Advertisement
उद्योगोपयोगी

व्यवसायात टीमवर्कशिवाय पर्याय नाही

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


शंतनू फारच हुशार मुलगा. लहानपणापासूनच तो खेळात, अभ्यासात आणि मस्ती करण्यात अग्रेसर होता. त्यांची टीमच होती. शंतनू, हर्षद, कपील, सागर, कौशल, अतुल. लहानपणापासून ते एकत्र. ते नावाला मित्र होते, पण वागायचे सख्ख्या भावांप्रमाणेच. एवढंच नाही तर त्यांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला होता.

सहा जणांच्या या चमूने सुरू केलेला लहानसा व्यवसाय पाहता पाहता फारच मोठा झाला. सर्वांचं लग्नही झालं. बायकाही अगदी नक्षत्रासारख्या मिळाल्या ह्यांना. हेसुद्धा दिसायला काही कमी नाही. चित्रपटातल्या हिरोलाही मागे टाकतील. पण त्यांच्यात शंतनू उजवा आहे असं म्हणायला हरकत नाही.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

देखणा, बुद्धीमान, उच्चशिक्षित, हुशार आणि आता तर श्रीमंतही झाला होता. पण अचानक काय बिनसलं त्याचं कोणालाही कळायला मार्ग नाही. तो त्याच्या मित्रांशी फारसा बोलत नव्हता. कंपनीतून त्याने भागीदारी काढून घेण्याचा निर्णय घेतला. मित्रांच्या असंही कानी आलं होतं की तो स्वतःची नवीन कंपनी स्थापन करणार आहे.

हे सगळं इतकं अचानक कसं झालं? शंतनूच्या बायकोला कपीलने फोन केला व भेटण्यासाठी वेळ मागितली. त्याच्या बायकोलाही शंतनूचा हा निर्णय पटला नव्हता. ती कपीलला म्हणाली की शंतनूला अहंकार झाला आहे. त्याला असं वाटतं की कंपनीला जो नफा होत आहे तो त्याच्या कर्तृत्वामुळे आणि फायदा मात्र इतर पाच मित्रांना होतो. कपीलला हे ऐकून धक्काच बसला. कपीलने ही हकीकत सर्व मित्रांना सांगितली.

सर्वांनी निर्णय घेतला एकदा शंतनूला जावून भेटायचं. कपीलने गपचुप शंतनूच्या बायकोला फोन करून सांगितलं की ते सर्व आज रात्री घरी येणार आहेत, पण शंतनूला याबद्दल कळता कामा नये.

नाहीतर तो उगाच काहीतरी बहाणा बनवून न भेटण्याचे कारण शोधेल. ठरल्याप्रमाणे सगळे शंतनूच्या घरी आले. दरवाजा शंतनूच्या बायकोने उघडला. तिने शंतनूला मित्र आल्याचे सांगितले.

त्याच्या चेहर्‍यावरचा तर रंगच उडाला. थंडी फारच पडली होती. शंतनू स्वेटर घालून शेकोटी समोर बसला होता. सर्व मित्र त्याच्या बाजूला खुर्चीत बसले. पण बोलण्याला सुरुवात कोण व कशी करणार, हे कुणालाच उमगेना.

शेवटी शंतनूच्या बायकोनेच कंपनीचं काम कसं सुरू आहे, थंडी फार बोचरी आहे असले उगाच काहीतरी विषय उकरून काढले. शंतनूला मात्र कशातच रस नव्हता. अचानक कपील उठला आणि त्याने एका काठीने शेकोटीतला निखारा बाजूला केला. तसा तो निखारा हळूहळू विझू लागला.

कपीलने शंतनूच्या खांद्यावर हात ठेवला. शंतनूने एक कटाक्ष कपीलवर टाकला व उठून त्याला मिठी मारली. सर्वांनी शंतनूला मिठी मारली. सर्वांच्याच ओठावर हसू आणि डोळ्यात अश्रू होते. शंतनूसारखा निखारा विझणार होता. इतक्यात मित्रांनीच त्याला सावरलं.

तात्पर्य : निखारा ज्वाळांपासून दूर केला तर तो विझणारच. एखादा निखारा खूप फुलला असं म्हणत त्याच्या आप्तेष्टांपासून म्हणजे इतर निखार्‍यांपासून दूर झाला तर तो विझणार. तसंच आपण जोपर्यंत एकजूटीने काम करतो आहोत. तोपर्यंत आपण निखार्‍यासारखे आहोत.

एखादा माणूस कितीही हुशार असला तरी त्याला इतरांची साथ लागतेच. एकटा माणूस काहीच करु शकत नाही. कोणतेही कार्य हे एकजूटीने होते. म्हणून यशाच्या मार्गवरुन चालताना एकजूटीने काम करा. कुणालाही दुखवू नका.

माणसे जोडत राहा… व्यवसायात टीम वर्कला अधिक महत्त्व आहे.

– जयेश मेस्त्री
writerjayeshmestry@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!