प्रगतिशील उद्योग

बिझनेस प्लॅन : प्रत्येक उद्योगाचा अत्यावश्यक घटक

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


बरेचसे नवीन उद्योजक बिजिनेस प्लॅनचे महत्त्व जाणतात, कारण लेखी बिजिनेस प्लॅनशिवाय त्यांना उद्योगासाठी भांडवल उभं करता येऊ शकत नाही, पण बरेचसे स्थापित उद्योगही बिजिनेस प्लॅनच्या अभावी संकटात येऊ शकतात.

मित्रांनो, आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल या लेखात आपण उद्योगातील बी.पी. म्हणजेच बिजिनेस प्लॅनच्या महत्त्वाबद्दल विचारविनिमय करणार आहोत. उद्योगासाठी लेखी बी.पी. बनवणं ही पहिली पायरी आहे. आजच्या लेखात बी.पी.चे महत्त्व समजून घेऊ.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

बी.पी. लिहिण्याबद्दलच्या काही चुकीच्या धारणा :

 • आपणास बँकेकडून अथवा Venture Funding कंपनीकडून अर्थसाहाय्य हवे असेल तरच लिखित बी.पी.ची गरज असते.
 • बी.पी. म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट आणि तो एखादा सीए अथवा accountant बनवतो आपण त्यांना पैसे दिले की झालं.
 • माझा बी.पी. माझ्या डोक्यामध्येे अगदी स्पष्ट आणि घट्ट आहे.
 • प्लान करून काही घडत नसतं, आपण प्लान करतो त्याच्या विपरीतच घडतं.
 • मी बी.पी. बनवायला असक्षम अथवा असमर्थ आहे.
 • बी.पी. म्हणजे पन्नास पानांचा निबंध आणि तो कोणी कधीच वाचत नाही.
 • Business प्लॅन हा एकदाच उद्योगाच्या सुरुवातीला लिहायचा असतो.
 • व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हा बी.पी. लिहायचा असतो, चांगले गुण मिळवण्याकरिता.
 • बिजिनेस प्लॅन लिहिण्याने Paralysis by Analysis होऊ शकतो.
 • माझा ठाम विश्वास कृतीवर आहे व कृती करताना मार्ग मोकळे होतात. प्लानिंग म्हणजे वेळेचा अपव्यय.

वरील उदाहरण लोकांसमोर मांडणे म्हणजे context सोडून content मांडण्यासारखे आहे. उदाहरणातील प्रत्येक उद्योजकाने disciplined action ला यशाचे गमक मानले आहे. आता disciplined action म्हणजे काय हे जाणूनबुजून एका विशिष्ट पद्धतीने केलेली कृती. या सर्व उद्योजकांनी आपल्या विविध वक्तव्यांतून प्लानिंगचे महत्त्व सतत लोकांसमोर मांडले आहे.

बी.पी. लिहिण्यात तुम्ही जो वेळ गुंतवला तो वेळ तुम्हाला भविष्यात कित्येक पटीने मोबदला मिळवून देईल, पण जर आज बी.पी. लिहिण्यात वेळ गुंतवला नाही तर त्याचे भविष्यातले परिणाम अतिशय घातक ठरू शकतात.

आज अनेक उद्योजकांना जेव्हा आम्ही विचारतो, तुमच्या उद्योगाची उलाढाल येणार्‍या तीन वर्षांत किती असेल? बहुतेकांकडे याचे उत्तर नसते. काही जण एक अंदाजे उत्तर देतात, पण आणखी काही प्रश्न विचारल्यावर लक्षात येते. ते फक्त intuition अथवा Intention असते.

Intuition ला उद्योगात खूप महत्त्व आहे, पण हे Intuition वास्तवात तेव्हाच येऊ शकते जेव्हा त्याला data चा आधार दिला जातो आणि हा आधार बी.पी.द्वारा मिळू शकतो. उद्योगपती forecasting लाही खूप महत्त्व आहे, त्याशिवाय मी नक्की काय कृती घ्यायची हे लक्षात येत नाही.

परिणामांसाठी कृती करावी की कृती करून परिणामांची वाट पाहावी? यात पहिला भाग जास्त रास्त आहे. मला काय परिणाम अपेक्षित आहेत त्या दृष्टीने कृती करण्याचा आराखडा बी.पी.मुळे मिळू शकतो.

Business प्लॅनचे काही महत्त्वपूर्ण फायदे :

 • तुम्ही उद्योग का करता आहात आणि तुम्हाला काय साध्य करायचे आहे याचे स्पष्ट चित्रण तुमच्यासमोर कायम बी.पी.च्या रूपात असते. When why is clear how gets easier and when the promise is greater efforts does not matter.
 • बी. पी. लिहिताना तुमच्या मूल्यांची तुम्हाला ओळख पटते. अशी मूल्ये ज्यांच्यावर तुम्ही कधीही तडजोड करणार नसता, ही मूल्ये तुम्हाला उद्योगात अतिशय अस्थिर क्षणात टिकून राहायला मदत करतील. It’s important to know what I would never do than what I would do.
 • बी. पी. तुम्हाला तुमच्या उद्योगाच्या कृतीचा आराखडा प्रदान करतो ज्यामुळे तुमची शक्ती आणि क्षमता केंद्रित होऊन उद्योगाला एक विशिष्ट दिशा प्रदान करतो. You can’t depend on your eyes when you are out of focus.
 • बी. पी.मधून तुमच्या प्रगतीचे मूल्यमापन करणारे मापदंड तुम्हाला मिळतील.
 • इंडस्ट्रीबद्दलची पुरेपूर माहिती, तुमच्यासाठी संभावित संधी आणि धोक्यांची लिस्ट.
 • संभावित ग्राहक कोण आणि त्यांची व्यवहार करण्याची सध्याची पद्धत काय आहे याचे ज्ञान मिळते.
 • उद्योगातील स्पर्धकांची माहिती व त्यांना तोंड देण्यासाठीचा आराखडा तयार असतो.
 • उद्योगातील ध्येय व लक्ष्य साध्य करण्याचे वेळापत्रक बनते.
 • तुमच्या उत्पादनाचे किंवा सेवेचे सविस्तर वर्णन उपलब्ध होते.
 • उत्पादनाच्या बाजारीकरणाचा आराखडा तयार होतो.
 • उद्योगाची उलाढाल व त्या अनुषंगाने होणारा खर्च आणि नफा याचा अंदाज मांडता येतो.
 • तुमचा कृतीचा आराखडा जो तुम्हाला संभावित आडमार्ग आणि धोके यांची माहिती पुरवून सजग ठेवतो.
 • कधी कशा प्रकारचे मनुष्यबळ लागेल याची माहिती मिळते.
 • उद्योगाबद्दल एक ओळखपत्र तयार होते ते अनेक ठिकाणी वापरता येते.

बी.पी. लिहिण्याबद्दलचे अनेक Format आणि पद्धती इंटरनेटवर उपलब्ध आहेत. तुमचा बीपी त्याच Form मध्ये बसेल अथवा असावा असा काही नियम नाही. या उपलब्ध पद्धतीचा उपयोग फक्त रेफरंस म्हणून करावा.

– सीए कुंदन गुरव


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!