स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
एकविसाव्या शतकातली स्त्री ही हळूहळू चूल आणि मूल यातून बाहेर येऊ लागली आहे. संवादाच्या आधुनिक माध्यमांमुळे तीही जगाशी जोडली जाऊ लागली आहे. स्त्रीची कणखर मनोवृत्ती, तिची ताठर भूमिका आपल्याला तिच्या निर्णयांतून दिसते.
‘स्त्री’ ही खर्या अर्थाने मॅनेजमेंट गुरू असते. चौकटीबाहेरचं जगणं, उंबरठा ओलांडून बाहेरचं मोकळं आभाळ अनुभवणं तिच्या उपजत गुणांना अजूनच चमकवतंय. घर आणि काम यात तारेवरची कसरत करताना मुलांना आईच्या मायेची ऊब देण्यात आपण कमी पडू नये यासाठी प्रत्येक स्त्रीने या काही मुद्द्यांचा नक्की विचार करावा.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox
नोकरदार असो किंवा व्यावसायिक, प्रत्येक स्त्रीला घर आणि काम यात समतोल साधताना तारेवरची कसरत करावीच लागते. त्यातही स्वत:चा उद्योग सुरू करताना उद्योग आणि मातृत्व या दोन आघाड्यांवर आई म्हणून आपण कमी पडतोय का, असा सल सतत मनाला लागून राहतो आणि काम आणि घर दोन्हीतील लक्ष कमी होतं.
उद्योग सुरू करताना किंवा सुरू केल्यावर सुरुवातीच्या काळात उद्योगाला सर्वात जास्त वेळ देण्याची गरज असते आणि त्याच वेळी आपल्या मुलांना आई म्हणूनही तेवढाच वेळ देणे गरजेचे असते. अशा वेळी सर्वात जास्त नैराश्य येते आणि आत्मविश्वास डळमळू लागतो. यावर मात कशी करावी, असा अनेक महिला उद्योजकांपुढे प्रश्न असतो.
मैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्न असेल कसा साधावा हा समतोल? काय करता येईल? एवढं सोप्प आहे का? खरं तर प्रथमदर्शनी तर नक्कीच नाही; परंतु थोडा प्रयत्न केला तर हे शक्य आहे. थोडं वेळेचे नियोजन, कामाचं नियोजन आणि मुलांनाच आपल्या उद्योगात आपल्यासोबत जोडून घेता आलं तर आपल्या या समस्येवर आपण नक्कीच मात करू शकतो.
मुलांशी मैत्री करा : घाईच्या वेळी आपल्या मुलांनी आपल्याला काही सांगायचा प्रयत्न केला की, आपल्याही नकळत आपण आता वेळ नाही, मी आता कामात आहे, मग बोलुया का? असा प्रश्न विचारतो. आणि हीच ती वेळ असते आपण आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही हा सल मनात निर्माण होण्याची. अशा वेळी घाईने त्यावर व्यक्त
होण्याऐवजी हेच आपण आपल्या बाळाला जवळ घेऊन मित्रत्वाच्या भावनेने त्याच्याशी संवाद साधत आणि त्यावर न खेकसता प्रेमाने सांगितले तर नक्कीच याचा फायदा होईल.
मुलांसोबत नवीन नवीन खेळ खेळा : लहान मुलांना सहवास हवा असतो. त्यांच्याशी आपल्या कामासोबत छोटे छोटे खेळ तयार करून खेळलो तर तेही यात रमतात आणि आपलेही काम होते.
आपल्या कामांची घर आणि कार्यालय अशी यादी करावी : दिवसभराची करावयाची कामांची नीट, पद्धतशीर यादी करावी. घर आणि ऑफिस यांची वेगवेगळी यादी केलेली असावी. यातील घरातील करावयाच्या अनेक कामांमध्ये आपण आपल्या मुलांना सोबत घेऊन अथवा मुलंच योग्य मार्गदर्शनाखाली ही कामं करू शकतात आणि आपणही त्यांना सकस वेळ देऊ शकतो.
वेळेचे नियोजन : आपण किती वेळ देतो याहीपेक्षा आपण कसा वेळ देतो हे जास्त महत्त्वाचं असतं. Quantity time पेक्षा Quality time महत्त्वाचा आहे.
तुमच्या मुलांना तुमच्या व्यवसायात सोबत घ्या : कळत्या वयाच्या मुलांना आपल्यासोबत आपण आपल्या उद्योगात सोबत घेऊ शकतो. त्यांच्याशी काही छोट्या छोट्या गोष्टींवर चर्चा करू शकतो. त्यांची मतं विचारू शकतो. आजची मुलं टेक्नॉलॉजीमध्ये अगदी सहज हातखंडा असलेली असतात.
तुमच्या कामाच्या विषयाशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टींत त्यांची मदत घेऊ शकता. ज्यामुळे मुलांनाही उद्योगातील त्यांचं महत्त्व जाणवतं आणि तुम्हालाही त्यांच्यासोबत वेळ घालवता येतो. दुसरा फायदा म्हणजे मुलांमध्येही उद्योजकीय संस्कार होऊ लागतात आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळतो.
पालकत्व जपा : आपण एखादा उद्योग सुरू करतो तेव्हा तेही आपलं मूलच असतं. मुलांना आपण तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतो. मग तो उद्योगरूपी मुलं असो अथवा आपल्या रक्तामांसाचं; त्यासाठी वेळ ही आपली जबाबदारी आहे. मुलं वाढवताना दोन्ही मुलांना आपण एकाच प्रकारे योग्य न्याय देऊ शकतो. त्यासाठी आपल्यातील पालकत्व जपायला हवं.
– प्रतिभा राजपूत
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.