण्याची प्रेरणा, कधीही हार न मानण्याची क्षमता, शिस्त, आत्मविश्वास वाढणे इ.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imojo.in/3x3a5zn


दुर्दैवाने शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये सगळीच मुलं काही व्यावसायिक स्पोर्ट्समध्ये निवडली जात नाहीत. अंदाजे ५% मुलं निवडली जातात. मग बाकीच्या मुलांचं काय? त्यांच्या गुणांचा विकास कसा होणार आणि ती मुलं या खिलाडू वृत्तीपासून दूर राहणार नाहीत का? त्यामुळे त्यांना आयुष्यभर या गोष्टींचा त्रास सहन करावा लागेल का? प्रश्न खूप आहेत, पण आता त्यांची उत्तरे देणारे कोणी तरी आहे आपल्याकडे. Nerd’s Room – E-Sports Learning Institute.

E-Sports च्या माध्यमातून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास ही संकल्पना पचायला जड जात आहे का? पण हे शक्य आहे आणि याचे प्रयोग चीन, युरोप आणि अमेरिकेमध्ये झाले आहेत आणि त्यातला सक्सेस रेशो हा इतर खेळांएवढाच आहे. Nerd’s Room च्या माध्यमातून तुमच्या पाल्याचं मोबाइल गेमचे अ‍ॅडिक्शन दूर होईलच; पण त्यांचा खेळाडू म्हणून व्यक्तिमत्त्व विकाससुद्धा होईल.

भारतात E-Sports industry काही नवीन नाही; पण E-Sports च्या माध्यमातून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास ही कन्सेप्ट पूर्णपणे नवीन आहे.

Nerd’s Room ही एक E-Sports Learning Institute आहे. मुलांना PC gaming आणि Console gaming ची professional coaches च्या माध्यमातून मुलांना professional training देणं, त्यांना mobile gaming पासून दूर नेणं आणि त्याच वेळेस मुलांना एक प्रशिक्षित खेळाडू म्हणून E-Sports मध्ये पुढे आणणं आणि एक खेळाडू म्हणून त्यांच व्यक्तिमत्त्व घडवणं ही त्यामागची मुख्य उद्दिष्टे आहेत आणि ज्या सुविधा E-Sports खेळ खेळणार्‍यांना दिल्या जातात त्या सर्व सुविधा उदाहरणार्थ कोच, काऊन्सिलर वगैरेपण खेळाडूंना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मुलांसाठी मेडिटेशन वगैरेची कार्यशाळा असे उपक्रमपण घेतले जाणार आहेत.

फक्त प्रशिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यासाठी संस्थांतर्गत आणि संस्थेतर वेगवेगळ्या E-Sports च्या स्पर्धा आयोजित करून त्यात मुलांना एका competitive level ला खेळायला लावणे आणि त्या मुलांचा एक परिपूर्ण खेळाडू म्हणून व्यक्तिमत्त्व विकास कसा होईल याकडेपण जातीने लक्ष देणे आणि खेळ खेळणं हा फक्त टाईमपास न राहता ते त्यांच्या एकूणच विकासाचं एक माध्यम कसं होईल याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. वेबसाइटवर प्रत्येक पाल्याची संपूर्ण माहिती आणि त्याचा आलेख त्या पाल्याच्या शाळेला, पालकांना ऑनलाइन बघता येणार आहे. असा हा सर्वांगाने विचार करून बनवलेला प्रोजेक्ट लोकांच्या नक्कीच पसंत पडेल.

PC आणि Console वर खेळल्या जाणार्‍या खेळांना E-Sports म्हटलं जातं. जगभरातली Fastest Growing Industry म्हणून या इंडस्ट्रीकडे बघितलं जात आहे. जगभरात ही इंडस्ट्री सध्या १३० बिलियन डॉलरची आहे आणि त्यातला भारताचा वाटा हा साधारण फक्त १ टक्के आहे.

आपल्या पालकांचा E-Sports कडे बघण्याचा दृष्टिकोण हा पूर्णपणे पूर्वग्रहदूषित आहे, कारण त्यांना E-Sports मधूनसुद्धा मुलांचा एक खेळाडू म्हणून विकास होऊ शकतो ह्याची माहितीच नाही. जगभरात याचा विकास वेगाने होत आहे. चीन, युरोप, अमेरिका इथल्या शाळा आणि कॉलेजमध्ये E-Sports ला proper sports च्या दृष्टीने बघितलं जात आहे आणि E-Sports एका व्यावसायिक पातळीवर खेळले जात आहेत.

नितेश महाडिक हे Nerd’s Room चे संस्थापक आहेत. गेली तेरा वर्षांहून अधिक काळ त्यांनी accounts and finance क्षेत्रात उच्च पदावर काम केलं आहे. गेली काही वर्षे व्यवसायात उतरायची त्यांची इच्छा होती. Gaming क्षेत्रातील संधी हेरून त्यांनी या क्षेत्रात उतरायचा निर्णय घेतला.

सुरुवातीला डोंबिवलीमधील मुलांना चांगल्या प्रतीचे high graphics games खेळायला मिळावे एवढाच उद्देश त्यांनी समोर ठेवला होता; पण कालांतराने जगभरात E-Sports संदर्भात संशोधन केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, E-Sports च्या माध्यमातून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास होऊ शकतो. मुळात खेळाकडे एक ‘खेळ’ म्हणून पाहणं जरुरी आहे. हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यातूनच E-Sports Learning Institute ह्या संकल्पनेचा जन्म झाला.

कंपनीच्या बोर्डवर gaming क्षेत्रातील नामांकित खेळाडूंना कोच म्हणून आणलं गेलं आहे. त्याचबरोबर काऊन्सिलर आणि मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील तज्ज्ञ यांनासुद्धा कंपनी बोर्डवर घेण्याचा त्यांचा मानस आहे. त्याचबरोबर इतर शैक्षणिक क्षेत्रांतील तज्ज्ञसुद्धा कंपनी बोर्डवर यावे असा त्यांचा प्रयत्न आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांतील माणसांबरोबर असणं किती जरुरी असतं ह्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे.

या एकूणच भारतीयांच्या दृष्टीने विशेषत: मध्यम वर्गाच्या दृष्टीने वर्ज्य असणार्‍या विषयाला पुढे आणण्याबद्दल त्यांना विचारलं असता त्यांचं उत्तर होतं की, जर आजकाल शाळा इंटरनॅशनल झाल्या आहेत तर मुलांनी local राहून कसं चालेल. आपण जगातल्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या इकॉनॉमीचा भाग आहोत आणि त्यामुळे जगभरात जे ट्रेंड चालू आहेत त्यामध्ये भारताचा सहभाग हा असलाच पाहिजे.

दुर्दैवाने या क्षेत्रात आपण खूपच मागे आहोत. मुळात जगातल्या सर्वात वेगाने वाढणार्‍या या क्षेत्रात आपण मागे आहोत, कारण आपल्याकडे एकूणच खेळ हा वेळ वाया घालवणं असंच समजलं जातं आणि त्यात E-Sports म्हटलं की अजून negativity; पण हे असं क्षेत्र आहे जिकडे आपण खरंच प्रगत देशांशी थेट स्पर्धा करू शकतो. आपल्या मुलांना खूप कमी वयात युरोप, अमेरिका इथल्या मुलांशी थेट स्पर्धा करता येईल आणि जागतिक पातळीवर आपल्या देशाचं नाव उंचावता येईल.

हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

जगभरात E-Sports मधील खेळांच्या मोठ्या स्पर्धा खेळवल्या जातात. उदाहरण द्यायचं झालं तर, DOT- 2 या PC वर खेळल्या जाणार्‍या खेळाचं world championship 2019 चं पहिलं बक्षीस होत १५ लाख डॉलर्स. अशा बर्‍याच स्पर्धा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जातात. जगभरात या स्पर्धा एका व्यावसायिक पातळीवर खेळल्या जातात आणि शाळा, कॉलेजमधून त्या मुलांना तेवढं प्रोत्साहनसुद्धा दिलं जातं.

एशिया २०१८ मध्ये ई स्पोर्ट्ससाठी यातीलच एक गेम खेळला गेला होता. त्यात सहभागी असलेल्या आपल्या भारताच्या स्पर्धकास कांस्य, तर कोरीयाच्या स्पर्धकास सुवर्णपदक मिळाले होते. उद्या World Olympic मध्येसुद्धा E-Sports चा समावेश होऊ शकतो.

ही E-Sports मधली चळवळ तुम्हाला कुठंपर्यंत घेऊन जायची आहे, असं विचारलं असता नितेश महाडिक यांनी हसून उत्तर दिलं की, मी याला चळवळ वगैरे नाही म्हणणार; पण ही सुरुवात आहे. जास्तीत जास्त शाळा, कॉलेज आणि स्पोर्ट्स क्‍लबमध्ये आम्ही आमची कन्सेप्ट घेऊन जात आहोत. तिथल्या मुलांना प्रशिक्षण देऊन E-Sports मधले खेळाडू घडवून त्या मुलांचं व्यक्तिमत्त्व घडवणं आणि त्यानिमित्ताने त्या संस्थेला सर्वांगीण विद्यार्थी घडवण्यात हातभार लावणं हे आमचं उद्दिष्ट आहे.

शाळा, कॉलेजमध्ये तुम्ही E-Sports घेऊन जातच आहात, मग परत वेगळी इंस्टिट्यूट काढावीशी का वाटत आहे? यावर नितेश महाडिक ह्यांनी सांगितलं की, आमच्या इंस्टिट्यूटमध्ये आम्ही दोन प्रकारच्या मुलांना, युवकांना सामील करून घेऊ इच्छितो. एक म्हणजे ज्या मुलांच्या शाळा, कॉलेजमध्ये आमचे coaching चालत नाहीत आणि दुसरं म्हणजे ते युवक ज्यांचे महाविद्यालयीन शिक्षण संपलेलं आहे आणि ते gaming क्षेत्राकडे व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच एक करीअर म्हणून बघत आहेत.

या क्षेत्रात करीअरच्या खूप सार्‍या संधी आहेत. भारतात काय अगदी विदेशातसुद्धा जाण्याच्या खूप सार्‍या संधी या क्षेत्रात मिळू शकतात. सध्या आपल्याकडे या क्षेत्रातील फक्त game development मध्येच थोडं फार लक्ष दिलं जात आहे; पण ते खेळ खेळणार्‍या खेळाडूंना विशेष लक्ष दिलं जात नाही. विदेशात विशेषतः युरोप, अमेरिका येथे खेळाडूंना चांगले स्पॉन्सर मिळतात. तिथल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधून स्कॉलरशिपसुद्धा मिळतात. भारतातही हे सगळं शक्य व्हावं असा आमचा प्रयत्न आहे आणि या खेळातील प्रतिभावान खेळाडूंना बाकीच्या खेळाडूंएवढाच मान-सन्मान, पैसा, प्रतिष्ठा मिळावी ह्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

कंपनीच्या सध्याच्या आणि भविष्यातील योजना काय आहेत याबाबत विचारलं असता नितेश यांनी सांगितलं की, सध्या आम्ही टीम वाढवणं, गुंतवणूकदार आणणं यावर काम करत आहोत, कारण प्रोजेक्ट बर्‍यापैकी मोठा असल्यामुळे टीम मोठी लागणार आणि गुंतवणूकसुद्धा आणावी लागणार आहे आणि पुढील वर्षभरात कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मुंबईमध्ये पोहोचून पुढील तीन वर्षांत भारतभर जाण्याचा कंपनीचा मानस आहे.

असा एक चांगला बदल घडवत असलेल्या उद्योजक नितेश महाडिक यांस मनापासून मानाचा मुजरा आणि त्यांचा स्पर्धक भारताचे नेतृत्व करून सुवर्णपदक मिळवेल ही खात्री आहे.

संपर्क : नितेश महाडिक – ९८१९०९९०२२
शब्दांकन : श्रीनिवास गोखले (उगम क्रिएटिव्ह)

 


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

WhatsApp chat
error: Content is protected !!