स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यवसायांचे आजकाल फेसबुक पेज असते. त्यावर प्रत्येकजण नवनवीन पोस्ट्स, ऑफर्स, भरपूर लाईक्स मिळाल्याबद्दल धन्यवाद अशा अनेक गोष्टी शेअर करतो, परंतु खरंच फक्त इतक्यांनीच फेसबुकमधून बिझनेस मिळतो का? कधीतरी एखाद्यानी चौकशी करून मिळतो.. पण तितकाच!
फेसबुकचा व्यवसायासाठी वापर कसा करता येतो हे पाहू…
आपल्या व्यवसायाचे पेज बनवणे. त्यात आपला लोगो प्रोफाइल फोटो म्हणून आणि आपल्या व्यवसायाची माहिती देणारे ग्राफिक कव्हर म्हणून ठेवावे.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
त्या पेजवरून रोज निदान एक माहितीपर आणि आठवड्यातून एक विक्रीची पोस्ट शेअर करावी.
इतरांनी आपली पोस्ट वाचून लाईक करावी असे वाटत असेल तर आपल्या पर्सनल अकाउंटवरूनही ती पोस्ट लाईक आणि आपल्या पर्सनल ग्रुप्समध्ये (त्या पोस्टच्या विषयाशी संबंधित) शेअर करावी.
कोणत्या प्रकारच्या पोस्टना रीच जास्त आहे तर कोणत्या प्रकारच्या पोस्ट्सना इंटरॅक्शन जास्त आहेत ते पाहावे.
रीच जास्त म्हणून विक्री जास्त होईलच असे नाही, परंतु इंटरॅक्शन जास्त असेल तर विक्री जास्त होऊ शकते.
इतर ग्रुप्समध्ये विक्रीच्या गोष्टी सेल पोस्ट रूपात शेअर कराव्यात तर माहितीपर पोस्टची लिंक शेअर करावी, ज्यांनी आपल्या पेजवर येणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा वाढेल.
आपल्या ओळखीच्या लोकांना, ग्राहकांना आपल्या पेजवर रिव्ह्यू लिहायला सांगावे आणि ज्यांनी स्वतःहून रिव्ह्यू लिहिला आहे त्यांचे मेसेजमधून आभार मानावेत.
आपल्या ग्राहकांना आपल्या फेसबुक पेजला भेट द्यायला न विसरता सांगावे.
एखाद्या पोस्टवर चांगली किंवा वाईटपैकी (positive or negative) कोणतीही कमेंट आली तरी जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर त्याला रिप्लाय करावा.
एखाद्यानी मेसेज करून आपल्या उत्पादनांविषयी विचारले तर शक्य असल्यास त्यांचा फोन नंबर घेऊन फोनवर बोलावे; नाहीतर मेसेज मध्ये सव्विस्तर बोलावे.
मेसेज रीड करून वेळ मिळेल तेव्हा रिप्लाय करू असे म्हणून चालून आलेल्या ग्राहकाला गमावू नये.
आपले फेसबुक पेज लाईक केलेल्यांचा एक वेगळा ग्रुप बनवावा.
– शैवाली बर्वे
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.