महिलांसाठी कमीत कमी बजेटमध्ये आणि घरच्या घरी सुरू करता येतील अशा पाच उद्योगसंधी

महिलांना आपले घर, संसार सांभाळून अर्थार्जनासासाठी काही ना काही उद्योग करून आपल्या घराला, कुटुंबाला हातभार लावायचा असतो. अशा महिलांसाठी कमीत कमी बजेटमध्ये आणि घरच्या घरी सुरू करता येतील अशा पाच व्यवसायांची माहिती देत आहोत.

ज्यूट बॅग्जचा व्यवसाय

प्लास्टिक आणि कापडी पिशव्यांच्या तुलनेत ज्यूटच्या पिशव्या खूपच स्वस्त आणि टिकावू असतात. त्यामुळे ज्यूटपासून बनवलेल्या पिशव्यांना मागणी आहे, ही मागणी आगामी काळात कमी होणार नाही, असा अंदाज आहे. भारतासोबतच परदेशातही या पिशव्यांना मागणी असल्याने ही एक व्यवसायाची चांगली संधी आहे.

हा लघूउद्योग म्हणून सुरू करता येईल असा उद्योग आहे. अल्प गुंतवणूकीत याचा श्रीगणेशा करता येतो. लघुउद्योग सुरू करण्यासाठी सुरुवातीला किमान ५ शिलाई मशीन आणि दोन हेवी ड्युटी मशीन खरेदी करणे आवश्यक आहे. याशिवाय कच्चा माल, कामगार आणि काही किरकोळ कामांवरही खर्च करावा लागेल. त्यामुळे सुरुवातीला गुंतवणूक आवश्यक आहे.

ज्यूट बॅग व्यवसायाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा : udyojak.org/how-to-start-jute-bag-business/


ब्लॉग वेबसाइट चालवा

स्वत:चा ब्लॉग किंवा वेबसाइट सुरू करून तुम्ही तुमचे लेखन यावर प्रसिद्ध करू शकता. सोशल मीडिया व डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून याला वाचक जोडू शकता. तुमच्या वेबसाइटवर तुम्ही गुगल जाहिराती, अन्य माध्यमातील जाहिराती किंवा स्वत: जाहिराती मिळवू शकता.

महिना शंभर अमेरिकन डॉलर ते एक हजार डॉलरचे जाहिरात उत्पन्न मिळवणे कठीण नाही. मात्र वाचकांच्या पसंतीचा मजकूर, नवनवीन लेखन तुम्हाला ब्लॉग अथवा वेबसाइटवर देत राहावे लागेल.

तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाइटवर अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांचे अ‍ॅफिलिएट होऊन त्यांची प्रॉडक्ट्स ही विकू शकता. तुम्ही उपलब्ध केलेल्या जागेत या कंपन्यांवर विक्रीला उपलब्ध असलेली प्रॉडक्ट्स तुमच्या अ‍ॅफिलिएट लिंकने विक्रीला उपलब्ध होतील.

तुमचा वाचक ही प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करतो तेव्हा तो प्रत्यक्ष खरेदी ही अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरून करतो व यात तुम्हाला कमीशन मिळते. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट एक टक्का ते पंधरा टक्क्यांपर्यंत कमीशन देतात.


विमा, म्युच्युअल फंड विका

विमा प्रतिनिधी किंवा म्युच्युअल फंडचे परवानाधारक विक्रेते झाल्यावर तुम्ही लोकांना विमा किंवा म्युच्युअल फंड विकू शकता. ग्राहकाला सुरुवातीला एकदाच योजना समजवायची आहे.

इथे तुमचे विक्रीकौशल्य पणाला लागते. त्यानंतर तो विमा किंवा म्युच्युअल फंड जितके काळ चालू राहतो, त्यातून तुम्हाला काही ना काही कमीशन येत राहते.

जीवन विमा तर २० ते ३५ वर्षांचा असतो, म्हणजे एकदा ग्राहकाला विमा खरेदी करायला लावला की त्या ग्राहकाच्या माध्यमातून तुम्ही प्रत्यक्ष काहीही न करता तुम्हाला उत्पन्न येत राहते.

विमा सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला IRDA मार्फत घेतलेल्या परीक्षेला हजेरी लावणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूक सल्लागारासाठी तुम्हाला AMFI ची परीक्षा देण्याची गरज आहे. आपण या परीक्षांना एक-दोन महिन्यांच्या अभ्यासासह तयार होऊन उपस्थित राहू शकता.

आपण एकाच वेळी गुंतवणूक आणि विमा सल्लागार होऊ शकता. विमा आणि गुंतवणूक कंपन्या सल्लागारांना अर्धा टक्यापासून ४५ टक्क्यांपर्यंत कमीशन देतात.


बागकाम

आज कुठल्याही कार्यक्रमात अनेक ठिकाणी रोपे दिली जातात. तुमच्याकडे मोकळी जागा असेल तर तुम्ही तुळशीची लागवड करू शकता. तुळस लावायला किती खर्च अपेक्षित आहे तुम्ही अंदाज करू शकता.

मुंबईसारख्या ठिकाणी एक रोप पंधरा रुपयांच्या खाली येत नाही. हीच गोष्ट मातीची. शहरात मातीला किंमत ₹३० – ₹४० किलो सुरू आहे. हल्ली सोसायट्यांमध्ये टेरेस गार्डन संकल्पना जोरात सुरू आहे.

तुमच्याकडे घरची माती आहे, रोपे आहेत तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता. कुंड्या, माती व रोपे यांच्या माध्यमातून टेरेस गार्डन बनवून देण्याचा व्यवसाय उत्तम आहे. दरवर्षी देखभाल खर्च घेऊन तो ग्राहक तुम्ही टिकवू शकता.

बागकाम व्यवसायाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा : udyojak.org/terrace-gardening-for-side-income/


योग्य प्रशिक्षक व्हा

शारीरिक असो अथवा मानसिक आज आरोग्याची काळजी घेणे ही खूप मोठी गरज आहे. सध्याच्या काळात योगा आणि त्या संबंधित व्यवसायाची मोठी इंडस्ट्री उदयाला येतेय. ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे उद्योगाची रोजगाराची संधी आपल्याकडे उपलब्ध आहे.

योग ही आता एक इंडस्ट्री बनते आहे आणि तिची व्यापकता सध्या दिवसेंदिवस वाढतेय. आरोग्याशी संबंधित जागरूकता, योगाचा प्रचार- प्रसार हे सारं पाहता नव्या काळात योग करणारे आणि योग शिकवणारे असं मिळून एक नवीन व्यवसाय क्षेत्र वाढतंय. याचे शास्त्रोक्त ज्ञान आहे अशांना अनेक नवीन संधी येत्या काळात मोठ्या प्रमाणात आहेत.

योग विषयात एखादी पदवी, पदविका किंवा प्रमाणपत्र मिळवल्यानंतर प्रत्येकाला स्वतःचा स्वयंरोजगार किंवा उद्योग सुरू करता येईल. या कामाची सुरुवात आपण आपल्या घरापासून करू शकतो. आपल्या ओळखीतून आपले ग्राहक तयार करता येईल. या कामात घाई करून चालत नाही.

छोट्या जागेत किंवा स्वतःच्या घरी योग क्लास घेऊ शकतो. शिवाय आपल्याकडे ज्यांना येणे शक्य नसेल त्यांना त्यांच्या घरी जाऊन शिकवता येईल. याशिवाय अनेक विविध संधी यात उपलब्ध आहेत.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?