मी उद्योजक होणारच या संस्थेने आज ५ मार्च रोजी षण्मुखानंद सभागृहात मराठी गौरव दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ३,००० उद्योजक सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्राचे केंद्रीय MSME मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच सुरेश हावरे, रवींद्र प्रमुदेसाई, मिलिंद कांबळे, अजित मराठे, ललित गांधी, राजेश अथायडे, संजय यादवराव इत्यादी उद्योग क्षेत्रातील दिग्गज या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
‘सॅटर्डे क्लब’चे प्रमुख ट्रस्टी अशोक दुगाडे यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे.
उद्योग क्षेत्रासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या अनेक संस्था व उद्योजकांना यामध्ये सन्मानही केला जाणार आहे. ‘स्मार्ट उद्योजक’चे संस्थापक शैलेश राजपूत यांचाही या कार्यक्रमात सत्कार केला जाणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे. खालील लिंकवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता.
https://forms.gle/jUNg6Nc8KVyeWH8r9
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.