बिझनेस टू बिझनेस मार्केटिंगसाठी लिंक्डइन


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


लिंक्डइन हे बिझनेस टू बिझनेस मार्केटर्ससाठी खूप मोठे व्यासपीठ आहे. लिंक्डइनचे सुमारे ३०० मिलियन वापरकर्ते आहेत. त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचणे शक्य होऊ शकते. लिंक्डइनच्या माहितीप्रमाणे अंदाजे ३१,००० लोक एखाद्या पोस्टला पाहतात व २५० लाईक्स आणि ८० प्रतिक्रिया असतात. अंतिमतः या सगळ्याचा परिणाम सेल्स वाढण्यावर होतो. तुम्ही जर उद्योजक असाल किवा एखाद्या कंपनीचे शुभचिंतक असाल तर लिंक्डइनचा तुमच्या व्यवसायासाठी कसा वापर केला पाहिजे.

१. नियमित हाय वेल्यू कंटेंट पोस्ट करा

इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसप्रमाणे लिंक्डइनलासुद्धा नियमित कंटेंट पोस्ट करावा लागतो. तो कंटेंट उत्तम दर्जाचा व तुमच्या क्षेत्राशी निगडीत असणे गरजेचे आहे, तरच त्याचा परिणाम वाचकांवर जास्तीत जास्त पडेल. नियमित पोस्ट करणे म्हणजे नक्की किती दिवसांनी? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आठवड्यातून कमीत कमी दोनदा व जास्तीत जास्त तुमच्या फॉलोअर्सच्या मागणीनुसार. त्या पोस्टचे आकार फीट होणारे असले पाहिजेत.

२. ग्रुप डिस्कशनमधून नवनवीन कल्पना शोधा

तुम्हाला जर लिंक्डइनवर नियमित पोस्ट करायचे असेल तर नवीन कंटेंट तर लागणारच जो तुमच्या क्षेत्राशी निगडीत वेगवेगळे विषय मांडून तुमच्या वाचकांना एक उत्तम दर्जाचे पोस्ट वाचायला उपलब्ध करेल. हा सगळा नवनवीन मजकूर तुम्हाला काही डिस्कशन ग्रुप्सवर मिळेल. त्यातले तुमच्या व्यवसायाच्या निगडीत ग्रुप्स जॉईन करा, तिथल्या ग्रुप डिस्कशनसमध्ये सहभागी व्हा व त्या ग्रुप्सच्या सभासदांमध्ये तुमचे पोस्ट पसरवा.

३. तुमच्या इंडस्ट्रीबद्दल बोला

तुमच्या पोस्ट्स नेहेमी स्पेसिफिक असल्या पाहिजेत. तुमच्या वाचकांची गरज जाणून घ्या व त्यानुसार तुमच्या पोस्टिंगमध्ये बदल घडवून आणा. तुमच्या पोस्ट एकदमच मार्केटिंगवाल्या वाटलया नकोत. त्या फक्त तुमच्या कंपनीबद्दल बोलणार्‍या नसाव्यात. प्रत्येक पोस्ट करताना तुमच्या वाचकांना त्याचा काय फायदा होईल याचा विचार तुम्ही केला पाहिजे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

त्यांना काही त्यांच्या उपयोगाचे वाटले तरच तुमच्या पोस्टला चांगला प्रतिसाद मिळणार आहे. उदाहरण द्यायचे झाले तर,तुम्ही एखादी डिजिटल मार्केटिंग कंपनी असाल,तर त्या विषयाला अनुसरून टीप्स शेयर करा ज्यातून तुमचे कौशल्य वाचकांपर्यंत पोहोचेल. तुमच्या वाचकांमध्ये विश्वसनीयता निर्माण करण्यासाठी हे एक चांगले माध्यम आहे.

एकदा का लोकांना तुमच्या पोस्ट्सची किवा तुमच्या कंटेंटची सवय लागली की तुम्ही मार्केटिंगचा किवा प्रोडक्ट सेलिंगची पोस्ट टाकली तरी वाचक ती स्वीकारतात.

४. स्टोरी-टेलिंगच्या माध्यमातून वाचकांना गुंतवा

गोष्टी कोणाला नाही आवडत? सगळ्यांना गोष्टी ऐकायला आवडतात. तुमच्या ग्राहकांना किवा वाचकांना तुमच्या ब्रांडशी भावनिकरित्या जोडण्यासाठी स्टोरी-टेलिंग ही एक प्रभावशाली पद्धत आहे. जास्तकरून तो उत्साहवर्धक व प्रोत्साहक मजकूर असावा.

लिंक्डइनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या टार्गेट ग्राहकांना किवा वाचकांना स्टोरी-टेलिंगच्या माध्यमातून तुमच्या ब्रांडमध्ये सहभागी करून किवा गुंतवून घेऊ शकता. अशा ज्या पोस्ट्स असतात त्यांचे शेअर्स, लाईकस व कमेंट्स इतर पोस्ट्सपेक्षा जास्त असतात. म्हणजेच लोकांची या पोस्ट्समध्ये गुंतवणूक (एंगेज्मेंट) जास्त होईल.

५. लिंक्डइनचा ट्राफिक तुमच्या वेबसाईटवर न्या

लिंक्डइन एक असा सोशल मीडिया आहे जिथे एंगेज्मेंट जास्तीत जास्त असते. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही जास्तीत जास्त लोक तुमच्या वेबसाईट किवा ब्लॉगवर नेऊ शकता. प्रत्येक पोस्ट जी तुम्ही लिंक्डइनवर करता त्या पोस्टसोबत तुमच्या वेबसाईट किवा ब्लॉगची लिंक असणे गरजेचे आहे. तरच ते फायदेशीर ठरणार आहे.

सोशल मीडियाचे तीन महत्वाच्या गोष्टी आहेत, कंटेंट, एंगेज्मेंट आणि त्यातून कन्वर्शन (सेल्स). जर तुम्ही ती लिंक दिलीत तर ग्राहक किवा वाचक अधिक माहितीसाठी त्या वेबसाईट किवा ब्लॉगवर येऊन तुमच्या प्रोडक्ट्स किवा सर्विसबद्दल अजून माहिती वाचून किवा बघून तुमच्याशी संपर्क साधतील. म्हणजेच आपले अंतिमतः जो लिंक्डइनवर पोस्ट करण्याचा हेतू होता तो सध्या होईल.

– निखील महाडेश्वर
(लेखक इंटरनेट सेक्युरिटी तज्ज्ञ असून सोशल मीडिया मार्केटिंगचे प्रशिक्षक आहेत.)
मोबाईल : ९७७३१७०३७८

error: Content is protected !!
Scroll to Top