‘उद्योग ऊर्जा’ची १००वी कॉन्फरन्स बदलापूरमध्ये

ठाणे ते बदलापूर उपनगरांतील उद्योजकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गेली पाच वर्षे कार्यरत असलेल्या उद्योग ऊर्जा या संघटनेने आपले शंभरावे व्यावसायिक स्नेहसंमेलन आयोजित केले आहे. बदलापूर येथे बार्वी धरणाच्या निसर्गरम्य परिसरात आणि उल्हास नदीजवळ असलेल्या ‘रिव्हर व्हिलेज’ रिसॉर्ट येथे ३१ मे आणि १ जून असे हे संमेलन होणार आहे.

सूक्ष्म, लघू व मध्यम क्षेत्रातील उद्योजकांचा दृष्टिकोन आमुलाग्र बदलून खऱ्या अर्थाने त्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढवण्याच्या दृष्टीने काम करणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश्य आहे. या कॉन्फरन्समध्ये विविध विषयावरील तज्ज्ञांचा सहभाग होणार असून व्यवसायवाढीसंदर्भातील विविध विषयांवर येथे मार्गदर्शन केले जाणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, दुकानदार, सल्लागार अशा सर्व सर्वसमावेशक ‘महाबिझनेस डिजिटल डिरेक्टरी’चे यावेळी प्रकाशन होणार आहे.

या व्यावसायिक सभेला डोंबिवली-कल्याण-ठाणे व मुंबई परिसरातील अधिकाधिक व्यावसायिक मित्रांनी हजर राहावे, असे आवाहन आयोजक आणि संस्थेचे सहसंस्थापक निलेश बागवे, सोहळ्याचे निमंत्रक जिग्नेश दवे, सहनिमंत्रक दिपक राणे व सचिन चोगले यांनी केले आहे.

उद्योग ऊर्जा कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी 9224453677 किंवा 9920100308 या क्रमांकावर संपर्क साधावा.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?