कमी गुंतवणूकीत अधिक उत्पादन देणारी रेशीम शेती
उद्योगसंधी

कमी गुंतवणूकीत अधिक उत्पादन देणारी रेशीम शेती

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


अत्यंत कमी खर्चात व जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येणारा आहे. तुतीच्या झाडावर रेशमाच्या किड्यांची पैदास होत असते. अशा या उपयुक्त तुतीची लागवड निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते.

तुतीच्या झाडाला लागणारे पाणी हे एक एकर ऊसाला लागणाऱ्या पाण्याच्या तीन पट कमी असते. म्हणजे एक एकर ऊसाला लागणाऱ्या पाण्यात तीन एकर तुतीची शेती होते. तुतीच्या झाडाचा दुसरा फायदा म्हणजे एकदा तुतीच्या झाडाची लागवड केली की ते कमीत कमी पंधरा वर्षे तरी जीवंत राहते. त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च वाचतो.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

आपल्याकडे एप्रिल – मे महिन्यात दुष्काळ सदृश्य स्थिती असते. त्यामुळे पिकांवर याचा परिणाम होतो. पण तुतीच्या लागवडीला या काळात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा खूप मोठा फायदा आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनाही हा व्यवसाय करता येतो. आपल्याकडे सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा प्रत्येकाला या व्यवसायाचा विचार प्रामुख्याने करता येईल.

रेशीम व्यवसायात तुती लागवड, कीटक संगोपन, धागानिर्मिती आणि कापडनिर्मिती असे प्रामुख्याने चार प्रकारचे व्यवसाय करता येतात.

तुती लागवडीबाबत घ्यावयाची काळजी

तुतीची लागवड करताना रहदारीच्या रस्त्यापासून दूर असणाऱ्या शेतजमिनीवर याची लागवड करावी. कारण रेशीमकीटक संगोपनासाठी धुळीने खराब झालेली पाने वापरता येत नाहीत. तसेच कीटकनाशकांच्या फवारणीपासूनही तुतीला दूर ठेवावे. तुतीची लागवड आणि त्यातून निर्माण होणारे रेशीम हा एक खूप मोठा व्यवसाय आहे.

रेशीम उद्योगावर अवलंबून असणारा कापडनिर्मितीचा व्यवसाय जागतिक बाजारपेठेत खूप मोठी उलाढाल करतो त्यामुळे यातही अनेक संधी आहेत. कारण देश-विदेशात रेशमी कपड्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

रेशीमकीटकांचे पालन

रेशीम किडा हा या शेतीमधला महत्त्वाचा भाग. त्याची काळजी आणि व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. रेशीम किड्यांच्या पालनासाठी योग्य तंत्रज्ञान वापरल्यास वर्षभर रेशीमकीटकांचे पालन करण्याची खूप मोठी संधी असते. यात खूप काळजी मात्र घ्यावी लागते. अन्यथा कीटकपालनावर विपरित परिणामसुद्धा होऊ शकतो. दर्जा आणि उत्पन्नक्षमता यावर परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे त्याचा भाव कमी मिळतो आणि मग नुकसान होते. रेशीमकीटकाच्या शरीराचे तापमान थंड असते त्यामुळे त्याच्यावर वातावरणातील तापमानादुसार बदल होत असतो. रेशीम कीटकांचे पालन १५ अंश ते ४० अंश या दरम्यान केले जाते.

रेशीमकीटक संगोपनगृह

रेशीमकीटक संगोपनगृह थंड जागेत असावे किंवा सावलीच्या ठिकाणी बांधावे. मातीच्या जाड भिंती, पालापाचोळा, कौलांचा वापर करून कीटक संगोपनगृह बांधावे. कीटक संगोपनाच्या छतावर नारळ, भात, गवत इत्यादीचा वापर केल्यास तापमान नियंत्रणास मदत होते. तसेच छतावर मारण्यासाठी विशिष्ठ पद्धतीचे पेंट बाजारात मिळतात, त्यांचा वापर केल्यास तापमान ५ ते ६ अंश से. कमी होते. कीटक संगोपनगृहाच्या आजुबाजूला वेगवेगळी झाडे लावावीत. प्रामुख्याने तुतीचे झाडे लावल्यास दुहेरी फायदा होतो.

देशाभरात रेशीम उद्योग आणि तुती लागवड यांची झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात विदर्भात जास्त प्रमाणात हा उद्योग दिसून येतो. रोजगाराची प्रचंड क्षमता असणाऱ्या या उद्योगाचे ग्रामीण विकासात मोठे योगदान आहे. या उद्योगातून ग्रामीण भागातील लोकांना तुती लागवड, कीटकसंगोपन व धागानिमिर्तीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. रेशीम उद्योगातून दिवसेंदिवस आपल्या देशाला मिळणाऱ्या परकीय चलनात वाढ होत आहे.

रेशीम उद्योगातून कापड निर्मिती

रेशीम उद्योगात हातमागावर कापड निर्मिती करणे जास्त सोयीचे आहे. रेशीम कापडावर करण्यात येणारे डिझाईन्स हे रंगीत धागे वापरून काढता येतात. प्लेन कापडावर रंगकाम व छपाई चांगल्या प्रकारे करता येते. त्याचसोबत हातमागावर कातलेल्या कापडावर भरतकाम आणि वेगवेगळी डिझाइन्स करता येतात.

आर्थिक गणितांचा विचार केला तर यंत्रमागापेक्षा हातमाग कमी खर्चिक व रेशमाच्या कपड्यापासून अनेक प्रकारचे नमुने तयार करण्यास जास्त उपयोगी ठरतो. हातमागाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी अर्धस्वयंचलित हातमाग, पॅडल हातमाग हे काही वांगणी दाखल.


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!