उद्योगोपयोगी

आपण एकविसाव्या शतकातले उद्योजक आहात का?

'स्मार्ट उद्योजक' मासिक (प्रिंट) वर्षभर आपल्या घरी मागण्यासाठी येथे क्लिक करा.

मार्च महिना आपल्या सगळ्यांसाठीच लक्ष्यपूर्तीचा महिना आहे. ३१ मार्चपर्यंत आपण सगळेच आपआपली व्यावसायिक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या धावपळीत असतो. एकूणच या धावपळीचा क्षीण घेऊन आपण नव्या अर्थिक वर्षात प्रवेश करत असतो. नव्या वर्षात आदल्या वर्षीपेक्षा मोठे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेऊन ते पूर्ण करण्याचा आराखडाही तयार करतो.

हा सारा घटनाक्रम उद्योजकीय जीवनात नित्याचाच आहे. पण यावर्षी आपण यामध्ये थोडा बदल करण्याची आवश्यकता आहे. आपण एकविसाव्या शतकातले उद्योजक आहोत. त्यामुळे आपली व्यवसाय करण्याची पद्धत हीसुद्धा जर का एकविसाव्या शतकाप्रमाणे नसेल, तर आपण कितपत यशस्वी होऊ शकू याबद्दल शंका आहे.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imojo.in/3x3a5zn


विसावे शतक मावळत असतानाच ई-कॉमर्स युगाचा प्रारंभ झाला. एकविसाव्या शतकात हे क्षेत्र दिवसागणिक विकसित होत आहे. तज्ज्ञांचे ठाम मत आहे की आणखी पाच ते दहा वर्षांत जे व्यवसाय ई-कॉमर्सचा अंगिकार करणार नाहीत ते निश्‍चितच संपुष्टात येतील.

ई-कॉमर्सचा अंगिकार करणे याचा अर्थ स्वत:ची ई-कॉमर्स वेबसाइट असणे गरजेचे आहे असे नाही. आज ई-कॉमर्ससाठी विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. रोज नव्याने मार्केटप्लेसेस सुरू होत आहेत. आपण त्यांच्याशी जोडले जाऊ शकतो. पारंपारिक जाहिरातींवरील खर्च कमी करून आधुनिक माध्यमांद्वारे लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य आहे.

यातील बरेच प्लॅटफॉर्म हे तुमच्या उत्पादनांची आधुनिक पद्धतीने जाहिरातही करतात व तुम्हाला तुमचा माल विकूनही देतात. गरज आहे ती फक्त तुम्ही पुढाकार घेऊन स्वत:च्या व्यवसायाला एकविसाव्या शतकात घेऊन जाण्याची.

– शैलेश राजपूत

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

WhatsApp chat
error: Content is protected !!