व्यक्तिमत्त्व विकास

A=X+Y+Z | हे आहे आईन्स्टाईन यांनी सांगितलेले यशस्वी होण्याचे सूत्र

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं असेल; पण हे खरं आहे. ज्या आईन्स्टाईन यांना आपण गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांमधील भरीव कामगिरीसाठी ओळखतो, त्याच अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अवलंबायची सूत्रंसुद्धा सांगितलं आहे. गणिती सूत्रांप्रमाणे दिसणारं हे सूत्र माणसाचा यशस्वी होण्याबद्दलचा दृष्टिकोन बदलू शकतं.

या सूत्रानुसार आईन्स्टाईन असं म्हणतात की, जर A म्हणजे जीवनातील यश असेल, तर जीवनामध्ये यश हे तुमचं कार्य (X), तुमचे छंद (Y) आणि शांत राहणं (Z) यांची बेरीज आहे. चला तर मग जाणून घेऊयात, आइन्स्टाईन यांना नेमकं काय म्हणायचं आहे या सूत्रांतून.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

१. तुमचं कार्य

आईन्स्टाईन यांच्या आधुनिक विज्ञानातील भरीव कामगिरीतून त्याची प्रचंड कार्यमग्नता लक्षात येते. त्यामुळे कार्य किंवा कर्मातून आईन्स्टाईन यांना कार्यमग्नता अपेक्षित आहे, जी व्यक्तीला त्याच्या यशाकडील वाटचालीमध्ये साहाय्य करते. त्यामुळे यश मिळवण्यासाठी कर्म आवश्यक आहे, हे आपल्याला इथे लक्षात येईल.

२. तुमचे छंद

कार्य कितीही आवश्यक असलं, तरी यश मिळवण्यास फक्त कार्यमग्नता पुरेशी नसते. त्यामुळेच संशोधन करत असूनही आईन्स्टाईन हे कुशल व्हायोलिन वादक, उत्साही नाविक होते, शिवाय त्यांच्याकडे उत्तम विनोदबुद्धी होती आणि त्यांचं आयुष्यावर प्रचंड प्रेम होतं. ते रोज दिवसातून एक तास स्वतःसाठी काढत होते.

या छंदामध्ये नेहमीच्या कामापेक्षा वेगळं काहीतरी असलं पाहिजे, जे आपल्याला वेगळा अनुभव आणि आंनद देईल, मग त्यामध्ये खेळही असू शकतो.

३. मितभाषी असणं किंवा शांत राहणं

बरेचदा असं म्हटलं जातं, की मितभाषी व्यक्तीच सर्वात जास्त व्यवस्थितपणे बोलते. बरेचदा आपलं ऐकलं जावं, असं आपल्याला वाटत असतं. आईन्स्टाईन यांना स्वतःचंच खरं करायची इच्छा कधीच वाटत नसे. त्यामुळे बडबड आणि इतरांवर प्रभुत्व सिद्ध करण्याची गरज त्यांना कधी वाटली नाही. याऐवजी शांत राहून समजून घेण्याच्या सवयीचे महत्त्व त्यांना माहीत होते.

आपण बरेचदा इतरांचं लक्ष वेधून घेण्यात बराच वेळ व ऊर्जा वाया घालवतो. म्हणूनच तुम्ही स्वतः उत्तम श्रोता असल्याची कल्पना करा, जेणेकरून तुम्ही पाचच मिनिटांत पाच वर्षांत बनवू शकला नसलात, इतके मित्र बनवू शकाल. तुम्हाला इतरांमध्ये इंटरेस्ट कसा निर्माण होईल? यासाठी इतकंच करायचं आहे की, फक्त प्रश्न विचारा आणि शांत राहा.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!