20200518 115712 0000

रेप्युटेशन मॅनेजमेंट :: ब्रॅण्ड घडवणारा व्यवसाय

आपल्या बहिणीला, मुलीला एखाद्या मुलाचे स्थळ आले की, आपण मुलाबद्दल परिचितांकडून माहिती काढतो. उदा. कमाई किती आहे, वर्तन कसे आहे, व्यवहार कसा आहे, व्यसन वगैरे. घरातील लोकांची प्रवृत्ती व समाजात reputation कसे आहे? आज उद्योग, राजकारण, समाजकारण यात आज Reputation Management ला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.

स्वत:बद्दल, ब्रँडबद्दल, प्रॉडक्टबद्दल सतत एक सकारात्मक व चांगली प्रतिमा तयार करत राहणे व ती शाबुत ठेवणे महत्त्वाचे असते. त्यामध्ये व्यक्ती किंवा ब्रँडबद्दल अनेक चांगल्या गोष्टींचा प्रसारमाध्यमांतून प्रचार-प्रसार करणे, आपल्या बातम्या छापून याव्यात यासाठी पत्रकार लोकांशी चांगले संबंध निर्माण करणे.

अनेक चांगल्या व्यक्ती, कार्यक्रम, इव्हेंट संस्था यांच्याशी आपला संबंध प्रस्थापित करणे व आपले को-ब्रँडिंग करणे, अनेक चांगले लोक आपल्याबद्दल कसे चांगले बोलतील व त्याचाच प्रसार कसा होईल हे पाहावे. उद्योगाबद्दल चांगले लिहिणे व ते सोशल मीडिया, ब्लॉग मीडियात प्रसिद्ध करणे.

काही चुका झाल्या असतील तर त्यावर उत्तरे देऊन damage control करणे किंवा चुकीच्या बातम्या मीडियाला हाताशी धरून त्या दाबणे. काही संस्थांकडून पुरस्कार, अ‍ॅवॉर्ड, सदस्यत्व इत्यादी मिळवून आदरसत्कार घडवून आणणे.

आज ९० टक्के पुरस्कार विकले जातात हे कटू सत्य आहे. दादा कोंडकेंचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट व्हायचा, पण पुरस्कार मिळालेला नाही, कारण दादांनी कधी पुरस्कार विकत घेतले नाहीत. आज ज्याला गल्लीत कोण ओळखत नाही त्यांना पुरस्कार मिळतात.

खास पुरस्कार विकण्यासाठी आज संस्था निर्माण करणे व इव्हेंट करणे एक धंदा झाला आहे. तर आपल्या क्लाएंट, प्रॉडक्टचे रेप्युटेशन मॅनेज करणे हा आता खूप मोठा उद्योग झाला आहे त्यासाठी लाखो रुपयांची फी मोजली जाते, कारण प्रसिद्धी आता फुकट मिळत नाही. प्रत्येक गोष्टीला पैसे फेकावे लागतात.

हा उद्योग करण्यासाठी तुम्हाला प्रसारमाध्यमे, पत्रकारिता, प्रेस रायटिंग, पब्लिक रिलेशन, प्रवक्ता इत्यादीबद्दल चांगली माहिती असावी लागते. एक-दोन महिन्यांच्या चांगल्या माहितीने हा उद्योग तुम्ही सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला एक १० बाय १० चे छोटे कार्यालय, २ ते ३ कर्मचारी, १५ ते २५ लाखांपर्यंत भांडवल लागेल. महिना ८० हजार नफा अपेक्षित आहे.

थोडक्यात लायकी, प्रत, प्रतिष्ठा नसलेल्याला ते पैसे देऊन मीडियात, समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देणे म्हणजे रेप्युटेशन मॅनेजमेंट होय. प्रत्यक्ष माणूस ब्रँड कंपनी कशी आहे हे सामान्य माणसाला कधीच कळत नाही. जे तुम्हाला दिसतं व समजतं ते रेप्युटेशन तंत्राची कमाल असते.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

तुम्ही उद्योजक / व्यापारी / व्यावसायिक आहात आणि तुमचीही बिझनेस प्रोफाइल या पोर्टलवर प्रसिद्ध करायची आहे? तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: Content is protected !!
Scroll to Top