व्यवसायासाठी विविध वित्त पर्याय

स्वतःची गुंतवणूक उदाहरणार्थ स्वतःची बँक अकाउंट्स, फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंड, विमा, क्रेडिट कार्ड, सोने, जमीन, रिअल इस्टेट इ. जसे जीवनाला आवश्यक पोषणाची गरज असते, तसेच व्यवसायासाठी वित्त महत्त्वाचा असतो.

व्यवसाय सुरू करण्याच्या वेळी किंवा व्यवसायाच्या दैनंदिन कामासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी, उद्योजकाला आर्थिक गरज असते. उद्योजकाकडे चांगल्या कल्पना, योजना आणि लोक असू शकतात, परंतु भांडवलाशिवाय कोणतीही स्वप्ने साकार होणार नाहीत. उद्योजकाला भांडवल उभे करण्यासाठी काही पर्याय या लेखात दिले आहेत.

● मित्र परिवार आणि नातेवाईक

● Crowd Funding प्लॅटफॉर्म – एखादा उद्योजक त्याच्या व्यवसायाचे सविस्तर वर्णन Crowd Funding प्लॅटफॉर्म ठेवेल. तो आपल्या व्यवसायाची उद्दिष्टे, नफा मिळवण्याच्या योजना, त्याला किती निधीची आवश्यकता आहे आणि कोणत्या कारणास्तव इत्यादींचा उल्लेख करेल आणि नंतर प्लॅटफॉर्मवरील सभासद व्यवसायाबद्दल वाचू शकतात आणि त्यांना कल्पना आवडल्यास पैसे देऊ शकतात.

  • बँकेकडून कर्ज
  • ज्यांना पारंपारिक बँकिंग सेवा उपलब्ध होत नाहीत, त्यांना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज मिळू शकते.
  • जर मशीनरी किंवा कुठले Fixed Assets विकत घ्यायचे असतील, तर leasing चा पर्याय आहे. तसेच Hire Purchase ची पद्धत पण वापरता येते.
  • शासकीय सहाय्य उदाहरणार्थ मुद्रा योजना
  • व्हेंचर कॅपिटल व Angel Investment
  • फ्रँचायजी नेटवर्क उभे करणे
  • मालमत्तेची विक्री / कार्यरत भांडवलातील घट
  • वित्तीय संस्थांकडून कर्ज
  • मालमत्तेवर कर्ज
  • फॅक्टरिंग – ग्राहकाकडून येणारी वसुलीचे फॅक्टरिंग.
  • ताळेबंदात retained earnings डिविडेंडसाठी न वापरता पुन्हा गुंतवणूक करणे.
  • जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी असेल, तर debentures issue करता येतात.
  • जर पब्लिक लिमिटेड कंपनी असेल, तर shares issue करता येतात.
  • वरील माहितीप्रमाणे, उद्योजकाकडे वित्त उभे करण्यासाठी विविध पर्याय आहेत, पण प्रत्येक पर्यायाचे आपल्या उद्योगाच्या गरजेनुसार मूल्यमापन करणे गरजेचे आहे.

– सीए जयदीप बर्वे
9820588298
cajaideepbarve@gmail.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?