घरबसल्या सुरू करू शकता अॅफिलेट मार्केटिंग उद्योग
उद्योगसंधी

घरबसल्या सुरू करू शकता अॅफिलेट मार्केटिंग उद्योग

स्मार्ट उद्योजक मासिक प्रिंट आवृत्ती वर्षभर घरपोच मिळवा फक्त रु. ५०० मध्ये! नोंदणीसाठी : https://imjo.in/Xx7Uq6

अॅफिलेट मार्केटिंग हा नव्याने उदयाला आलेला आणि खर्‍या अर्थाने एकविसाव्या शतकातील उद्योग आहे. स्वत:च्या घरात स्वत:चा संगणक, इंटरनेट जोडणी इतक्याच सामग्रीमध्ये आपण हा व्यवसाय सुरू करू शकता. अॅफिलेट मार्केटिंग म्हणजे आपल्या वेबसाइट अथवा ब्लॉगच्या माध्यमातून आपण अन्य कंपन्यांची उत्पादने विकणे. यासाठी आपल्याला संगणकीय ज्ञान, इंटरनेटची जुजबी ओळख व नवनवीन शिकण्याची तयारी हवी. यासाठी काही छोटे क्रॅश कोर्सेसही उपलब्ध आहेत.

ब्लॉग अथवा वेबसाइटच्या माध्यमातून आपण ई-बे, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांच्यासारख्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवरील उत्पादने, जसे की मोबाइल फोन, कपडे, पुस्तके इ. वस्तू विकता येतात व त्याचे तुम्हाला कमिशन मिळते. तसेच गुगलच्या Adsence या प्रोग्राममध्ये नोंदणी केल्यावर गुगलच्या विविध जाहिराती या तुमच्या वेबसाइट अथवा ब्लॉगवर दिसतात. तुमच्या वेबसाइट अथवा ब्लॉगवरून जितक्या लोकांनी गुगलची जाहिरात पाहिली त्या तुलनेत तुम्हाला पैसे मिळतात तसेच त्यावरून जर कोणी खरेदी केली तर हे कमिशन जास्त असते.

'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त रु. १२५ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imjo.in/pQERqq


अॅफिलेट मार्केटिंगमध्ये तुम्ही जगभरात तुमच्या वेबसाइटच्या माध्यमातून विक्री करू शकता. दिवसातून तीन ते चार तास सलग हे काम केल्यास चांगली रक्कम मिळू शकते. दिवसेंदिवस ज्ञानात वृद्धी करून ऑनलाइन मार्केटिंगच्या अधिकाअधिक ट्रिक्स शिकून तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवू शकता.

शहरी, निमशहरी, ग्रामीण कोणीही हा व्यवसाय करू शकतो. तुमच्या माध्यमातून विकले गेलेल्या उत्पादनांचे कमिशन ठरावीक काळानंतर तुमच्या बँक खात्यात जमा होते. त्यासाठी तुम्ही निरनिराळ्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सचे अॅफिलेट होताना तुमचे बँक खाते जोडले पाहिजे.

‘स्मार्ट उद्योजक’च्या अॅफिलेट मार्केटिंग प्रोग्रॅम बद्दल जाणून घ्या: https://shop.udyojak.org/become-online-partner/

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojaknewsletter