Advertisement
उद्योगोपयोगी

तुमच्या फोनचा व्यवसायवाढीसाठी प्रभावी वापर कसा कराल?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आज कोणाकडे मोबाइल नाही, असं म्हटलं तर जगातलं आठवं आश्चर्य ठरेल. मोबाइल ही आजची अत्यावश्यक गरज झाली आहे. उद्योजकांसाठी तर ती MUST असणारी गोष्ट आहे. त्यातही स्मार्टफोन हे तर काही उद्योजकांसाठी चालतं-फिरतं ऑफिस आहे.

स्मार्टफोनच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे, apps मुळे आपल्याला कामाच्या नोंदी ठेवणं, तसंच जगाशी जोडलेलं राहणं शक्य आहे. ई-मेल्स, images, डॉक्युमेंट्स, PDFs, ठिकाणं हे अगदी एका क्लिकने तुम्ही एका फोनमधून दुसऱ्यापर्यंत पोहचवू शकता.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

WhatsApp समुहांचा स्मार्ट वापर कसा करायचा?

आपल्या क्षेत्रासाठीचे वेगवेगळे WhatsApp समुहांद्वारे (Groups) आपल्याला आपल्या क्षेत्रातील अद्ययावत माहिती, महत्त्वाच्या घडामोडी कळत असतात. ज्याची आपल्या व्यवसायावाढीसाठी नक्कीच मदत होते.

WhatsApp वर उगीचच बऱ्याच समुहांचाचे सदस्य होण्यापेक्षा, ज्याचा आपल्या व्यवसायवाढीसाठी उपयोग होईल तिथेच सदस्य व्हा. त्या समुहाचे नियम नीट पाळा. अफवा आणि चुकीची माहिती पसरवू नका. समुहाचा व्यवसायिकपणा जपा. अशा समुहात विनोद, नसते फॉरवर्ड असं काही पोस्ट करू नका. आपल्या प्रॉडक्टसची माहिती समूहात देण्याआधी ऍडमिनची परवानगी घ्या.

ब्रॉडकास्ट यादीमध्ये सर्व कॉन्टॅक्टसला घेण्याआधी त्यांना खरंच तुमच्याकडून माहिती घेण्यात स्वारस्य आहे का, ते  विचारा. अनावश्यक फोटो, माहिती जेव्हा शक्य असेल तेव्हा डिलीट करत राहा.

आपल्या कामाचे फोल्डर बनवून सर्व डेटा एकत्रित ठेवा. शक्यतो समूहाचे रिंगटोन mute ठेवा. WhatsApp हे मनोरंजनाचे साधन नसून तुमच्या कामासाठी, मार्केटिंगसाठी, लोकांपर्यंत पोहचण्यासाठी, नेटवर्किंगसाठी असलेलं एक प्रभावी माध्यमं आहे हे विसरू नका. शेकडो लोकांपर्यंत तुम्ही या माध्यमातून चांगल्या नियोजनाने आणि व्यावसायिक दृष्टिकोनाने नक्कीचं पोहचू शकाल.

कोणाही नवीन व्यक्तीला मेसेज करताना आपलं पूर्ण नाव आणि इतर डिटेल्स पण द्या. प्रत्येकाकडे आपला नंबर हा जतन केलेलाचं असेल असं नाही. दोन नंबर असतील, एक फक्त कॉल करण्याचा आणि एक WhatsApp चा तर तसं नमूद करा.

फोन वापरण्याचे काही शिष्टाचार

आता संपर्क करण्यासाठीच्या मोबाइलच्या वापरात आपण काय करू शकतो ते बघूया. फोनेचे काही शिष्टाचार (etiquette) पाळले, तर समोरच्या व्यक्तीलासुद्धा चांगलं वाटतं .कोणाशी आपण पहिल्यांदा बोलणार असू, तर WhatsApp वर व्हॉइस किंवा व्हिडिवो कॉल करू नका आणि करायचा असेलं तर आधी तशी परवानगी घ्या.

मीटिंगमध्ये फोन सायलेंट ठेवा. सार्वजनिक ठिकाणी फोनवर बोलताना आपला आवाज कमी असू देत. पुढच्या व्यक्तीशी मुद्याचं बोला. ज्यांना आपण पहिल्यादांच फोन करतोय तेव्हा लगेच बोलणं सुरू न करता आपली ओळख करून द्या. शक्यतो कोणाला कॉल करण्याआधी त्यांना मेसेज करून बोलण्याची योग्य वेळ कोणती ते विचारा.

आपल्या फोनची रिंग टोन म्हणून उगीचच विचित्र, कुठलं तरी फिल्मी गाणं ठेवू नका. त्यातपण व्यावसायिकता दाखवली तर उत्तम! आपल्याला बरेचदा मोबाइल नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, तेव्हा जिथे व्यवस्थित नेटवर्क असेल तिथूनच लोकांशी संपर्क साधा.

शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा आपला फोन नंबर हा वारंवार बदलू नका. आहे तोच नंबर कायमस्वरूपी ठेवला तर त्याचा तुमच्या उद्योगधंद्याच्या प्रगतीसाठी उपयोग होईल. कारण तुमचा फोन नंबर हीपण तुमची ओळखच असते.

– मेघना धर्मेश
(लेखिका HR Consultant असून उद्योजकता व सॉफ्ट स्किल्सचं प्रशिक्षण देतात.)
संपर्क : 9321314782

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!