Advertisement
उद्योजकता

व्यवसाय सुरू करण्याच्या दोन सोप्या पद्धती सोल प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

होतकरू उद्योजकांना धंदा तर सुरू करायचा असतो, पण कुठल्या नेमक्या स्वरूपात करायचा, याबाबत प्रश्न असतात. याचे कारण म्हणजे धंदा सुरू करण्यासाठी भारतात विविध प्रकार आहेत. किंबहुना व्यवसायाचे कुठले नेमके स्वरूप असले पाहिजे, हा पहिला महत्त्वाचा कायदेशीर विचार होऊ शकेल.

उपलब्ध पर्यायामध्ये एक स्वरूप निवडणे यामध्ये गोंधळ उडू शकतो. कधी कधी नेमक्या स्वरूपाबद्दल चुकीचे सल्ले किंवा चुकीची माहिती यामुळे सुरुवातीपासूनच प्रॉब्लेम्स येऊ शकतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ, खर्च , मेहनत, त्या विशिष्ट स्वरूपाचे कायदेशीर बंधन हे काही निवड करण्यामागे घटक आहेत. या लेखात आपण Sole Proprietorship आणि Partnership (भागीदारी) यांच्या संदर्भात काही माहिती घेणार आहोत.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

सोल प्रोप्रायटरशिप

१) सुरुवात करायला सर्वात सोपे. होतकरू उद्योजक हा एकट्याने त्याचा व्यवसाय सुरू करू शकतो. कुठलाही परदेशी नागरीक भारतात सोल प्रोप्रायटरशिप सुरू करू शकत नाही आणि चालवू शकत नाही.

२) नावाप्रमाणे एकापेक्षा अधिक मालक असू शकत नाही.

३) आपल्या आवडीप्रमाणे व्यायसायासाठी नावाची निवड करू शकतो. ज्या नावांचा ट्रेडमार्क काढला आहे, ती नावे नसावीत. ही काळजी घेतली तर नावासाठी अतिरिक्त परवानगीची आवश्यकता नाही.

४) सोल प्रोप्रायटरशिप चालू करायला कुठेही नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावे लागणार नाही, पण प्रत्येक राज्यामध्ये किंवा त्यातल्या शहरामध्ये किंवा विभागामध्ये जर परवानगी लागत असेल तर घावी.

५) काही उद्योगांना जीएसटी किंवा इतर वैधानिक नोंदणी आवश्यक असते. उदा. ई-कॉमर्स व्यवसाय.

६) सोल प्रोप्रायटरशिप ही मालकापेक्षा वेगळी नसते. म्हणूनच जी काही देणी असतील त्याला मालक जबाबदार असतो. याचाच अर्थ, त्याची वैयक्तिक मालमत्तासुद्धा असुरक्षित असते. त्यामुळे व्यवसायामध्ये काही धोकादायक निर्णय घेण्यासाठी अधिक विचार करावा लागतो.

७) वर सांगितल्याप्रमाणे सोल प्रोप्रायटरशिप ही मालकापेक्षा वेगळी नसते, म्हणून त्याचे अस्तित्व मालकावर अवलंबून असते. मालक केव्हाही सोल प्रोप्रायटरशिप बंद करू शकतो. तसेच मालकाचेच मरण झाले, तर सोल प्रोप्रायटरशिप बंद होईल. जर का मालकाने मृत्युपत्र केले असेल, तर ते execute झाल्यावर, Succession will प्रमाणे होऊ शकेल.

८ ) मालकाच्या वैयक्तिक आयकर परताव्यामध्ये प्रोप्रायटरशिपचे उत्पन्न घ्यावे लागेल.

पार्टनरशिप

१) दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन पार्टनरशिप फर्म सुरू करू शकतात. या व्यक्तींना भागीदार म्हणजेच पार्टनर्स म्हणतात. किमान दोन आणि कमाल शंभर भागीदार असू शकतात, पण कुठलाही भागीदार हा विदेशी नागरीक नसावा.

२) पार्टनरशिपची नोंदणी (रजिस्ट्रेशन) पार्टनरशिप कायदा, १९३२ खाली होते, परंतु ही नोंदणी करणे अनिवार्य नाही. मात्र नोंदणी केल्याचे काही फायदे आहेत. जर काही कारणांमुळे भागीदारांमध्ये भांडणे झाली, तर registered पार्टनरशिप डीड बंधनकारक असते. तसेच प्रत्येक राज्यामध्ये किंवा त्यातल्या शहरामध्ये किंवा विभागामध्ये जर परवानगी लागत असेल तर घावी लागते.

३) आपल्या आवडीप्रमाणे व्यवसायासाठी नावाची निवड करू शकतो. ज्या नावांचा ट्रेडमार्क काढला आहे, ती नावे नसावीत. ही काळजी घेतली तर नावासाठी अतिरिक्त परवानगीची आवश्यकता नाही.

४ ) भागीदार हे व्यवसायाच्या सर्व देण्यांसाठी (liabilities) जबाबदार असतात. याचाच अर्थ, त्यांची वैयक्तिक मालमत्तासुद्धा असुरक्षित असते. त्यामुळे व्यवसायामध्ये काही धोकादायक निर्णय घेण्यासाठी अधिक विचार करावा लागतो.

५ ) पार्टनरशिपसाठी पार्टनर्सच्या मिटींग्स अनिवार्य नाहीत. तसेच पार्टनरशिपचा annual रिटर्नही भरायचा नसतो.

६ ) नवीन पार्टनर्स घेणे किंवा असलेली पार्टनरशिप Dissolve करणे ही पार्टनर्सवर अवलंबून असते.

७ ) पार्टनरशिपसाठी स्वतंत्र Income Tax Return भरावा लागतो. पार्टनरशिपच्या नफ्यावर ३० टक्के कर लागतो. जर नफा ₹ १ करोड असेल, तर surcharge टॅक्सच्या १२ टक्के लागेल. याच्याव्यतिरिक्त Health and Education cess हा income tax plus surcharge वर ४% असतो.

पुढील लेखात Limited Liability Partnership ( LLP ), One Person Company (OPC ) आणि Private Limited कंपनी याबद्दल माहिती घेऊ.

आपल्या काही सूचना असतील किंवा अभिप्राय असतील तर अवश्य संपर्क साधा :

– सीए जयदीप बर्वे
संपर्क : 9820588298
cajaideepbarve@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!