Advertisement
उद्योगसंधी

ग्रामीण भागात करता येण्यासारखे व्यवसाय

मला सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ग्रामीण भागात कोणता व्यवसाय करावा?

जर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करायचे असेल तर क्षेत्र कोणतंही असो ग्रामीण अथवा शहरी तुम्हाला तुमचे उत्पादन आपल्या परिसरात किंवा शहर ठिकाणी जावंच लागतं. त्यामुळे ग्रामीण भागासाठी म्हणून वेगळा असा कोणताही उत्पादन क्षेत्रातील वेगळा व्यवसाय नसतो. तुमच्या ५० ते १०० किमीच्या परिसरात जे जे विकलं जाऊ शकतं ते ते तुम्ही बनवून विकू शकता. त्यातही फूड प्रोसेसिंगशी निगडित असेल तर स्थानिक पातळीवर कोणत्या पिकाचं उत्पादन होतं तेवढं तुम्ही बघू शकता.


मनाची मशागत करून त्यात उद्योजकीय संस्काराचे बीज पेरणारे नितीन साळकर यांचे 'उद्योजकीय मानसिकता' हे सदर वाचा 'स्मार्ट उद्योजक' मासिकात. मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://goo.gl/D3CmYr (Advt)

पुढे प्रश्न असतो तो म्हणजे गुंतवणूकीचा. त्यासोबतच आपल्याकडे असलेल्या कौशल्यांचा आणि अनुभवाचा. याचा अभ्यास सर्वप्रथम करणं आवश्यक असतं. तुमच्या गावात किंवा गावाशेजारीच तुमच्यापेक्षा मोठं असलेलं गाव अशा ठिकाणी तुम्ही सुरू करू शकाल असे ट्रेडिंगसंबंधी किंवा सर्व्हिस क्षेत्रातील अनेक उद्योग आहेत. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रच असलं पाहिजे असा आग्रह असू नये.

आपलं गाव बाजरपेठेचे गाव असेल किंवा तुमच्या परिसरातील नावाजलेलं मोठं गाव असेल तर त्याठिकाणी तुम्ही स्थानिक पातळींवर आवश्यक सेवा देणारे उद्योग सुरू करू शकता. उदाहरणच द्यायचं तर एखादं हॉटेल सुरू करू शकता. चहा, भेळ, मिसळ, भजी, वडा-पाव, तर्री वडा, सामोसा यारख्या भरपूर मागणी असणार्या खाद्यपदार्थांचे स्नॅक्स सेंटर तुम्ही सुरू करू शकता. यातून चांगले उत्पन मिळते. कारण खवय्यांची आपल्याकडे कमतरता नाही. आणि हा जीवनावश्यक घटक आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला कधीच मरण नाही. यासाठी आवश्यक गुंतवणूकही कमी असते.

कापडाचं दुकान सुरू करू शकता. ग्रामीण भागात कपड्याचे दुकानसुद्धा चांगले चालते. बाजारपेठेच्या ठिकाणी या उद्योगाला चांगले मार्केट मिळत नाही. सुरत, मुंबई, अहमदाबाद, बडोदा सारख्या शहरांतून होलसेल बाजारपेठेतून माल खरेदी करून चांगले दुकान चालवता येते. ग्राहकांची कमतरता नाही. आजही ग्रामीण भागातील कापड मार्केट काही ठराविक लोकांच्याच हातात आहे.

किराणा मालाचे दुकान सुरू करू शकता. यातूनही चांगलं उत्पन्न मिळू शकतं. किराणा उद्योग अल्पावधीतच चांगलो चालतो. प्लास्टिक, स्टील, घरगुती वापराच्या वस्तूंचे दुकानही सुरू करू शकता. शेतीआवश्यक अवजारांचे दुकान हाही एक उत्तम पर्याय आहे. ग्रामीण भागात यासारखे मोठे मार्केट नाही. औजारे, मशिनरी, इरिगेशन, खते, कीटकनाशके इ. अनेक प्रकारचे प्रोडक्ट येतात. फुटवेअर, खेळणी, सौंदर्यप्रसाधने अशासारख्या वस्तूंना चांगली बाजारपेठ आहे. आपल्या परिसरातील बाजारपेठांना फिरून त्याची माहिती घ्या. एखादी टेम्पोवजा रिक्षा गाडी घ्या. गाडी आकर्षिकरित्या सजवा. आणि परिसरात प्रत्येक बाजार फिरा. यालाही लोकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळेल.

याच प्रमाणे भाजीपाला, फळे यांची विक्री करू शकता. फिरत्या वाहनांवरून व्यवसाय करणे जास्त फायद्याचे आहे. सात गावात सात बाजार करायचे हे बाजार शक्यतो तालुक्यातील मोठे बाजार असतील याची काळजी घ्यायची आणि तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा महिन्यातून पाच ते दहा दिवस विक्री करायची. बाजार दुपारपर्यंत संपतात. दुपारनंतर पुढच्या दिवसाची तयारी करायची. दररोज चांगले उत्पन्न देणारा असा हा उद्योग आहे. विक्रीकरिता भाजीपाला, फळे स्थानिक परिसरातच उपलब्ध होत असतात किंवा जवळच्या मार्केटमधून उपलब्ध करावेत.

याचप्रकारे बेकरी प्रोडक्ट बनवून विकू शकता. जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या काही मोठ्या बेकरी असतील त्यांच्याकडून होलसेलमध्ये विकत घेऊन स्थानिक बाजारात विका. यालाही मोठे मार्केट आहे. पाव, ब्रेड, खारी, टोस्ट, बिस्कीट आणखी बरेच काही याअंतर्गत विकले जाऊ शकते.

इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल वस्तूंची विक्री व दुरुस्ती सुरू करा. इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मागणी चांगली असते तसेच टीव्ही, मोबाईल, पंखे, फ्रीजसारख्या वस्तूंच्या रिपेअरिंगसाठी चांगले ग्राहक मिळतात. लग्नाचे मंडप व इतर साहित्य भाड्याने देण्याचा व्यवसायसुद्धा ग्रामीण भागात चांगले उत्पन्न मिळवून देतो.

हे काही प्रातिनिधीक उद्योग मला सुचलेले आहेत. याचप्रकारे तुम्ही परिसरात फेरफटका मारला तर तुम्हाला आणखी काही उद्योगांचे पर्याय सुचू शकतात. व्यवसाय म्हणजे विक्री हा नियम लक्षात ठेवा. काय विकायचं ठरवा आणि कामाला लागा.

Smart Udyojak | e-Magazines | All Issues

व्यवसाय करणं जास्त कठिण नसतं तर आपली नकारात्मक भूमिका अवघड असते. व्यवसाय कमीपणाचा असतो ही मानसिकता ग्रामीण भागातील तरुणांना स्वत:च्या पायावर उभे राहू देत नाही. या मानसिकतेला बाजूला सारा आणि स्वत:चा उद्योग सुरू करा. वर्षभरात तुमची प्रगती दिसली की तेच लोक चांगला निर्णय घेतलास, नोकरीत काय ठेवलंय असं म्हणतील. सुरुवात करा, घाबरू नका.

– श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: