स्टार्टअप

व्यवसाय उभारताना आवश्यक असते विचारांची श्रीमंती

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


शीर्षक वाचल्यावर नक्कीच कुतूहल वाटले असणार, पण मी आज मला दिसतेय ती समाजातील सत्य परिस्थिती सांगणार आहे. आज सगळेच म्हणतात, आपण ‘एकविसाव्या शतकाकडे वाटचाल’ करत आहोत; परंतु हे वाक्य मागील एकोणीस वर्षे आपण ऐकत आहोत; पण एक भारतीय म्हणून आपण नक्की कुठे आहोत?

आपण खरंच बदल स्वीकारतोय का? उद्योजकतेची मानसिकता समाजात वाढते आहे का? अशा बर्‍याच प्रश्नांची संमिश्र उत्तरे आपल्याला मिळतील. तसेच बेरोजगारी, गुन्हेगारी, फसवणूक या सगळ्या समस्यांना उपाय म्हणून एका सकस मानसिकतेची गरज आहे. माझ्या दृष्टीने मी त्याला विचारांची श्रीमंती म्हणजे म्हणेन. मुख्यत: व्यवसाय करताना तो अधिक समृद्ध करावा लागतो.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

विचारांची श्रीमंती असणे म्हणजे काय?

मुळात प्रत्येकाला कधी ना कधी वाटत असते की, आपण व्यवसाय करावा; पण ‘वैचारिक दिवाळखोरी’ नावाचा किडा त्यावर पाणी फेरतो. ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ या विचारसरणीत वाढलेलो आपण अंथरूणही मोठे घेता येऊ शकतं, हा विचारच करत नाही.

उद्योजक हा कुणाच्या पोटी जन्माला येत नसतो, तो घडवायचा असतो. वैचारिक दिवाळखोरी त्याला कधीच स्पर्श करत नाही. मोठी स्वप्ने, सुदृढ समाज हेच त्याचे ध्येय असते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘रतन टाटा’ अशी विचारांची श्रीमंती प्रत्येकाच्या अंगी बाणवणे गरजेचे असते.

व्यवसाय कोणता करावा?

व्यवसाय कोणता करावा, हा प्रश्न सगळ्यांना पडतो; पण मला वाटते हा ज्याने त्याने घ्यायचा निर्णय आहे; पण एवढे मात्र नक्की की, व्यवसायात ‘लंबी रेस का घोडा’ लागतो. ज्या व्यवसायातून तुमचे दीर्घकालीन हेतू साध्य होऊ शकतो असा व्यवसाय निवडावा. सोबतच आपली आवड आणि कल ध्यानात घ्यावे. सुरुवातीला नोकरी सांभाळून उद्योगात उतरावे लागले तरीही मागे हटू नये.

आजकाल प्रचंड संधी उपलब्ध आहेत. लघुउद्योग सुरू करून हळूहळू त्याचा विस्तार करता येतो. उदाहरणार्थ फ्रॅन्चायजी मोड्यूल असणारे, ऑनलाइन प्लॅटफॉर्म असलेले व्यवसाय हे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. डोळे उघडे ठेवून आणि मोकळ्या मनाने संधी शोधून व्यवसाय सुरू करता येईल.

सुरुवात कशी करावी?

सुरुवातीला संपूर्ण अभ्यास असणे गरजेचे आहे. छोट्यातल्या छोट्या गोष्टींचा नीट अभ्यास करून योग्य आराखडा तयार करावा. योग्य नियोजनाने सुरुवात करणे कधीही चांगले. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यात आपल्याला कोणी तरी हात धरून शिकवले आहे. मग व्यवसायात गुरू का नसावा? नक्कीच अशा व्यक्तीला षेश्रश्रेु करा जो तुमच्यापेक्षा दोन पावले पुढे आहे, त्याला त्या क्षेत्राची संपूर्ण जाण आहे, तो त्यात यशस्वीसुद्धा आहे आणि तो तुमचे हित जाणतो.

असा व्यक्ती नक्कीच आपला गुरू असावा. आपण कितीही मोठे असलो तरी लहान मूल होऊन शिकण्याची तयारी ठेवावी लागेल. ‘अहंकाराची आहुती दिल्याशिवाय ज्ञानाची प्रखरता जाणवत नाही.’ म्हणूनच व्यवसायात सतत शिकत आणि नवनवीन गोष्टींचा अंगीकार करत पुढे जायला हवे.

व्यवसायात तग कसा धरावा ?

हे जर जमलं तर जमलंच की हो! एक सहज निरीक्षण केल्यास कळते; आपल्या आजूबाजूला असणार्‍या शंभर दुकानांपैकी फक्त दहा दुकाने टिकून असतात. बघा नजर फिरवून. माझ्या मते याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण हे ‘खेळतं भांडवल’ आहे.

हे जर निर्माण करण्यास जमले नाही तर आपण खिशातून किती दिवस पैसे टाकणार? हे टाळण्यासाठी लागणारं नियोजन, व्यवसायाचं सखोल ज्ञान, मार्केटची गरज आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे कसब हे पक्कं पाहिजे. थोडक्यात ‘बेचो वही जो बिकता है’.

याहून सगळ्यात महत्त्वाचे; व्यवसायात कसे टिकावे याचे उत्तर शोधण्यापेक्षा का टिकावे? हा प्रश्न स्वत:ला विचारला तर सगळे सहज सोपे होईल. एखादी गोष्ट का करायची, हे जर स्वच्छ असेल तर कुठे, कोणता, कसा हे प्रश्न राहातच नाहीत. जसे गाडी चालवायला पेट्रोल लागते तसेच व्यवसाय करायलासुद्धा तो सुरू करण्यामागचे कारण स्पष्ट लागते.

माझे व्यवसाय सुरू करण्यामागचे कारण आहे की, मला माझ्या आईसाठी काही चांगले करायचे आहे, मला जगभर फिरायचे आहे, आपल्या देशात उद्योजकतेची मानसिकता वाढवायची आहे. असे उद्दिष्ट डोळ्यासमोर असेल तर कोणाची हिम्मत आहे तुम्हाला उखडून टाकण्याची?

साध्य कसे करावे ?

अर्थातच यासाठी आवश्यक आहे टीम वर्क. रतन टाटांचे एक खूप सुंदर वाक्य आहे, ‘जर तुम्हाला पळायचे असेल तर एकटे पळा; पण जर तुम्हाला लांब चालत जायचे असेल तर सोबत चला’. कोणतीही व्यक्ती एक मोठे लक्ष्य एकट्याने साध्य करू शकत नाही.’ टीम वर्क आणि मॅनेजमेंटचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘छत्रपती शिवाजी महाराज’. एकदा व्यावसायिक दृष्टीने महाराजांकडे बघा, खूप शिकण्यासारखे आहे.

एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्या डोक्यात तिची कल्पना असणं फार महत्त्वाचे आहे. हेच ते ‘स्वप्न’. स्वप्न कुत्रा-मांजराला पडत नसतात. ती फक्त माणसालाच पडतात आणि जो ती पूर्ण करण्यासाठी अपयश, नकार, आव्हाने पचवतो तो ‘यशस्वी उद्योजक’.

– प्रतीक कुलकर्णी


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!