महाराष्ट्राच्या औद्योगिक जडणघडणीत ‘एमआयडीसी’चे योगदान


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


माझे आबा (वडील) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (एमआयडीसी) नोकरीला होते. त्यांच्या नोकरीमुळे धाराशिव, रायगड, ठाणे असे महाराष्ट्रातील बर्‍याच ठिकाणी आम्हाला राहावं लागलं. या काळात लहानपणापासून एमआयडीसीची कार्यपद्धती मला जवळून पाहता आली.

देशात आजही महाराष्ट्र औद्योगिकतेमध्ये प्रगत राज्यांत आहे, याचे एकमेव श्रेय जाते ते एमआयडीसीला. १९६२ ला ठाण्यातील वागळे इस्टेटपासून याची सुरुवात झाली आणि पूर्ण राज्यात ठिकठिकाणी याद्वारे औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या. यामध्ये उद्योगांना जमीन उपलब्ध करून देणे व तिथे रस्ते, वीज, पाण्याची सोय करणे, देखभाल करणे हे मुख्य काम.

महाराष्ट्राचा जो इतर राज्यांच्या मानाने झपाट्याने विकास झाला त्यामागील एमआयडीसी हे मुख्य कारण आहे. त्यात मराठी माणसांची परराज्यातील लोकांना आपलेसे मानून घेण्याची वृत्ती यामुळे आपल्याकडील मुबलक मनुष्यबळ हेही महत्त्वाचे आहे.

गेल्या दोन दशकांत देशातील उद्योजकता वाढत चाललेली असताना त्यामानाने राज्यातील औद्योगिक सुबत्तेची पीछेहाट झालेली दिसून येईल. याची मुख्य कारणे काय असतील व त्यावर उपाय काय असावेत हे या विश्‍लेषणास प्रतिसाद देवून आपण आपले मत मांडू शकता.

इतक्या वर्षांत एमआयडीसी जवळून पाहिल्याने माझ्या निदर्शनास आलेले पुढील मुद्दे ज्यावर दिलेल्या उपयांनुसार अवलंबण होणे गरजेचे आहे.

१) कामगार संघटनांमधील राजकीय हस्तक्षेप
२) कॉन्ट्रॅक्ट पद्धत
३) स्थानिक गुंडगिरी
४) सामान्य कामगारांना किमान वेतन न मिळणे
५) उद्योगांचे स्वत:चे उत्पादन करण्यावर व त्यात नफ्यावर जास्त भर देणे.
६) एमआयडीसीमधील टेंडर पद्धतीमुळे सुधारणामधील होणारी दिरंगाई व क्‍वालिटी कन्ट्रोल नसणे.
७) औद्योगिकता वाढवण्याबाबत राजकीय अनास्था.
८) स्थानिक पातळीवर उद्योगांना समस्येवर तात्काळ न मिळणारे समाधान.
९) इतर राज्यांच्या (विशेष करून गुजरात) मानाने उद्योग सुलभतेत असलेली कमतरता.
१०) कुशल मनुष्यबळाची कमी व स्थानिक मजुरांची मुजोरी.

या सर्वाचे एकंदरीत परिणाम काय तर उद्योग इतर राज्यांकडे पर्याय म्हणून पाहू लागले आहेत. तरीही अजूनही उद्योगांस अपेक्षित असणारे महाराष्ट्रामध्ये जे शहरीकरण आहे; जे भौगोलिक, नैसर्गिक वातावरण आहे व जसे पायाभूत सुविधा आहेत, त्या इतर कुठल्याही राज्यात नाहीत.

हे टिकवून ठेवायचे तर राज्याचा उद्योग विभाग व एमआयडीसीद्वारे सर्वात जास्त गुंतवणूक होणे आवश्यक आहे ती म्हणजे व्यवस्थेनवर. वरिल सर्व मुद्दे इथली व्यवस्था सुधारली, तर सहज सुधारणा होवू शकते. जसे की,

१) एमबीए झालेले अनुभवी तरुण प्रत्येक विभागात गुण व कृतीशीलतेच्या आधारावर असणे आवश्यक आहे.
२) देशातून व जगभरातून महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्याकरता राजकारणी नेतृत्वापेक्षा तिथे मार्केटिंगतज्ज्ञ असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडून टार्गेट देवून काम करून घेणे आवश्यक आहे.
३) असलेल्या उद्योगांना उत्तम सेवा देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी. त्यांच्या समस्या सहज सुटल्या तर ते इतर उद्योगांना पॉजिटिव्ह फीडबॅक देतील.
कोणतेही राज्य किंवा देशासाठी सर्वात महत्त्वाचे खाते आहे ते म्हणजे उद्योग. एखादा मोठा उद्योग उभारला गेला तर त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो, दळणवळण वाढते, रहदारी वाढते, बाजारपेठ वाढते, त्यातून आणखी रोजंदारी वाढते एकंदरित त्या भागाचा विकास होतो.

– तुषार कथोरे
(लेखक अभियंता असून युवा उद्योजक आहेत.)
7021631848

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?